होळी-धुळवडीचे रंग!

Submitted by छन्दिफन्दि on 5 March, 2023 - 21:46

घराघरांतून येणारे पुरणपोळी चे खमंग वास, छोट्या छोट्या मुलांचे पाण्याबरोबर मनसोक्त खेळणे, झालच तर पिचकाऱ्या, पाण्याच्या फुग्यांची तळी, साग्रसंगीत बांधलेली होळी, भोवतालची रांगोळी, पताका, त्या पवित्र होळीची पुजा, नंतर ठोकलेल्या बोंबा, होळीत भाजलेल्या नारळाची झटापट, लोकगीतां वर धरलेला ठेका.

हा तर होळीचा धवल / पवित्र, निरागस रंग!!

***

कॉलेजचे पहिलच वर्ष. दोन तीन दिवसांपासून सगळ्या seniors मुलींची एकच चर्चा, "आता दोनतीन दिवस कॉलेजात येण्यात काही अर्थ नाही.,ही वाया गेलेली, उडाणटप्पू मुलं रंग, अंडी टाकून हैराण करतात."

" कोणी काही बोलत नाही?"

" ती कशी आहेत माहीत आहे ना? सगळे ह्यांच्या खिशात..management seats आहेत. काय करणार?"

" होळीच्या दिवशी ठीक आहे . पण आधीपासून का? काय दादागिरी आहे?"

गेल्या कॉलेजला. कॉलेज मध्ये तर सगळं नॉर्मल होतं. चार साडेचारला कॉलेज सुटल्यावर, हसत खेळत बाहेर पडल्या. एक कॉर्नर वळतायत तोच चाहूल लागली म्हणून मागे बघितल तर हे उडाणटप्पू येत होते.

अंदाज आल्या आल्या धूम ठोकली, पण तेही मागावर, एकीला पकडलच. पकडलं आणि डोक्यावर अंड फोडलं.

अपमानाने, रागाने धुमसत तशाच निघाल्या परत कॉलेजकडे.

हे टोळकं तिकडेच होत, पण त्यांचा अवतार बघून चेष्टा मस्करी सुरू.

तडक HOD na गाठलं, झाला प्रकार सांगितला.त्या

धनदांडग्यांना काय झालं माहीत नाही पण त्यानंतर असा प्रकार परत कधी कॉलेज मध्ये झाला नाही.

हा तर होळीचा क्रांतीरंग!!

***

गल्लीतल्या (१४-१५ वर्षांच्या) मुलीमुलींची होळी. अगदी नैसर्गिक म्हणावी तशी, साधेसे रंग. पिचकाऱ्या. बादल्या भरून पाणी. पाणी संपलं म्हणून आणायला दोघी गेल्या. आणि अचानक बाजूच्या गल्लीत टोळकं आलं.

कधी बोलणं चालणं नाही, ती गुपचूप बाजूला झाली. तर हे तिच्या रोखानेच येऊ लागले. काही कळायच्या आत त्यांनी तिला घेरलं, ती नको नको म्हणत असताना तिच्या अंगाला रंग लावला..

अपमानाच्या धुमसात डोळ्यांना कधी धारा लागल्या तिलाही कळलं नाही. ती तिची खेळलेली शेवटची होळी.

हा झाला होळीचा रसभंग/ भयरंग!

***

एका उच्चभ्रू वस्तीमधील होळी. सकाळपासून स्पीकर ढणाणतोय. २-४ टँकर उभे आहेत. मधल्या लॉन वर प्लास्टिक टाकून चक्क टँकसारखा हौद बनवलाय.

लहान मोठे रंगाने इतके माखलेत की ओळखू येऊ नये.

बाजूला स्टॉलवर थंडाई, बिअर, अनेक विविध खाद्यपदार्थ, सगळी चंगळ चालू आहे.

पुरुष बायका सगळेच बेभान नाचतायत, एकमेकांना रंग लावतायत, त्यानिमित्ताने अंगचटीला जातायत .

अतितलम कपडे, साडी (तिचं नेहेमीचं शालीन) रूप सोडून आज भलत्याच अंदाजात, मधे मधे बरसणाऱ्या मोठ्या मोठ्या टँकरच्या फवार्यानी सगळे अजूनच चेकळतायत, वर "बुरा न मानो, होली है !" चा गजर.

हा झाला होळीचा (बिभत्स) गडद रंग!

ह्या आणि अशा विविध रंगांमधून आपल्या होळीचा रंग आपणच निवडायचा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. बऱ्यापैकी रिलेट करता आला. मुळातच रंग लावून घेणं आवडत नाही. पण लहानपणी त्या पंपवाल्या पिचकार्‍या घेऊन सोसायटीत (खरंतर मर्यादित प्रवेश पद्धतीने :फिदी Happy बालदीभर पाण्यात उगीच थोडा रंग टाकून रंगपंचमी खेळत असू. अनु म्हणतेय तसं ठेवणीतले कपडे (पक्षी जाजाजाजु.) असत.
तरीही आजूबाजूला बीभत्स प्रकार करणाऱ्या माणसांचे तांडे दिसत. अर्थात तेव्हापासून ते आजही या दिवशी संध्याकाळ शिवाय घराबाहेर न पडण्याचा शिरस्ता आहे. वाहनांची सुद्धा वाट लागू शकते हे आता आणखी एक कारण.

लोक खरंच ( टीव्ही किंवा सिनेमा सोडून) पांढऱ्या रंगाचे कपडे घालून रंग खेळतात का???<<<<<
पाण्यात भिजले की पांढरे कपडे बरेच पारदर्शक होतात, त्यामुळे अनवस्था प्रसंग येऊ शकतो. आपल्याला कम्फर्टेबल असतील असेच कपडे घातलेले बरे!

जुने जाडसर डार्क रंगाचे कपडे घालून खेळणं हेच माहिती होतं. पांढरे कपडे पिक्चरमध्येच बघितले Lol

अजूनही इथे सोसायटीत जुने कपडे घालून खेळतात सर्व, पांढरे नसतात. मी हल्ली नाही जात.

अन्जू, श्रद्धा, किल्ली, प्राचीन सगळ्याना प्रतिसादा बद्दल धन्यवाद!

शनिवारी इकडची रंग पंचमी साधारण ६०-७० लोकांच्या ( शाळेतील मुले आणि त्यांचे कुटुंबीय ) यांच्या बरोबर साजरी झाली.

३-४ निरोप अगदी शेवटच्या क्षणापर्यंत , " पांढरे कपडे घालून या. " मी जुने टाकून द्यायचे जाकीट घालून गेले.

सर्व महिला मंडळी / बरेचसे पुरुष पांढरे कपडे घालून आले होते. एखाद्या सणाला जावे तसे थोडे नीटनेटके बघून मी हळूच विचारलं " रंग खेळणारात ना ?"

किलोंनी रंग ( नैसर्गिक) आणले होते.त्यांची पद्धत एकमेकांना कोरडा रंग लावणे, किंवा तो अंगावर थोडा दुरून (अक्षदा टाकल्यासारखा ) टाकणे. हिरवं गार विस्तीर्ण पसरलेलं गवत, १५-१६ वर्षांची मुलं मुली, त्यांनी मनसोक्त आनंद लुटला, अर्थात मोठ्यांनीही. त्यातच पावसाने सुखद शिडकावा केला.

तर मुख्य मुद्दा जो मला कळला, ते लोक (नॉर्थ इंडियन्स ) सुक्या रंगानीच होळी खेळतात, शक्यतो पांढरे कपडे घालतात, त्यांच्यात पूर्ण केसांपासून पायापर्यंत रंगात नाहून (कोरड्या ) जायची साधारण चुरसच असते म्हणा.

आधी मला पांढऱ्या कपड्यांचं भारी आश्चर्य वाटलं होतं .. त्यांच्या मते ते धुतले की रंग निघून जातात. किंवा ते अगदी साधे किंवा जुने कपडे घालतात कि जे गेले तरी खूप वाईट वाटणार नाही.

सर्व रंग एकत्र केले तर पांढरा रंग तयार होतो, ह्या समजुतीवर आधारित त्यांनी पांढरे कपडे घालायचे ठरवले असतील, म्हणजे सगळे रंग खेळल्यावर ते पांढरेच राहतील. पण हे केवळ पुस्तकी ज्ञान आहे ही माहिती मध्य/दक्षिण भारतीयांना पूर्वीपासून असावी.

प्रकाशातले सात रंग एकत्र आले तर पांढरा रंग दिसतो पण प्रत्यक्षात ते रंग एकत्र केले तर करडा किंवा काळा (ish) रंग दिसतो.

ह्या वर्षी अजून काही नवीन गोष्टी, पद्धती आणि गमतीशीर माहिती मिळाली.
उत्तरेत दिवाळी सारखाच होळी हा एक अतिश य लोकप्रिय उत्सव आहे. आपल्याला माहीत आहेच की उत्तरेत तर हा सण खूपच जास्त लोकप्रिय आहे.
विशेषकरून मथुरा आणि वृंदावन मध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात होळी साजरी केली जाते. आपल्याकडे पुरणपोळी असते तर त्यांच्याकडे गुजिया - खव्याची करंजी.

बरसाना आणि वृंदावन इकडे साधारण एक असाठवडा आधी 'लठमार होळी' खेळली जाते.
म्हणजे गावातल्या बायका नवऱ्याला लाठीने मारतात.. Proud Proud Proud
बरसाना हे राधेच गाव.पूर्वी म्हणे कृष्ण आणि त्याचे सवंगडी ह्यांना रंग, पाणी वगैरे लावायला येत, त्रास द्यायला येत तेव्हा ह्या गोपिका त्यांना लाटण्यानी मारून गावाबाहेर नेत... त्यावरून तेव्हापासुन इकडे ही प्रथा सुरू झाली.

बंगाल मध्ये , खास करून शंतिनिकेत मध्येही मित्या प्रमाणावर रंग खेळतात.. वसंतोत्सव.

Pages