विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांनी यु ट्य़ूब वर एक नवीन मालिका सुरू केली आहे. संगीत व भाषा या वरील प्रभुत्व ही सर्व रसिकांसाठी मेजवानी आहे. मालिकेची सुरुवात वसंत रागाने केली आहे.
काल बतिया दौरावत ऐकले.
खूप अविस्मरणीय अनुभव होता.आम्हाला भावलेले म्हणजे अत्यंत सुंदर ओघवत्या भाषेत समजावून सांगितलेले निसर्ग आणि संगीताचे आणि त्याच बरोबर भारतीय जनमानसाचे, सणांचे आणि उत्सवांचे नाते. किती सुंदर उपमा आहेत यात! वसंत ऋतूत गाण्यात येणार्या वसंत या उत्तुंग वृक्षावर लडिवाळपणे विहरणार्या बहार वेलीचे फुलणे आणि मग उभयतांनी सर्व माहौल निर्माण करणे... अत्यंत लोभसवाणी तुलना.
अन हो! आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीत बहार आली असे म्हणतो तेव्हा त्याचा खरा अर्थ देखील कळला.
त्याच बरोबर त्या अंबुवा (किती सुंदर अपभ्रंश अंब्याचा!) च्या झाडावर आलेला मोहोत म्हणजे पगवा..... वेडा.... वा~~~! अन हो तो भृंग विसरून कसे चालेल. त्याच बरोबर ती पं. बिरजू महाराजांची सांगितलेल्या आठवणीने तर त्यांच्या बद्दल आदर दुणावला आहे.आणि या आठवणीशी आम्ही समन्वय साधू शकत होतो कारण त्यांच्या नाशिकच्या अशाच आठवणी आमच्या कडे आहेत.
वेगवेगळ्या चीजांचे सादरीकरण खूप श्रवणीय होते तसेच त्या मागील पार्श्वभूमी समजण्यास खूप मदत झाली.
भाषाप्रभुत्व आणि संगीतप्रभुत्व यांचा दुर्मिळ संगम आहे हा पॉडकास्ट! आमच्या सारख्या केवळ कानसेनांना संगीताबद्दल जाणून घ्यायची ही अपूर्व संधी प्राप्त करून दिल्याबद्दल शतश: धन्यवाद!
विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांचा नवीन पॉडकास्ट! भारतीय शास्त्रीय संगीत-- बतिया दौरावत
Submitted by रेव्यु on 8 March, 2023 - 22:24
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, काल ऐकलं...सुंदर.
हो, काल ऐकलं...सुंदर. कोणीतरी व्हिडीओ फॉरवर्ड केलेला. पॉडकास्ट मालिका आहे हे माहित नव्हतं. इथे लिंक द्या ना.
https://youtu.be/U1zYhZKJ7aY
https://youtu.be/U1zYhZKJ7aY
https://youtube.com/
https://youtube.com/@ashwinibdesh
फारच सुरेख आहे हे
फारच सुरेख आहे हे
धन्यवाद. बघतो.
धन्यवाद. बघतो.
केवळ अप्रतिम आहे हे! शब्द,
केवळ अप्रतिम आहे हे! शब्द, भाषा, आशय आणि कंठसंगीत सगळ्यावर प्रेम आणि प्रभुत्त्व कणाकणात दिसतंय.
मजा आली!
सुरेख आहे.
सुरेख आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
बघायलाच पाहिजे.
बघायलाच पाहिजे.
धन्यवाद
धन्यवाद