महाराष्ट्रात कुठल्याही न्युज चँनलने मेघालय ,त्रिपुरा, व नागालँड येथील निवडणुकीचे सखोल विश्लेषण केले नाही(बहुतेक वरून आदेश नसावा कारण मग विजयाचा डांगोरा किती खोटा आहे हे जनतेला कळले असते )पण भाजपने मात्र काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि भाजप विजयी झाला असे चित्र निर्माण करत खोट्या विजयाचा डांगोरा पिटला तसे या बाबतीत महाराष्ट्रात भाजप नेते पटाईत आहेतच म्हणा पण विजयाचा डांगोरा पिटतांना कोणत्या राज्यात भाजपला किती जागा मिळाल्या हे मात्र सोईस्कररीत्या सांगायला विसरले।
मेघालयमधे एकुण जागा 59 भाजपला जागा मिळाल्या 2.
त्रिपुरा एकुण जागा 60भाजपला जागा मिळाल्यात 32.
नागालँड एकुण जागा 60 भाजपला जागा मिळाल्यात 12 .
या तीन्ही राज्यातील 179 उमेदवारांपैकी भाजपचे फक्त 46 उमेदवार विजयी झालेत आणि काँग्रेसला तेथील मतदारांनी नाकारत फक्त आठ उमेदवार विजयी झाले हा काँग्रेससाठी करारा झटका दिला याचाच अर्थ त्रिपुरा सोडल तर कोठेही भाजपचा विजय झाला नाही. स्वबळावर फक्त त्रिपुरातच भाजपने विजय मिळवला,पण मेघालय आणि नागालँड मधे जर भाजपने युती केली नसती तर तेथे भाजपचीही स्थिती काँग्रेस सारखीच झाली असती सरकार भलेही भाजपची बसतील पण त्रिपुरा सोडल तर कोठेही स्वबळावर भाजपच सरकार नसेल हे सत्य आहे मात्र त्रिपुरातील भाजपचा हा स्वताचा विजय आहे हे मान्य करावेच लागेल.पण ईतर दोन्ही राज्यात भाजपचा नाही तर फक्त आणि फक्त प्रादेशिक पक्षांचा वरचष्मा दिसुन याची तो आहे आणि तेथे ना भाजपला ना काँग्रेस पक्षाला स्थान आहे हेही स्पष्ट होत आहे त्यामुळ काँग्रेस वा भाजपने यातुन धडा घेणे आवश्यक आहे कारण जर प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्ष बळकट झाले तर केंद्र सरकार हे निरनिराळ्या पक्षाचे घटक सरकार असेल आणि हे पक्ष स्वबळावर केंद्र सरकारला ब्लँकमेल करतील व हे देशहितासाठी घातक ठरेल ।
विजयाचा खोटा डांगोरा काय पिटता।तीन राज्यात भाजपला एकुण जागा किती हेही सांगा।गा
Submitted by ashokkabade67@g... on 4 March, 2023 - 01:15
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्रिपुरा मध्ये टिपरा ने
त्रिपुरा मध्ये टिपरा ने ट्रायबल वोट बरेच घेतले. प्रदयोत मुळे बरंच मत विभाजन झाले ज्याचा फटका कांग्रेस ला बसला.
सांगू की जरा थोड थांबाना ना !
सांगू की जरा थोड थांबाना ना !

किती ती जळजळ. जो जिता वही
किती ती जळजळ.
जो जिता वही सिकंदर. Same applies to Kasba Peth also.
.पण ईतर दोन्ही राज्यात भाजपचा
.पण ईतर दोन्ही राज्यात भाजपचा नाही तर फक्त आणि फक्त प्रादेशिक पक्षांचा वरचष्मा दिसुन याची तो आहे आणि तेथे ना भाजपला ना काँग्रेस पक्षाला स्थान आहे हेही स्पष्ट होत आहे त्यामुळ काँग्रेस वा भाजपने यातुन धडा घेणे आवश्यक आहे कारण जर प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्ष बळकट झाले तर केंद्र सरकार हे निरनिराळ्या पक्षाचे घटक सरकार असेल आणि हे पक्ष स्वबळावर केंद्र सरकारला ब्लँकमेल करतील व हे देशहितासाठी घातक ठरेल >>>>>>>
म्हणजेच इथे महाराष्ट्रात काँग्रेस ने राष्ट्रवादी ला आणि भाजप ने सेनेला संपवले पाहिजे !
हो ना ?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
महाराष्ट्रात कुठल्याही न्युज चँनलने मेघालय ,त्रिपुरा, व नागालँड येथील निवडणुकीचे सखोल विश्लेषण केले नाही(बहुतेक वरून आदेश नसावा कारण मग विजयाचा डांगोरा किती खोटा आहे हे जनतेला कळले असते >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
महाराष्ट्रातील न्यूज चॅनल्स काँग्रेस , राष्ट्रवादी , आणि सेनेची भलामन करत असतात , हे आत्ता पर्यंत तुमच्या लक्षात आले नाही ? कमाल आहे .
त्यांच्या बातम्या बघा ना !
सतत भाजपला दणका आणि ठाकरे ना दिलासा स्वरूपाच्या असतात .
स्थानिक प्रश्नाकडे जे स्वतःला
स्थानिक प्रश्नाना जे स्वतःला राष्ट्रीय पक्ष समजतात ते काँग्रेस आणि bjp गंभीर पने घेत नाहीत.
राज्यसरकार ना त्यांच्या मर्जी नी काम करून देत नाहीत.
त्या मुळेच प्रादेशिक पक्षांची गरज प्रतेक राज्यांना वाटते.
आणि प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व हे त्या मुळेच आहे.
आघाडी सरकार मुळे देशाला काही धोका वैगेरे नाही.
उलट एकपक्षीय केंद्र सरकार च देशासाठी धोकादायक ठरू शकते.
सेना प्रादेशिक होती तो पर्यंत
सेना प्रादेशिक होती तो पर्यंत फॉर्म मध्ये होती त्यांस राष्ट्रीय होण्याची घाई झाली त्यांचे महत्व संपले.
TMC असेल किंवा तमिळ ,केरळ किंवा बाकी राज्यातील पक्ष त्यांनी त्यांचे प्रादेशिक पण सोडले नाही.
म्हणून ते आज पण मजबूत आहेत
तीच अवस्था आप ची देखील होणार
तीच अवस्था आप ची देखील होणार आहे .
येथील आप प्रेमींना कदाचित वरील वाक्य आवडणार नाही , पण कजरूद्दिन ज्या स्पीड ने कोलांटउड्या मारतोय ते पाहता आप चा शेवट जवळ च येईल असे वाटते .
आप दिल्ली पुरतीच ठीक आहे .असे
आप दिल्ली पुरतीच ठीक आहे .असे माझे पण मत आहे.
.
Jharkhand मध्ये एक जागा होती
Jharkhand मध्ये एक जागा होती ती ajsu जिंकली.
महाराष्ट्र मध्ये दोन जगा होत्या.
एक bjp, एक काँग्रेस.
तामिळनाडू मध्ये 1 जागा.
काँग्रेस जिंकली.
बंगाल मध्ये एक जागा होती.
जिंकली काँग्रेस.
फक्त अरुणाचल ची एक जागा bjp जिंकली.
मेघालय फक्त दोन जागा bjp., काँग्रेस 5.
नागालँड.
Bjp 12.
NDP 25.
.
फक्त त्रिपुरा मध्ये च bjp ल यश मिळाले आहे.
पण भारतीय मीडिया असे काही सांगत आहे जसे bjp चीच सर्व ठिकाणी जिंकली आहे.
भ्रम पसरवत आहे मीडिया
स्थानिक पक्ष प्रबळ असतील तर
स्थानिक पक्ष प्रबळ असतील तर कशाला जिवाला त्रास करून घ्यावा?
फुरोगामी तीन एम प्लस एक भाजप
फुरोगामी तीन एम प्लस एक भाजप प्रणित स्वयंघोषित समाजसेवक यांच्या बळावर सत्तेत आलेल्यांनी मिडिया विकत घेणाऱ्यांनी अशी भाषा करु नये उगा मोदीजींना राग आला तर ईडी नाही तर सिबिआय माग लागायची ।आजच म्या बातमी वाचली की कर्नाटकात कोना आमदाराच पोट्ट नोटांच्या गादीवर झोपत व्हत म्हने नी ईडीले खबरभी नाय लागली तवा ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हननारा नी
महाराष्ट्रातला 007 जेम्सबाँडभी गपगुमान झोफले व्हते ।कावून त त्यो आमदार भाजपचा व्हता म्हनून ।
काय फरक पडतो? निवडलेल्या
काय फरक पडतो? निवडलेल्या लोकांच्या मागे ED/CBI/ IT यांचा ससेमिरा लावल्यावर त्यांचा विरोध किती दिवस टिकतो हे महत्वाचे आहे.
कुठलेही ठोस कारण नसतांना, आप चे मनीष सिसिदिया यांच्या मागे CBI चे फासे करकचून आवळलेत. विचारायला CBI कडे काहीच प्रश्न नाहीत, तेच ते प्रश्न अनेकदा विचारत बसायचे आणि मानसिक छळ करायचा. आता वेळेत चौकशी पुर्ण करता न आल्याने, CBI कस्टडी वाढवून मागत आहे.
थोड्या बहुत फरकाने अशीच परिस्थिती इतरत्र आहे. महाराष्ट्रातले संजय राऊत, आव्हाड, देशमूख यांनी सामना केलेला आहे.
१२-१६ तास x काही दिवस अशा चौकशा चालवतात. विरोधकांना संपवण्यासाठी किती खालची पातळी गाठायची याला काहीच मर्यादा भाजपाने ठेवलेली नाही.
भ्रष्टाचार्यांवर कायद्याच्या चौकटीत कारवाई होत असेल तर त्याला विरोध व्हायचे कारण नाही. पण येथे तो मुद्दा नाहीच आहे, विरोधी विचारांना "संपविणे" हा एक आणि एकच उद्देश असतो अशा छळाचा. आरोपीने भाजपाचे निशाण हाती घेतल्यावर या भ्रष्टाचार्याच्या चौकशा तत्काळ थांबतात आणि CBI / ED/ IT ला पुढचे टारगेट दिले जाते.
https://twitter.com/Jairam
https://twitter.com/Jairam_Ramesh/status/1632643884319735808
मेघालय मध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या़च्याबरोबरच
भाजप युती करतो आहे.
यात नवीन काय म्हणा?
केरळ मधील कमुनीच पार्टी वर
केरळ मधील कमुनीच पार्टी वर काँग्रेस ने भ्रष्ट्राचार चे आरोप केले आहेत .
तीच काँग्रेस त्रिपुरा मध्ये त्याच कमूनीच पार्टी बरोबर एकत्र येवून निवडणूक लढवत होती .
भाजप वर आरोप करण्या अगोदर ज्याची तळी भरता ती काँग्रेस तरी शुद्ध आहे का याची खातर जमा करत जा !
थोडक्यात bjp आणि काँग्रेस
थोडक्यात bjp आणि काँग्रेस दोन्ही पक्षात भ्रष्ट कारभार करण्याची वृत्ती आहे.
Bjp चे असे काही वेगळेपण नाही.
मेघालय हे सगळ्यात जास्त
मेघालय हे सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी राज्य आहे - अमित शहा
https://timesofindia.indiatimes.com/india/vote-for-bjp-to-bring-growth-t...
आता इथे किती खोके एकदम ओके झाले?
माझं म्हणणं आहे की चौकशीसाठी
माझं म्हणणं आहे की चौकशीसाठी फक्त एक दिवस/सहा तास बोलावता येईल आणि अधिक चौकशीसाठी पंधरा दिवसांनंतर बोलावता येईल असा कायदा करून टाकावा. म्हणजे थोडा चाप बसेल.
<<त्यो आमदार भाजपचा व्हता
<<त्यो आमदार भाजपचा व्हता म्हनून >>
अहो ३० वर्षे काँग्रेस सत्तेत असताना काय काय प्रताप घडले त्यामानाने हे काहीच नाही.
त्यातून भारतीय जनता -
बाहेरून क्रूर मुसलमान आले, त्यांचे सर्व अत्याचार सहन केले, त्यांनी आपली मंदिरे पाडली, जबरदस्तीने धर्मांतर केले तरी त्यांचेच पाय चाटले, नंतर ब्रिटिश आले त्यांचे सर्व अत्याचार सहन केले, त्यांनीहि आपली संपाति आपल्या डोळ्यादेखत लुटली तरी त्यांचे पाय चाटले,
आता कोंग्रेस, भाजप निदान आपलेच लोक आहेत नि मुसलमान नि ब्रिटिशांपेक्षा पुष्कळ बरे आहेत, जे काय करायचे ते देशातच करतात.एके काळी काँग्रेसने जनतेला लुबाडले आता दुसरे कुणितरी तेच करताहेत.
जनतेत काही दम नाही कुणाला सरळ करण्याचा.
गुन्ह्यांचा अभ्यास केला तर हे
गुन्ह्यांचा अभ्यास केला तर हे स्पष्ट होईल.
खून, बलात्कार, फसवणूक,संपत्ती हडप करणे.
ह्या सारख्या गुन्ह्यात जवळची च लोक सहभागी असतात.
ज्यांच्या शी जवळचे नाते असते.
ब्रिटीश काळात ब्रिटिश न पेक्षा भारतीय च जे त्यांचे सेवक होते त्यांनीच जास्त अत्याचार भारतीय लोकांवर केले असणार.
मुस्लिम होते किती संख्येने.
त्यांचे सरदार,सैनिक सर्व हिंदू च .
अत्याचार करायला तेच आघाडीवर होते.
यालाच भारतीय उच्च संस्कृति
यालाच भारतीय उच्च संस्कृति किंवा महान परंपरा म्हणतात का?
म्हणजे शेवटी हजार वर्षे भारतीय जनता अशीच वागते? मग आत्ताच कशाला आरडाओरडा?
चालू द्या चालले आहे ते, भारत महान होतोच आहे की. गेल्या ३० वर्षात भारताने जी प्रचंड प्रगति केली आहे त्यापुढे असले प्रकार नगण्य.
काही लोक बोंबलतात. फरक काही पडत नाही.
राष्ट्रवादी नी दोन दगडावर पाय
राष्ट्रवादी नी दोन दगडावर पाय ठेवले आहेत.असे जाणवत आहे.
राष्ट्रवादी ही bjp सरकार टीका सुद्धा करत नाही.
अजित पवार विरिधी पक्ष नेते आहेत पण bjp virodhi statement ते कधीच देत नाहीत.
विधान सभेत पण त्यांनी सरकार वर टीका केली नाही.
उगाचच फालतू विषय बोलत होते.
सरकारी कार्यक्रमात जे राजकीय कार्यक्रम नसतात.
त्या मध्ये राष्ट्रवादी चे कार्यकर्ते हजर असतात.
असे एक मला वाटत.
कोणत्या ही कार्यक्रमाला लोक स्वतःचे पैसे खर्च करून जात नाहीत.
कोणी तर तो कार्यक्रम स्पॉन्सर केलेला असतो.
सरळ आहे सरकारी कार्यक्रम सत्ताधारी मंडळी च स्पॉन्सर करतात.
हे असे साटे लोटे दिसत आहे.
Bjp ला काहीच जागा कमी पडल्या शिंदे गटाला योग्य जागा जिंकता आल्या नाहीत तर राष्ट्रवादी bjp ला पाठिंबा देईल
शिंदे ना बाजूला केले जाईल.
अशी मला तरी शंका येत आहे.
दात पडलेल्या सिंहाला ससा पण भित नाही अशी अवस्था ठाकरे ची झाली आहे.
बघुया काय घडत ते
BJP. -- Party with
BJP. -- Party with indifference (to all types of corruption)
काय राजे हो हे चर्चा !
काय राजे हो हे चर्चा !
पक्षीय राजकारण अन् एजेंडा चालवण्याचे सोता सोताचे सवतंत्र होय परतेकाले पर इथं लेक लैच पर्सनल होते लोकं !
एकंदरीत, ह्या साईटवर अँटी भाजप "फोर्सेस" बमच मजबूत वाटतेत, अश्याच एका दुसऱ्या सायटी वर "राईट विंग" निस्ती भनभन करत रायते.
करेनात का न का जी, साईटी काही माह्या बुड्याच्या नोत, निस्त एक निरीक्षण होय हे.
आता आमी इथं उजवे अन् तिथं डावे / काँग्रेसी होयाले मोकडे हाओत.
<< काय राजे हो हे चर्चा !
<< काय राजे हो हे चर्चा !
पक्षीय राजकारण अन् एजेंडा चालवण्याचे सोता सोताचे सवतंत्र होय परतेकाले पर इथं लेक लैच पर्सनल होते लोकं !
एकंदरीत, ह्या साईटवर अँटी भाजप "फोर्सेस" बमच मजबूत वाटतेत, अश्याच एका दुसऱ्या सायटी वर "राईट विंग" निस्ती भनभन करत रायते.
करेनात का न का जी, साईटी काही माह्या बुड्याच्या नोत, निस्त एक निरीक्षण होय हे.
आता आमी इथं उजवे अन् तिथं डावे / काँग्रेसी होयाले मोकडे हाओत.
नवीन Submitted by इत्यादी इतिहासकार on 21 March, 2023 - 11:57 >>
------- भाजप फोर्सेस पण मजबूत आहे, संधीची वाट पहात असतात, पण मोदीशा काही संधी देत नाही. मागच्या ९ वर्षात भक्तांची घोर निराशा झालेली आहे म्हणून शांतपणे वाचत असतात. कुंपणच शेत खात आहे, तक्रार कुणाकडे करणार बिचारे?
भ्रष्टाचार गाडणार होते पण येथे भाजपाच्याच आमदारांनी कोट्यावधी रुपये बाळगल्याच्या व्हिडिओ फिती बाहेर आल्या. भ्रष्टाचार शिरोमणी नारायण राणे यांना भाजपाने केंद्रात मंत्रीपदाने सन्मानीत केले. तिकडे हिमंता बिस्वा सरमाला तर मुख्यमंत्री बनवले... यांच्यावर अनेक वेळा भ्रष्टाचाराचे गंभिर आरोप केलेले आहेत. त्यांना ED/ CBI/ IT चा धाक दाखवून भाजपात घेतले आणि आता ते पवित्र झाले. भाजपा प्रवेश केल्याने भ्रष्टाचारी पवित्र कसा झाला?
भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नोटाबंदी आणली (कशासाठी आणली हे बोकिलांनाही माहित नाही)... कुठल्या एकाच राज्यातून जास्त काळा पैसा मिळाला? नोटाबंदीच्या आधी होत्या त्यापेक्षा जास्त नोटा आज २०२३ मधे बाजारांत फिरत आहेत.
१५ लाख रुपये देणार होते, कोट्यावधी लोकांना नोकर्या देणार होते ( प्रत्यक्षात ७० वर्षातला बेरोजगारीचा उच्चांक गाठला), महागाई कमी करणार होते... यापैकी काहीही दिले नाही....
विमान बनवण्याचा कुठलाही पुर्वानुभव नसणार्या रिलायन्सला विमाने बनविण्यासाठीच्या राफेल कंत्राटामधे सामिल करण्यासाठी फ्रान्सला अट घातली... राजहट्टच होता तो.
तिकडे मोरबी ( गुजरात) मधे घड्याळ दुरुस्त करणार्या कंपनीला पूल दुरुस्तीचे कत्राट दिले. राज्यात/ शहरांत २०- २५ वर्षे भाजपाचे सरकार आहे.... कुठ भाजपा राज्यात भ्रष्टाचार होतो, पण त्यावर भक्तांना चर्चा करण्याचे, आत्म परिक्षण करण्याचे धाडस ही होत नाही.
एकेकाळी संस्कृती रक्षणाच्या गप्पा मारणारा पक्ष... आज खून आणि बलात्काराच्या आरोपींना तुरुंगातून सोडल्यावर त्यांच्या स्वागतासाठी हार-तुरे, त्यांची चक्क आरती... त्या बलात्कार्याला तर एव्हढे हार घातले कि तो त्या वजनाने वाकला आहे.
तुम्ही काँग्रेस गटाचे वाटू
तुम्ही काँग्रेस गटाचे वाटू राहले मले उदयजी, चांगले होय.
अलग विचार अन् समतोल चर्चा मानसायले समृद्ध करते, बघू, तुमच्या संग चर्चा कऱ्याले मजा येईन अशे वाटते.
पर एकंदरीत कशे होय उदय भौ का इंटरनेट वर मेगाबायटी लिवून लोकायचे मत बदलत नसते हे लैच बारक्या वयात मले तरी समजले, त्याच्यानं इथल्ले चर्चासत्र फक्त टाईमपास होय, मह्यासाठी तरी.....पर तरी बी तंबाखू चोडत चर्चा कऱ्याले काईच जात नाई आपलं बी.
विजयाचा खोटा डांगोरा काय
विजयाचा खोटा डांगोरा काय पिटता।तीन राज्यात भाजपला एकुण जागा किती हेही सांगा।गा
हे एमपीएससी निबंधाच्या लांबीचे टायटल तर लैच खास बनेल होय. पर महा एक लैच बेसिक प्रश्न होय
भाजप पार्टी विथ difference नाई
त्याहीले विधिनिषेध नाई
मंग त्याहीले हा प्रश्न ईचारून कोनी वायली तुर सोंगली आपुन?
त्याहीनं त किती शिटा आल्या अन् गेल्या ते पाहलेच पाहले
पर आखरी सवाल एकच होय
"सत्ता कोनी स्थापन केली ?"
सत्ता मुघलांनी पण स्थापन केली
सत्ता मुघलांनी पण स्थापन केली होती , ब्रिटिशानी आणि काँग्रेसनी पण , झालं तर पुतीन, नेत्यानाहू, इम्रान खान
थोच तर विषय होय, ते काय
थोच तर विषय होय, ते काय म्हणते बुआ
हा
बळी थो कान पिडी.
बाकी, बाईडन विसरले गड्या तुम्ही लिस्ट मदी
एकंदरीत, ह्या साईटवर अँटी
एकंदरीत, ह्या साईटवर अँटी भाजप "फोर्सेस" बमच मजबूत वाटतेत,>> अचूक निरीक्षण आहे. यासाईटवर भाजपवाले फारच कच्चे लिंबू वाटतात.
तुम्ही काँग्रेस गटाचे वाटू राहले मले उदयजी,>> अहो ते आघाडीचे सेनापती आहेत. त्यांच्या समोर टिकणं सोपं नाही.
विजयाचा खोटा डांगोरा काय पिटता।तीन राज्यात भाजपला एकुण जागा किती हेही सांगा।गा>> मला हा कवितेचा धागा वाटला होता.
इतिहासकार सर तुम्ही पण जुने खेळाडू दिसतात.
इतिहासकार.
इतिहासकार.
कोणी काँग्रेसी किंवा bjp samarthak नसतो.
स्व स्वार्थ हा घटक कार्य करत असतो.
देश,धर्म, राज्य ही फक्त साधन आहेत.
.
हिंदू धर्म संकटात ही bjp ची निती असते.
रोज हिंदू धर्माचे एक पण नियम न पाळणारे पण जन्माने हिंदू असणारे .
Bjp ला पाठिंबा देतात .
त्यांचा धर्म वाचवणे हा हेतू नसतो.
ह्या धर्माच्या नावावर जो समूह बनेल त्या मध्ये जो फायदा आहे तो त्या व्यक्ती च स्वार्थ असतो.
हेच सर्व धार्मिक, जातीय पक्षणा लागू आहे.
जाती वर आरक्षण पूर्ण जगात कुठे नसेल पण आपल्या देशात आहे.
त्यांचे कोणावर च प्रेम नसते.
संविधान शी काही देणेघेणे नसते.
फक्त टोळ्या बनवून फायदा लाटणे हा एकमेव हेतू असतो.
हे सर्वांना लागू आहे.
Bjp ल पाठिंबा देवून संरक्षण मिळते म्हणून तिकडे सर्व पळत आहेत.
स्थिती बदलली की हीच लोक काँग्रेस कडे असतील.
सर्व स्वार्थ चा खेळ आहे.
कर्ज माफी.
इत्यादी.
इत्यादी .
स्वार्थ नुसार प्रेम असते.
उदाहरण म्हणून.
उदाहरण म्हणून.
इथे पुरोगामी म्हणून आयडी आहेत.
Bjp चे कट्टर समर्थक.
हिंदू राष्ट्र हे bjp चे ध्येय.
पुरोगामी हिंदू धर्माचे काटेकोर पालन करूच शकत नाहीत.
राष्ट्रवाद.
हे bjp चे लाडके प्रचार तंत्र.
स्वतःच्या जीवनात देशहित हाच ध्यास असणारा फक्त एक व्यक्ती शोधून दाखवा जो ते कृतीत पण उतरवत आहे
प्रतेक व्यक्ती रोज देशाचे काही तरी नुकसान स्वार्थ साठी करतो.
देशाची फसवणूक करूनच श्रीमंत होता येते.
त्या मध्ये ना bjp mage आहे ना बाकी भारतीय..
त्या राष्ट्रवाद ला काही अर्थ नाही.
काँग्रेस समर्थक.
जातीय आरक्षण.
राजकीय जातीय आरक्षण हा त्यांचा अजेंडा.
मग ते सर्व लाभार्थी त्यांचे समर्थक.
देश हिता शी काही देणे घेणे नाही.
ही फक्त किरकोळ उदाहरणे.
एकंदरीत, ह्या साईटवर अँटी
एकंदरीत, ह्या साईटवर अँटी भाजप "फोर्सेस" बमच मजबूत वाटतेत >>
इथे दोन्ही भरपूर होते. अजूनही असतील पण राइट वाले एकतर सोडून गेलेत, किंवा लिहीत नाहीत फार आजकाल. तसे राइटविरोधीही अनेक सोडून गेलेत पण सध्या पारडे अॅण्टी भाजप जड आहे 
फुल राइट वाले व फुल लेफ्ट वाले दोन्ही साइट्स माहीत आहेत
प्रचंड एकतर्फी चालते तेथे.
आता आमी इथं उजवे अन् तिथं डावे / काँग्रेसी होयाले मोकडे हाओत. >>
हो कोठेही एका बाजूला पारडे कलले की ते धरून मध्यावर आणावे 
पक्ष पडला मोडला की सुधारतो.
पक्ष पडला मोडला की सुधारतो. पण . . . मोडल्याचं कबूलच करत नाहीत.
काही नेत्यांच्या खाकोटीतल्या फोल्डरांत दुसऱ्या पक्षांतील नेत्यांच्या कुंडल्या असतात . . .घरच्या लोकांच्याच नसतात.
इथे पुरोगामी म्हणून आयडी आहेत
इथे पुरोगामी म्हणून आयडी आहेत.
Bjp चे कट्टर समर्थक.
हिंदू राष्ट्र हे bjp चे ध्येय.
पुरोगामी हिंदू धर्माचे काटेकोर पालन करूच शकत नाहीत.
>>>>>>>>>>
मी का ?
पण मी तर फूरोगामी आहे
आणि राहिला प्रश्न कट्टर हिंदुत्व बद्दल !
आई वडील अशिक्षित , आणि कट्टर धार्मिक !
त्यांचे आयुष्य गेले शेतात कष्ट करण्यात पण त्यांनी देवावरील श्रद्धा कमी पडून दिली नाही .
पण मी मात्र नेहमी मी कन्फ्युज असतो , की कोणत्या मंदिरात जाऊ ? वर्ष वर्ष हि देवळात जात नाही .
पण ज्यांच्या धर्माचा पायाच अन्याय , अत्याचार, रक्तरंजित
इतिहासाने ठासून भरलेला आहे , ते अजूनही १४ वर्षापूर्वीच्या आदेशाला मानून इतर धर्मियांची डोकी उडवतात ते लोकं आणि त्यांचे बुटलीकर ना विरोध करण्यासाठीच हिंदुत्वाची बाजू घ्यावी लागते .
बाकी काही नाही .....
हिंदू राष्ट्र हे bjp चे ध्येय नाही तर श्रींची ईच्छा आहे
<< तुम्ही काँग्रेस गटाचे वाटू
<< तुम्ही काँग्रेस गटाचे वाटू राहले मले उदयजी, चांगले होय.
अलग विचार अन् समतोल चर्चा मानसायले समृद्ध करते, बघू, तुमच्या संग चर्चा कऱ्याले मजा येईन अशे वाटते.
पर एकंदरीत कशे होय उदय भौ का इंटरनेट वर मेगाबायटी लिवून लोकायचे मत बदलत नसते हे लैच बारक्या वयात मले तरी समजले, त्याच्यानं इथल्ले चर्चासत्र फक्त टाईमपास होय, मह्यासाठी तरी.....पर तरी बी तंबाखू चोडत चर्चा कऱ्याले काईच जात नाई आपलं बी. Happy
नवीन Submitted by इत्यादी इतिहासकार on 21 March, 2023 - 23:54 >>
------- तुम्हाला हवे असेल तर काँग्रेस किंवा कुठल्याही गटाचे म्हणू शकता , त्याने माझे विचार बदलणार नाही आहेत. जे आहे, जे वाटते ते लिहीतो. कधी चुकलो आहे असे कळल्यावर दुरुस्त करतो / तसा प्रयत्न असतो.
२०१४ पर्यंत ( डॉ. मनमोहन सिंग यांचा अपवाद वगळता) काँग्रेसवर खरपूस टिका केली होती. २०१४ मधे मोदी सरकार आल्यावर त्यांना काही सिद्ध करायला वेळ द्यायला हवा असाच पवित्रा होता. काँग्रेसला एक पर्याय मिळाला आहे असे वाटले होते, पण घोर निराशा केली.
विकास, विश्वास, विनय हे तिघेही हरवले आहेत आणि उरली आहे द्वेषरुपी प्रज्ञा.
टोकाचा धार्मिक द्वेष या शिवाय भाजपाकडे देण्यासारखे काही नाही आहे हे वारंवार दिसून आले आहे.
प्रामाणिक चर्चा करायला नक्कीच आवडेल.
<< एकंदरीत, ह्या साईटवर अँटी
<< एकंदरीत, ह्या साईटवर अँटी भाजप "फोर्सेस" बमच मजबूत वाटतेत >> Happy इथे दोन्ही भरपूर होते. अजूनही असतील पण राइट वाले एकतर सोडून गेलेत, किंवा लिहीत नाहीत फार आजकाल. तसे राइटविरोधीही अनेक सोडून गेलेत पण सध्या पारडे अॅण्टी भाजप जड आहे Happy
फुल राइट वाले व फुल लेफ्ट वाले दोन्ही साइट्स माहीत आहेत Happy प्रचंड एकतर्फी चालते तेथे.
आता आमी इथं उजवे अन् तिथं डावे / काँग्रेसी होयाले मोकडे हाओत. >> Lol हो कोठेही एका बाजूला पारडे कलले की ते धरून मध्यावर आणावे Happy
Submitted by फारएण्ड on 22 March, 2023 - 07:55 >>
----- तुम्ही इथे असल्यावर अँटी भाजपा पारडे जड होणे अशक्य आहे.
इथे उजवे, डावे.
इथे उजवे, डावे.
Bjp विरोधी,bjp samarthak.
Congress विरोधी समर्थक .
सर्व प्रकारचे आयडी आहेत.
पण उजवे,bjp वाले सध्या सायलेंट मोड मध्ये आहेत.
पण आयडी अस्तित्वात आहेत.
मराठी मधील एकमेव मायबोली हे संकेत स्थळ आहे .
जिथे सर्व विचारांचा आदर होतो.
मराठी मध्ये एक अजून संकेत स्थळ आहे.
तिथे फक्त आणि फक्त bjp चे भक्त आहेत.
तेच पोस्ट करतात आणि तेच दिव्य ज्ञान तिथे व्यक्त करत असतात.
लॉजिक झीरो,सत्य झीरो.
सर्व आंधळा कारभार आहे.
विरोधी एक जरी मत मांडले तरी आयडी उडाला च समजा.
Bjp नी bjp साठी निर्माण केलेले ते संकेत स्थळ आहे.
करमणूक म्हणून तिकडे मी जातो.
तिकडेच इथे येतात पण कॉमेंट करत नाहीत .
फजिती होण्याची शक्यता असते .
तिसरे एक पुरोगामी स्थळ आहे.
पण तिथे पण आवाज दाबला जात नाही.
आयडी ब्लॉक केले जात नाहीत.
पॉइंट नी विरोध करतात.
इतिहासकार सर तुम्ही पण जुने
इतिहासकार सर तुम्ही पण जुने खेळाडू दिसतात.
तसं म्हणा बाप्पा लागन त, आपुन किमान नरो वा कुंजरो वा अप्रोच ठेवतो.
आपली गत अल्लग होय, इचिभन भाजपले धुतले का काँग्रेसी अतिरेक आठवते अन् काँग्रेस धुतला का भाजपचे वर्तमान दिसते.
जौद्या, आपून वाचत बसतो, काई लागन त नंतर वेळेनुसार लीहुच ना जी.