Submitted by अनन्त्_यात्री on 10 April, 2023 - 11:34
झुळझुळत्या निळसर वळणावर
झुकून, जळाशी झुळुक झोंबते
ऐल पैल तीरांवर अवचित
स्तब्ध लव्हाळी लहरून उठते
त्या वळणाच्या पुढे जरासा
कभिन्न काळा कातळ निश्चळ
रुणझुणत्या पाण्याचे पैंजण
ऐकत फुलते वेडी बाभूळ
निळ्या सावळ्या डोहतळाशी
अचपळ मासोळी सळसळते
पुन्हा पुन्हा त्या ध्वनिचित्राच्या
स्मृतिगंधाने मन दरवळते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान, आवडली !
छान, आवडली !
मस्त !!!
मस्त !!!
धन्यवाद sanjana25, अनघा.
धन्यवाद sanjana25, अनघा.
दृक् - श्राव्याचे अनोखे
दृक् - श्राव्याचे अनोखे मिश्रण...
ध्वनिचित्रफीत आवडलीच...
छान, आवडली !
छान, आवडली !
शशांक, स्वाद धन्यवाद
शशांक, स्वाद धन्यवाद
फार सुरेख.
फार सुरेख.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
सुंदर! सुंदर!
सुंदर! सुंदर!
धन्यवाद @गौरी
धन्यवाद @गौरी
सुरेख.
सुरेख.
धन्यवाद साद!
धन्यवाद साद!
आहा!! सुंदरच!!
आहा!! सुंदरच!!
आसावरी धन्यवाद
आसावरी धन्यवाद
निळ्या सावळ्या डोहतळाशी
निळ्या सावळ्या डोहतळाशी
अचपळ मासोळी सळसळते
खूप सुंदर
>>>>>अचपळ मासोळी सळसळते
>>>>>अचपळ मासोळी सळसळते
अचपळ - शब्दाचा सुयोग्य वापर. या शब्दाला पुनरज्जीवीत केल्याबद्दल धन्यवाद. कविच करु जाणे. शब्दप्रभू!
धन्यवाद सामो.
धन्यवाद सामो.
अचपळ शब्दाचा नेमका विरुद्धार्थ अनेकदा घेतला जातो.