मायबोलीकरांच्या सहभागाने आणि प्रोत्साहनामुळे यंदाचा मराठी भाषा गौरव दिन सोहळा दणक्यात साजरा झाला. एकूण ४ उपक्रम, ५ खेळ आणि साहित्यिकांच्या स्मरणार्थ विशेष आमंत्रित लेख यांसह भरगच्च कार्यक्रम २५ जुलै ते १ मार्च ह्या दिवसांत घेतले गेले. मराठी भाषेच्या प्रेमाखातर अनेकांनी उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रमाला शोभा आणली.
यंदाच्या उपक्रमांपैकी स.न.वि.वि. हा उपक्रम सर्वात जास्त लोकप्रिय उपक्रम ठरला. मायबोलीची पत्रपेटी उघडताच मायबोलीकरांनी लिहिलेली काही गमतीशीर, काही हृद्य, काही कल्पक, काही वैचारिक आणि काही धमाल पत्रे वाचायला मिळाली. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या उपक्रमात लिहिल्या गेलेल्या रसग्रहणामुळे अनेक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची माहिती झाली. एका चित्रपटावर दोन वेगळ्या व्यक्तींनी लिहिलेल्या रसग्रहणांत त्या चित्रपटाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पडला, हे विशेष म्हणून नमूद करावेसे वाटते. पाउले चालती या उपक्रमाला कमी प्रतिसाद मिळाला असला तरी सुंदर सचित्र धागे वाचायला मिळाले. किलबिल किलबिल चित्रे डोलती या उपक्रमात आपल्या छोट्या दोस्तांची नावीन्यपूर्ण चित्रकला बघायला मिळाली. आपल्या कानावर पडणार्या गाण्यांची कल्पना ही बालमनावर कशी चितारली जाते ह्याचे प्रत्यंतर त्यांनी काढलेल्या चित्रांत आले.
म्हणींचा खेळ, शब्दखेळ, शब्दशोध, शीघ्रकविता आणि मुद्रितशोधन या बाबतीतल्या सगळ्या खेळांना उत्तम प्रतिसाद लाभला. या खेळांच्या निमित्ताने मायबोलीवर आता म्हणींचा आणि शब्दकोड्यांचा मोठा खजिना तयार झाला आहे असे म्हणावयास हरकत नाही. 'शब्दशोध' या खेळासाठीचे कूटप्रश्न कुमार१ आणि मानव पृथ्वीकर यांनी रचले होते. 'स्मरण साहित्यिकांचे' या उपक्रमासाठी स्वाती_आंबोळे व टवणे सर यांनी जी .ए. कुलकर्ण्यांच्या कथांचे अंतरंग उलगडवून दाखवले. साजिरा यांनी काफ्का या महत्त्वाच्या कथा-कादंबरीकाराची ओळख मायबोलीकरांना करून दिली. या सर्वांचे मनापासून आभार. वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल, तांत्रिक साहाय्याबद्दल आणि दिलेल्या प्रोत्साहनासाठी मायबोली प्रशासनाचे आभार.
ह्या संपूर्ण सोहळ्यात भाग घेणार्या, चर्चा करणार्या, वेळप्रसंगी योग्य त्या सूचना करणार्या, प्रोत्साहन देणार्या आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणार्या सर्वच मायबोलीकरांचे आम्ही ऋणी आहोत. आपल्या मायबोलीचा हा उत्सव दर वर्षी वृद्धिंगत होत राहो अशी इच्छा व्यक्त करून हे संयोजकांचे मनोगत संपवतो.
- अस्मिता., किल्ली, छन्दिफन्दि, तेजो, भरत., हरचंद पालव
सगळ्या संयोजकांचे खूप कौतुक
सगळ्या संयोजकांचे खूप कौतुक आणि अभिनंदन! सहभागी होता आले नाही, पण वेळ काढून जमेल तसं वाचते आहे.
उपक्रम कल्पक होते. त्यासाठी संयोजकांना आणि त्यांत भाग घेणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद !
संयोजक चमूने (अस्मिता.,
संयोजक चमूने (अस्मिता., किल्ली, छन्दिफन्दि, तेजो, भरत., हरचंद पालव) घेतलेल्या अथक परिश्रमाला सलाम. कमी वेळात रंजक खेळ आणि उपक्रम आयोजन केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा उपक्रम राबवताना फार मजा आली होती. खूप दिवसांनी असं मान मोडून आणि मन लावून काम करायला मिळालं. एकदोन धाडसी खेळ मांडताना थोडी धाकधूक वाटली. पण शिवधनुष्य पेलता आलं असं वाटलं.
अस्मिता, किल्ली, छन्दिफन्दि, तेजो, हरचंद पालव - तुमच्यासोबत काम करताना मजा आली. (तुम्हांलाही माझ्यासोबत काम करताना मजा आली ना? होय म्हणा
हा फेब्रुवारी सुरू झल्यापासून प्रशासक स्वयंसेवक पाहिजे म्हणून घोषणा करतील याची वाट पाहत होतो. यंदा संयोजनात भाग घेणं शक्य झालं नसतं. पण उपक्रमात खंड पडलेला पाहून वाईट वाटलं.
असो. मराठी भाषा गौरव दिन २०२४ च्या शुभेच्छा!
हा फेब्रुवारी सुरू झल्यापासून
हा फेब्रुवारी सुरू झल्यापासून प्रशासक स्वयंसेवक पाहिजे म्हणून घोषणा करतील याची वाट पाहत होतो.
उपक्रमात खंड पडलेला पाहून वाईट वाटलं.
असो.
मराठी भाषा गौरव दिन २०२४ च्या शुभेच्छा!
हा फेब्रुवारी सुरू झल्यापासून
हा फेब्रुवारी सुरू झल्यापासून प्रशासक स्वयंसेवक पाहिजे म्हणून घोषणा करतील याची वाट पाहत हो..>>+१
मराठी भाषा गौरव दिन २०२४ च्या शुभेच्छा!
अस्मिता, किल्ली, छन्दिफन्दि, तेजो, हरचंद पालव - तुमच्यासोबत काम करताना मजा आली. (तुम्हांलाही माझ्यासोबत काम करताना मजा आली ना?>>> हो, जेवढं करता आला तो छान अनुभव होता!
होय म्हणा >> म्हणजे काय!
होय म्हणा >> म्हणजे काय! प्रश्नच नाही.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देण्याइतपतच या वर्षी सहभाग
खरोखरच छान साजरा झाला होता
खरोखरच छान साजरा झाला होता मभागौदिन २०२३. यावर्षीही वाट पाहिली हेही खरं.
आणि आता वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला म. भा. गौरव दिवस. (माझी रिक्षा)
आठवणीतल्या कविता
https://youtu.be/S3CjDwXGfuw
मराठी भाषा गौरव दिनाच्या
मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा.
काही जुने धागे वर निघत आहेतच.
काही जुने धागे वर निघत आहेतच. कुणाच्या डोक्यात काही खेळ/ कल्पना असतील तर काढा की एक धागा, म्हणजे नाही पडायचा खंड.
एक इंग्रजी शब्द द्यायचा आणि त्याला सुगम किंवा दुर्गम (तर मग विनोदी हवे) असे शब्द तयार करायचे. आणखी काय सुचत असेल तर लिहा. चालू करू आपण.
मराठी भाषा गौरव दिनाच्या
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मागच्या वर्षीच्या संयोजनाचा अनुभव धमाल होता. किल्लीचा अनुभव दांडगा आहे. तेजो अतिशय गोड मुलगी आहे. ती फारशी दिसत नसली तरी ती सोबतच असते. छंदिफंदींनी छान पोस्टर्स केली.
भरत यांच्या सोबत सर्वात जास्त काम व त्या अनुषंगाने
चर्चा केली. अतिशय संवेदनशील व झोकून देऊन काम करणारे व्यक्तिमत्त्व. ते व्यवस्थित तयारीने आले होते आणि मी उनाड मुलासारखे सरळ उडी घेतली होती. मला व्याकरणाचे नियम अजिबात आठवत नाहीत. त्यामुळे याबाबत सगळी भिस्त भरत आणि हर्पा यांच्यावर होती. हर्पा तर 'मैं और मेरी धातुरूपावली अक्सर ये बाते करते है. शब्दाचे रूप योग्य होते तो ऐसा होता, व्याकरण बरोबर होते तो वैसा होता' आहेत.
भरत नियम बघून चुका दुरुस्त करेपर्यंत लोकांना थोपवून धरणं -वेगळंच काहीतरी बोलून नादी लावणं हे मी केलं. पण भरत झोपी गेल्यावर आणि शंतनू/ हर्पा उठून यायच्या आधी मी एकटीच असायचे तेव्हा टिपापाकर माझा 'अभिमन्यू' करणार होते. त्यांची आणि माझी वेळ एकच होती पण देवकृपेने 'काळ' आला नाही.
व्याकरण, शुद्धलेखन आणि त्या संदर्भातील सगळेच विस्मृतीत गेलेले असूनही मी कशी लढले माझे मलाच माहीत. नारदमुनी सारखे कुठल्याही धाग्यावर प्रकट होऊन त्यांना खेळ पूर्ण करायची आठवण करून दिली. माझा आयडीतून लॉग आऊट करून संयोजकांचा झगा घालून येत-जात राहण्याने माझा 'हम्प्टीडम्प्टी' व्हायची वेळ आली होती.
तोपर्यंत मी त्यांना साध्या गप्पाही मारू दिल्या नाहीत, ते कुठल्याही धाग्यावर गेले की मी कोडं घेऊन हजर व्हायचे. कोडं झूम करून बघावं लागण्यानं अमित म्हणाला 'संयोजकांपायी डोळे जायची वेळ आली'. पण मी संयोजकांचा झग्यात बसून म्हणाले की 'भिंग आणा भिंग'. कोडं पूर्ण होईपर्यंत मी त्यांना श्वासही घेऊ दिला नाही. एवढं सगळं करुन झाल्यावर स्वाती आंबोळे यांनी शिळाच चहा गोड- गोड बोलून देत कौतुक केलं. तो चहा नंतरही अनेक वेळा दिसला. असो. संयोजकांना हॉटेल मॅनेजमेंट सारखं नम्रपणे वागावं लागतं, सगळ्यांपेक्षा जास्त ह्या नम्रतेचा कंटाळा आला होता. पण यामुळे मी मुळची नम्र नाही ही जाणीव झाली. मी स्वतः फार मजा घेतेय हे काही जणांच्या डोळ्यात आले हे मला लक्षात आले पण 'मग मी काय करू' म्हणून सोडून दिले.
समारोप वाचून इतरांनाही मजा आली हे वाचून खूप छान वाटले. पुन्हा भाग घ्यायला नक्कीच आवडेल. आईगं, जीवनगौरव आभार प्रदर्शनच झाले की हे....
>>> एवढं सगळं करुन झाल्यावर
>>> एवढं सगळं करुन झाल्यावर स्वाती आंबोळे यांनी शिळाच चहा गोड- गोड बोलून देत कौतुक केलं. तो चहा नंतरही अनेक वेळा दिसला


घ्या! एवढा कौतुकाने च्या पाजला त्याचं हे फळ!
No good tea goes unpunished म्हणतात ते असं!
अस्मिता
No good tea goes unpunished >
No good tea goes unpunished >>>
Good one.
मला माहीत नसलेल्या वचनालाही जागले मी.
धनुडी,
मी संयोजकांचा झगा घालून 'खेळायला चला' म्हणून वाड्यावर बोलवायला आले तर तू मला ओळखलंही नाहीस. एकेकाळी 'तूमाखमै' म्हणूनही 'संयोजक का बरं सारखं येत आहेत' असं तुला वाटलं म्हणालीस. त्यामुळे मला डुप्लिकेट आयडी काढायची इच्छा झाली, पण अतुलनी मला लगेच ओळखले मग आवरावी लागली.
संयोजक मंडळात भाग घेऊन गौरव
संयोजक मंडळात भाग घेऊन गौरव दिनाचा गोंधळ दिन न केल्याबद्दल रघू आSSक चार्य यांचे खूप खूप आभार.
त्यांना मायबोलीतर्फे सोन्याची रोल्स रॉईस.
मैं और मेरी धातुरूपावली अक्सर
मैं और मेरी धातुरूपावली अक्सर ये बाते करते है >>

मी बाष्पगद्गदित झालो. सगळ्यांच्या कौतुकाला माझ्यातर्फे +१.
शिळ्या चहावरून आठवलं, या चहाला 'शिळा' चहा म्हणता येईल.
अस्मिता
अस्मिता
मस्त रंगलेला मागच्यावर्षी म भा गौरव दिन, कल्पक होतं सर्व.
आपला तो ताजा चहा, यांचा तो
आपला तो ताजा चहा, 'यांचा' तो शिळा चहा.
मैं और मेरी धातुरूपावली अक्सर
मैं और मेरी धातुरूपावली अक्सर ये बाते करते है >>>
No good tea goes unpunished >>>
संयोजकांना हॉटेल मॅनेजमेंट सारखं नम्रपणे वागावं लागतं, >>>
आईगं, जीवनगौरव आभार प्रदर्शनच झाले की हे >>>
मी बाष्पगद्गदित झालो >>> हपा मला वाटले आधी साधा सद्गदित होत होतास पण तेवढ्यात वाफाळता चहा समोर आला
चांगला होता फा
चांगला होता फा
धनुडी, Happy मी संयोजकांचा
धनुडी, Happy मी संयोजकांचा झगा घालून 'खेळायला चला' म्हणून वाड्यावर बोलवायला आले तर तू मला ओळखलंही नाहीस. एकेकाळी 'तूमाखमै' म्हणूनही 'संयोजक का बरं सारखं येत आहेत' असं तुला वाटलं म्हणालीस. त्यामुळे मला डुप्लिकेट आयडी काढायची इच्छा झाली, पण अतुलनी मला लगेच ओळखले मग आवरावी लागली.>>> अय्यो असं झालं का? :कुठे लपवू तोंड म्हणते मी:
शिळ्या चहावरून आठवलं, या चहाला 'शिळा' चहा म्हणता येईल.>>> हर्पा
अस्मिता
अस्मिता
(No subject)
हर्पा, अस्मिता
हर्पा, अस्मिता
अस्मिता, गेल्या वर्षी संयोजन
अस्मिता, गेल्या वर्षी संयोजन गृपातल्या अस्मिता आणि आताचं लिहिलेल्या, दोन्ही एकच का?
तुमचं मनोगत वाचताना ते दिवस पुन्हा अनुभवता आले. तुम्ही ( माझ्याकडच्या) रात्री कशी खिंड लढवत होतात ते सकाळी वाचायला मिळालं आणि क्षणभर, त्यांना खिंडीत रोखून धरायचं नाहीए, आत यायला मदत करायची आहे , असं झालं. पण मजा आलीच. सगळं लुटुपुटीचं तर होतं.
भरत, त्या संयोजनाच्या
भरत, त्या संयोजनाच्या निमित्ताने मला तुमच्याकडून व्याकरणाबद्दल काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. माबोवर बऱ्याच जणांचा मी व्याकरणाचा आग्रह धरतो असा समज आहे. पण मुळात माझंच व्याकरण फारसं चांगलं नाही. मी भाषेतल्या गमती, शब्दांचं मूळ इतपत रुची ठेवून आहे आणि त्यामुळे त्या विषयांवर जास्त बोलतो, पण म्हणजे मी अचूक असतो असं नाही. तुम्ही माझ्या काही चुका सुधारल्या आणि त्यामुळे मी कुठे चुकतो हे ही लक्षात आलं. पुढेही एकत्र काम करायला आवडेल.
ह.पा, मलाही व्याकरणाबद्दलची
ह.पा, मलाही व्याकरणाबद्दलची जाण आणि सजगता मायबोलीच्या उपक्रमांत पडद्यामागून भाग घेतानाच आली.
तुमच्या संस्कृतच्या अभ्यासाबद्दल कुतूहल आणि आदर आहे, हे सांगितलंच आहे.
आता हा धागा mutual admiration club होण्याआधी थांबूया.
लिहा पडद्यामागच्या गोष्टी,
लिहा पडद्यामागच्या गोष्टी, आम्हाला वाचायला मजा येतेय. त्यानिमित्याने सुप्त गुणही समोर येतायेत, आदर वाटतो सर्वांचा.
लिहा पडद्यामागच्या गोष्टी,
लिहा पडद्यामागच्या गोष्टी, आम्हाला वाचायला मजा येतेय. त्यानिमित्याने सुप्त गुणही समोर येतायेत, आदर वाटतो+++१११११ अगदी अन्जू
लिहा पडद्यामागच्या गोष्टी,
लिहा पडद्यामागच्या गोष्टी, आम्हाला वाचायला मजा येतेय. त्यानिमित्याने सुप्त गुणही समोर येतायेत, आदर वाटतो सर्वांचा.
>>>>> +१
यंदा कुठलीही अधिकृत घोषणा
यंदा कुठलीही अधिकृत घोषणा नसताना, कुणीही संयोजक नसताना काही माबोकरांनी उत्स्फूर्तपणे काही उपक्रम सुचवले आणि अन्य माबोकरांनी ते उचलून धरले. मुख्यतः गेल्या वर्षीचा म्हणींचा धागा, नवीन आद्याक्षरांवरून म्हण ओळखा, लेखन घडते कसे, आणि चित्रावरून लिखाण या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. सर्वांनी मिळून स्वतःहून केलेलं या वर्षीचं हे मभागौदि 'साजरीकरण' फारच भावलं. सर्वांचं उत्स्फूर्त व्यक्त होणं पाहून टडोपा.
Pages