चष्मा

Submitted by मंगलाताई on 27 February, 2023 - 03:18

चष्मा
डोळे तपासून चष्मा घेतला
दूरचं बघाव तर काही दिसेना
दिसत होत्या फक्त इमारती
लोंबकळणार्या वायरी
त्यावर लटकलेले सेट अप बाक्स
एखादी टिव्ही ची डिश एवढच .
बोर झालं दूरचं बघून
मग जरा जवळचं बघाव म्हंटल
जवळून बघितलं
हिरवा रंग पाहिला तर मशिद आठवे
भगवा पाहिला तर मंदिर .
इतरही बरेच रंग बघितले आलटून पालटून .
पण
असेच काहीबाही भास
स्पष्ट काही दिसेनासा.
डॉक्टर बदलले .पुन्हा तेच .
डॉक्टर अहो मला जवळचे वेगळेच रंग दिसतात
दूरचं तर विचारूच नका
द्या पुन्हा चष्मा बदलून .
डॉक्टर म्हणाले ,
" मनातले रंग डोळ्यातून चष्म्यावर येताहेत
तिथे ही काच बिचारी काय करणार ."

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults