(लेखापेक्षा एक निरिक्षण म्हणूनच वाचा)
मध्यंतरी एक केस वाचत होते. नाझी गेस्टोपा चिफ Lischka ची.
फ्रान्स जिंकल्यावर तिथल्या 30,000 ज्युंना मारणारा हा राक्षस.
युद्ध संपल्यावर त्याला गुन्हेगार म्हणून जाहीर केले गेले. पण जर्मनीत असलेल्या लिस्काला कोणतीच शिक्षा देता येत नव्हती. कारण जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात युद्ध गुन्हेगारांबद्दल काहीच नियम ठरले नव्हते.
याच 30,000 तल्या एका मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या मुलाने - Serge Klarsfeld आणि त्याची बायको Beate Klasfeld
काही मित्रांच्या मदतीने लिस्काला पकडून, फ्रान्समधे आणण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.
अनेक पातळ्यांवर प्रयत्न करून, प्रत्यक्ष लिस्काच्या कार्यालयात मोर्चा नेऊन या दोघांनी प्रयत्न केले. परंतु जर्मन सरकार बधत नव्हते.
अखेर सेरगे ने एकदा रस्त्यावर लिस्काला पकडून त्याच्या कपाळावर पिस्तुल धरले. लिस्काला मरणाची भिती म्हणजे काय दाखवले. पण शूट न करता हसत तो परत फिरला. तो म्हणाला की आम्हाला नाझींचा सूड घ्यायचा नाही तर त्यांनी मारलेल्या हजारो ज्युंना न्याय द्यायचा आहे.
या घटने नंतर दोघांनी अथक प्रयत्न करून , जर्मनीत राहून तेथील सरकारला आपला स्टँड बदलायला लावला. पुन्हा नव्याने लिस्काला अटक झाली, खटला चालवला गेला . आणि त्याला कारावास झाला.
त्याच बरोबर इतरही नाझी नराधमांवर खटले चालवले गेले.
हे सगळं मला फार वेगळं, ग्रेट वाटतं. सूड आणि न्याय यातली सीमा इतकी स्पष्ट समजणं, ती अंगिकारणं. त्यातून त्या अन्यायाला बळी पडलेल्याच्या मुलाने हे पार पाडणं. संधी मिळूनही सूडाच्या वाटेवर न जाता, न्यायाचाच मार्ग स्विकारून वेळ लागला तरी चालेल पण योग्य मार्गच स्विकारणं! ग्रेट!!
छान लिहिलंय. माहीत नव्हतं हे.
छान लिहिलंय. माहीत नव्हतं हे.
आवडली ही कृती. सूडबुद्धीने मारण्यापेक्षा न्यायालयात जाणं आणि हत्याकांडात, छळछावणीत मारले गेलल्याना न्याय देणं.
प्रसंगोचित..
प्रसंगोचित..
<< खटला चालवला गेला . आणि
<< खटला चालवला गेला . आणि त्याला कारावास झाला. >>
30,000 ज्युंना मारून फक्त कारावास? इस्रायलने ॲडॉल्फ आईकमनला जसे अर्जेंटिना मधून पळवून इस्रायलमध्ये नेले आणि फासावर लटकवले तसे काही करायला हवे होते.
मनावर कोरला जावा असाच प्रसंग
मनावर कोरला जावा असाच प्रसंग आहे.
त्यांच्या न्यायिक चिकाटीला सलाम....
बरेचदा लोक मदमस्त सत्तेविरूद्ध हलका उठाव करतात. पुढे कोण दाद देत नाही म्हटल्यावर हे असच असतं. आपण काही करू शकत नाही असं म्हणून माघार घेतात.
सूड बुद्धीने न वागण एवढ सोपं नव्हतं तरी त्याने ते केलं नाही. ज्ञानेश्वर माऊली आठवली...जे खळांची व्यंकटी सांडो म्हणतात. एवढं भोगलं तरी द्वेषभावना नाही.
ह्यावर एक इंग्रजी चित्रपट पण
ह्यावर एक इंग्रजी चित्रपट पण आहे ना? नाव विसरलो.
कसली डोंबलाची चिकाटी? हातात
कसली डोंबलाची चिकाटी आणि न्यायाची वाट? हातात सापडूनही त्याला सोडला आणि नंतर सापडलाच नसता तर? तसेही ३०,००० ज्यू लोकांना मारून १९८० ते १९८५ अशी फक्त ५ वर्षे कारावास म्हणजे Kurt Lischka च्या दृष्टीने फार काही वाईट नाही.
<<< एवढं भोगलं तरी द्वेषभावना नाही. >>
मग कारावासात टाकायचा खटाटोप कशाला? उदार मनाने माफ करायचे ना?
मोसादच्या Operation Wrath of God सारखे करायला हवे होते खरं तर.
Several hours before each assassination, each target's family received flowers with a condolence card reading: "A reminder we do not forget or forgive."
उ. बो.
उ. बो.
यावर दुमत असू शकते....जिथे कारुण्य आहे ती माणसं आणि सुडाने पेटलेली माणसं फरक असू शकतो....
सरसकट जर्मन अथवा नाझींचा
सरसकट जर्मन अथवा नाझींचा द्वेष नाही. ज्यांनी अशी कृत्ये केली त्यांना मात्र शिक्षा.
गुन्ह्याच्या मानाने शिक्षा कमी पडली हे मान्य.
शिक्षा करणारे जर्मन....soft
शिक्षा करणारे जर्मन....soft corner असू शकतो.
काहितरी शिक्षा झाली हेही नसे थोडके.
ज्ञानेश्वर माऊली , ख्रिस्तानं पूर्ण माफ केलं असतं.
अवल, फार छान लेख लिहिला आहेस.
अवल, फार छान लेख लिहिला आहेस. नाझी - ज्यु सुडकथा कथांबाहेर ही एक वेगळीच घटना आहे. छान लिहिलं आहेस. तुला जे भावलं तेच मलाही वाटलं. शेवटचा para पटला.
चांगला लेख.
चांगला लेख.
चांगला लेख. सुडाला सुडाने
चांगला लेख. सुडाला सुडाने उत्तर देऊन काहीही होत नाही. ती साखळी पुढे तशीच सुरू राहते. नाझि/गेस्टापोंना पकडुन फासावर लटकवुन ज्यु लोकाना समाधान मिळाले असेलही पण जे फासावर लटकले ते त्या गुर्मीतच लटकले असतील, सगळ्यांनाच पश्चाताप झाला असेल असे नाही. ज्यूंच्या त्रासाची अनेक कारणे होती त्यात नाझींना वाटणारे स्वतःबद्दलचे वांशिक श्रेष्ठत्वही एक कारण होते. हे वांशिक श्रेष्ठव्त्ववाले लोक फासावर चढतानाही मनात तीच भावना ठेवून चढले असावेत.
अखेर सेरगे ने एकदा रस्त्यावर लिस्काला पकडून त्याच्या कपाळावर पिस्तुल धरले. लिस्काला मरणाची भिती म्हणजे काय दाखवले. पण शूट न करता हसत तो परत फिरला
सेरगेने लिस्काला मरणाची भीती दाखवुन तुला हे असे मरण कुठल्याही क्षणी येऊ शकते हे बिंबवुन सोडुन द्यायला पाहिजे होते असे एक क्षण वाटले पण मग तो ही सुडच ठरला असता. लिक्स्काने सेरगेच्या आईबाबांना मृत्यूच्या सावलीत ठेवले आणि छळुन मारले. तसेच लिक्स्कालाही मोकळे सोडुन पण तरीही कधीही तुझ्यावर हल्ला करुन तुला मारु असे केले असते तर लिस्कानेही तो मरण यातनेचा अनुभव घेतला असता. पण असो. ज्यानी यातना भोगल्यात त्यांचा निर्णय सगळ्यात जास्त योग्य. आपण बाहेरुन बघणारे.
लेखाचे पहिले वाक्य आणि
लेखाचे पहिले वाक्य आणि निरूंचा प्रतिसाद वाचुन डोक्यात प्रकाश पडला. फेसबुकवर भरत दाभोळकर यांनी याच घटनेबाबत जे लिहिलेय तेही मग आठवले.
सामुदायिक हत्याकांड ल एक
सामुदायिक हत्याकांड ल एक व्यक्ती जबाबदार नसतो.
सहभागी असणारे सैनिक, उन्माद च्या नशेत असलेला अत्याचार करणारा लोकांचा समूह .
हे जबाबदार असतात.
त्या हत्यांचा बदला घ्यायचा झाला तर परत त्याच प्रकारची हिंसा करावी लागेल.
सुड म्हणजे त्या क्रूर सत्ताधारी व्यक्ती ला सत्तेवरून खाली खेचणे .
आणि परत तशा विचाराचा कोणीच सत्तेवर येणार नाही ह्याची काळजी घेणे
अशा प्रसंगातून शिकायचे असते..हुकूमशहा व्यक्ती पुजे मुळेच निर्माण होतात आणि जे हे व्यक्ती पूजक लोक असतात तेच त्यांची शिकार बनतात.
पण लोक काही शिकत नाहीत.
निसर्गाने असा च माणूस बनवला आहे.
सूड आणि न्याय यातली सीमा इतकी
सूड आणि न्याय यातली सीमा इतकी स्पष्ट समजणं, ती अंगिकारणं. त्यातून त्या अन्यायाला बळी पडलेल्याच्या मुलाने हे पार पाडणं. संधी मिळूनही सूडाच्या वाटेवर न जाता, न्यायाचाच मार्ग स्विकारून वेळ लागला तरी चालेल पण योग्य मार्गच स्विकारणं! ग्रेट!!>> खरंच ग्रेट. छान निरीक्षण.
अश्या कृरकर्म्यांना कितीही शिक्षा दिली तरी त्याने गेलेले निरपराध जीव परत येणार नाहीत. जिनोसाइड हे मानवतेच्या विरुद्ध अक्षम्य गुन्हेच आहेत. विल्यम डॅलिरिंपल व अनिता आनंद ह्यांचा स्पॉटिफाय वर एंपायर नावाचा फार उत्तम पॉड कास्ट आहे त्यात जलियान वाला बाग हत्याकांड, भारताची फाळणी, आर्मेनिअन जिनोसाइड ह्यावर उत्तम विश्लेष ण आहे. जरुर ऐका. हिटलर ला इतकी मगृरी होती की आता आर्मेनिअन जिनोसाइड मध्ये वारलेल्या लोकांची आठवण तरी कोणी काढतेका असा प्रश्न त्याने आपल्या सर्कल ऑफ इव्हिल मध्ये विचारला होता. व पुढे हे हत्याकांड घडवले.
राइज अँड फॉल ऑफ द थर्ड राइख वाचल्यावर मी पुढे अधिक माहिती म्हणून सायमन सिबॉ मॉटेफिओरे ह्यांचे जेरुसलेम हे पुस्तक वाचले. ह्यात ज्यु धर्माच्या फॉर्मेशन च्या आधी पासून माहिती आहे व त्यांना कायम परसेक्युशन चा सामना करावा लागला आहे. जिझस क्राइस्ट च्या मृत्युचा भाग व फर्स्ट आणि सेकंड टेंपल डिस्ट्रक्षन चा भाग अगदी वाचवत नाही पण नेटाने वाचला आहे.
पुढे जाउन मोसाद फॉर्मेशन व सिलेक्टेड केसेस चेही पुस्तक वाचले आहे व व्हिडिओ बघितलेत. त्यात आइकमॅन ला कसे पकडले त्याचे उत्कंठा वर्धक वर्णन आहे.
सदसदविवेक बुद्धीचा नाश झाला की असे अक्षम्य गुन्हे घडतात.
ज्यू सधन सुखवस्तू उच्चशिक्षित
ज्यू सधन सुखवस्तू उच्चशिक्षित होते. साहित्य कला बिझनेस सायन्स सगळीकडे लोकसंख्येच्या मानाने ओव्हर रिप्रेझेंटेड होते. ते रस्त्यावरचे गुंड न्हव्हते. विचारवंत, नोबेल विनर शास्त्रज्ञ, मनस्वी कवी वगैरे होते. यामुळे इतरांच्या मनात मत्सर, त्याला राजकीय हेतूने खतपाणी घातले जाणे यातून narrative तयार झालं.
गॅस चेम्बर हे हिटलरच्या सूडाचं फायनल सोल्यूशन होतं. त्याआधी दहा वर्षे 1930 च्या दशकात तो कायदेशीर सनदशीर मार्गाने ज्यू लोकांचं प्रतिनिधित्व कमी करत होता.
एप्रिल 1933 मध्ये हिटलरने जर्मनीत आरक्षण लागू केलं. ज्यामुळे ज्यू विद्यार्थ्यांना मर्यादित सीट(ओपन कॅटेगरी टाईप) ठेवल्या व बाकीच्या नॉन ज्यू साठी राखीव ठेवल्या. ज्यू लोक खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर व्हायचे (स्वतःच्या मेरिटवर) त्यामुळे मेडिकल प्रोफेशनची संधी ज्यू मुलांना शक्यतो मिळूच नये याचा आरक्षणमार्गे प्रयत्न केला गेला.
ज्यू लोक निवडणूक लढवू शकणार नाहीत कारण मतदार संघ नॉन ज्यूसाठी आरक्षित केला- असं करून ज्यू लोकांचं राजकीय प्रतिनिधित्व कमी करण्यात आलं.
ज्यू व नॉन ज्यू अशी कॅटेगरी सरकारी फायदे, सवलती, शिक्षण यासाठी करण्यात आली.
त्याचप्रमाणे ज्यू हे outsiders आहेत, बाहेरून आलेले आहेत असा प्रचार सुरू करण्यात आला. (ब्राम्हण विदेशी आहेत असं प्रचार आपल्याकडे होतो त्याची आठवण इथे होते.)
जर्मनीसाठी लढलेल्या ज्यू सैनिकांचं बलिदान deny करण्यात आलं. त्यांना traitor ठरवलं. ( आपल्याकडे पानपतावरचे विश्वासराव ते टिळक, सावरकर, झाशीची राणी यांचं बलिदान discard केलं जातं, किंवा आजही एखाद्या चकमकीत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या जाती तपासल्या जातात याची आठवण होते.)
ज्यू लोकांची घरं व प्रॉपर्टी, फार्म जप्त करायला सुरुवात केलीव ती नॉन ज्यूला allot करण्यात आली. (कूळ कायद्याची आठवण होते. )
तरी ज्यू काही झुकेनात, शिक्षण सोडेनात, नॉन ज्यू लोकांचे गुलाम बनेनात! मग 1938 मध्ये आरक्षण वाढवत वाढवत नेऊन 100 टक्के केलं आणि ज्यू मुलांचं शिक्षण बंदच केलं. तरीही नॉन ज्यू ना आपल्याला पुरेसा न्याय मिळाला आहे असं वाटेना म्हणून मग फायनल सोल्यूशन - ज्यूना मारूनच टाकायला सुरुवात केली.
आपला तो न्याय आणि दुसऱ्याचा तो सूड हे सूत्रच असतं सगळीकडे.
हेच ज्यू आता पॅॅलेस्टा्इन
हेच ज्यू आता पॅॅलेस्टा्इन (मुसलमान हा शब्द मुद्दाम वापरत नाही.) लोकांना कशी वागणूक देताहेत पहा.
हेच ज्यू आता पॅॅलेस्टा्इन
हेच ज्यू आता पॅॅलेस्टा्इन (मुसलमान हा शब्द मुद्दाम वापरत नाही.) लोकांना कशी वागणूक देताहेत पहा.
हाहा... ज्या अन्यायामुळे त्यांना हजार वर्षे देशोधडीची काढायला लागली तोच अन्याय ते आता दुसर्यांवर करताहेत. होता है... मुळात ह्या संघर्षाची सुरवात कोणी कशी केली ते पाहणेही रंजक ठरेल.
हा आहेरे व नाहीरे चा आदिम संघर्ष आहे. ज्यु लोकांकडे सत्ता होती, पैसा होता. त्याचबरोबर ते धर्मवेडे होते, जीव गेला तरी धर्माचरण सोडायचे नाही, वेशभुषा, केशभुषा, जेवण धर्मात सांगितल्याप्रमाणेच करायची. यामुळे नाहीरे वर्ग, ज्याना ज्यु लोकांची चिकाटी, कष्टाळुपणा इत्यादी गुण घ्यायची ईच्छा नव्हती पण त्यांची सत्ता, पैसे हवे होते त्यांनी संघटितपणे याविरुद्ध प्रचार करायला सुरवात केली. ज्यु लोकांची फक्त स्वतःच्या समाजामध्येच राहण्याची वृत्ती, इतर धर्माच्या लोकांत न मिसळण्याची वृत्ती ह्या खास गुणांमुळे पहिल्या महायुद्धानंतर ज्या नामुष्कीला व वित्तहानीला जर्मन देशाला तोंड द्यावे लागले ते केवळ ज्यु लोकांमुळेच हे जनमानसात रुजवणे शक्य झाले. . जनमानसात राग इतका तिव्र होता/केला गेला की दशकांच्या शेजार्याला पोलिसांनी ओढुन नेले तरी जर्मन गप्प बसले.
आपापले धर्म हातात घेऊन एकमेकांना मारणे हा प्रकात धर्माचा शोध लागल्यापासुन सुरू असावा आणि अखेरचे दोन मानव शिल्लक राहीपर्यंत तरी तो संपेल असे लक्षण दिसत नाही. त्या दोघातला एक मानव दुसर्याने संपवला की एकच मानव उरेल आणि भांडायला कोणीही न उरल्यामुळे तो धर्माचा खरा अर्थ शोधायचे काम हाती घेईल हे माझे स्वप्न रंजन.
अर्थात विषय भलतीकडे जातोय. मुळ लेखाचा हेतु वेगळा आहे.
यामुळे नाहीरे वर्ग, ज्याना
यामुळे नाहीरे वर्ग, ज्याना ज्यु लोकांची चिकाटी, कष्टाळुपणा इत्यादी गुण घ्यायची ईच्छा नव्हती पण त्यांची सत्ता, पैसे हवे होते त्यांनी संघटितपणे याविरुद्ध प्रचार करायला सुरवात केली.///
हे सगळीकडे असंच घडतं बरं! युरोप असो वा आशिया.
मुळात अतिक अहमद नामक गुंडाच्या हत्येनंतर देशभरातील पुरोगाम्यांनी गंगाभागीरथी मोड मध्ये जाऊन रुदन करायला सुरुवात केली. पण त्यात मग हिटलर, नाझी, ज्यू ओढुन आणल्यावर factually correct इन्फो लिहून टाकणे भाग होते.
हे सगळीकडे असंच घडतं बरं!
हे सगळीकडे असंच घडतं बरं! युरोप असो वा आशिया.
हो. हे असेच घडते आहे आणि असेच घडणार.
तुमच्या दुसर्या वाक्याशीही सहमत.
हेच ज्यू आता पॅॅलेस्टा्इन
हेच ज्यू आता पॅॅलेस्टा्इन (मुसलमान हा शब्द मुद्दाम वापरत नाही.) लोकांना कशी वागणूक देताहेत पहा.
Submitted by केशवकूल on 17 April,//
हेच ज्यू म्हणजे? इस्राएल पीएम नेतान्याहूचा जन्म १९४९ सालचा आहे म्हणजे महायुद्धानंतरचा. आताचे इस्त्राईलचे पॉवरफुल लोक सगळे साधारण त्याच किंवा त्यानंतरच्या पिढीतले आहेत. गॅस चेम्बरमधील मृत ज्यू, ५०-६० च्या काळात मोसादमधले नाझीना शोधून मारणारे ज्यू आणि २०२३ सालचे ज्यू ही वेगवेगळ्या पिढीतील वेगवेगळी माणसं आहेत. त्यांचे प्रॉब्लेम किंवा geopolitical challenges वेगवेगळी असू शकतात.
का तुम्ही दोन हजार वर्षातील सगळ्या ज्यूना/ ब्राम्हणांना/ इंग्रजांना एकच entity म्हणून बघता? हिटलर पण असंच बघायचा ना ???
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
बाकी चर्चा, वाद चालू देत. फक्त धाग्यातील शेवटच्या परिच्छेदाकडे पुन्हा लक्ष वेधू इच्छिते
>मुळात अतिक अहमद नामक
>मुळात अतिक अहमद नामक गुंडाच्या हत्येनंतर देशभरातील पुरोगाम्यांनी गंगाभागीरथी मोड मध्ये जाऊन रुदन करायला सुरुवात केली. पण त्यात मग हिटलर, नाझी, ज्यू ओढुन आणल्यावर factually correct इन्फो लिहून टाकणे भाग होते.
नेहेमीप्रमाणे कांगावाखोर थयथयाट ! मुळात हे रुदन आतिक साठी नसून कायदा व सुव्यवस्था यासाठी आहे..
>आपल्याकडे पानपतावरचे विश्वासराव ते टिळक, सावरकर, झाशीची राणी यांचं बलिदान discard केलं जातं, मौलाना आझाद राहिले !
त्यांचे प्रॉब्लेम किंवा
त्यांचे प्रॉब्लेम किंवा geopolitical challenges वेगवेगळी असू शकतात.
का तुम्ही दोन हजार वर्षातील सगळ्या ज्यूना/ ब्राम्हणांना/ इंग्रजांना एकच entity म्हणून बघता? हिटलर पण असंच बघायचा ना ???>>
एकूण ज्यू जे करताहेत ते ठीकच आहे. असेच तुम्हाला म्हणायचे आहे ना? जाऊ द्यात.