चित्रपट परीचय-- फ्री गाय

Submitted by मी रावसाहेब on 21 February, 2023 - 06:01

नमस्कार् मंडळी!!
काल स्टार मुव्हीज वर एक मस्त चित्रपट बघितला आणि वाटले की त्याची ओळख करुन द्यावी. तर हा चित्रपट म्हणजे "फ्री गाय" चित्रपटाची गोष्ट साधारण्पणे अशी----

फ्री सिटी हा एक ऑनलाइन व्हिडिओ गेम आहे जो सुनामी गेम्स नावाच्या कंपनीने विकसित केला आहे. पण त्याचा सोर्स कोड वॉल्टर "कीज" मॅकी आणि मिली रस्क यांनी विकसित केलेल्या लाइफ सेल्फ नावाच्या अप्रकाशित गेममधून चोरला गेला आहे. सुनामीचा मुख्य डेव्हलपर अँटवान होवाचेलिकने फ्री सिटी तयार करण्यासाठी तो कोड वापरला आहे. त्यानंतर कीजने सुनामीमध्ये नोकरी स्वीकारली आहे, तर मिली फ्री सिटीमध्ये तिचा अवतार मोलोटोव्ह गर्ल म्हणून घुसली आहे जेणेकरून तिने आणि कीजने लिहिलेल्या कोडचे पुरावे शोधण्यासाठी आणि ते कोडचे योग्य मालक आहेत हे सिद्ध करण्यासाठी तिला काहीतरी करता येईल. गेममध्ये, गाय, एक नॉन-प्लेयर कॅरेक्टर (एनपीसी) बँक टेलर म्हणून काम करतोय आणि तो त्याचा सर्वात चांगला मित्र आणि सहकारी, बँक सुरक्षा रक्षक बडीबरोबर वेळ घालवतो,पण त्याला माहित नसते की त्याचे जग हा एक व्हिडिओ गेम आहे.

एके दिवशी, त्याला मोलोटोव्ह गर्ल भेटते, जी त्याच्या ड्रीम गर्लला आवडेल असे सांगणारे गाणे गात आहे आणि ते ऐकताना गाय त्याच्या मूळ प्रोग्रामिंगपासून विचलित होऊ लागतो. गाय दुसर्‍या एका खेळाडूकडून सनग्लासेसची जोडी घेतो ज्याद्वारे तो त्या खेळाडूच्या हेड-अप डिस्प्ले (एचयूडी) मधून फ्री सिटी पाहतो. गाय जेव्हा मिलीशी बोलतो, तेव्हा त्याला सुरुवातीला वाटते की तो एनपीसी नसून "ब्लू शर्ट गाय" नावाचा आणखी एक खेळाडू आहे. मिली पुन्हा त्याच्याशी बोलण्यापूर्वी त्याला १०० पेक्षा जास्त पॉईंटस् ची पातळी गाठण्यास सांगते. ईकडे कीज आणि त्याचा सहकारी माऊसर यांना गाय हा एनपीसीच्या वेशातील हॅकर वाटतो आणि त्याला गेममधून बंदी घालण्याचा ते अयशस्वी प्रयत्न करतात. पण विध्वंसक कृत्य करण्याऐवजी, गाय चांगली कृत्ये करतो आणि फ्री सिटीमध्ये मिशन पूर्ण करून पातळी १०२ पर्यंत पोहोचतो. या इतर खेळाडूंपेक्षा वेगळी कामगिरी करणाऱ्या त्याच्या प्रगतीमुळे तो जगभर चर्चेत येतो.

दरम्यान मिली स्टॅशमध्ये प्रवेश करते. हे दुसर्या खेळाडूचे चांगले संरक्षित फिल्ड असते ज्यात तिच्या सोर्सकोडचे पुरावे असतात. ईथे मिली आणि गाय पुन्हा भेटतात, आणि गाय मिलीला स्टॅशमधून पळून जाण्यास मदत करतो. पण नंतर जेव्हा गाय तिला किस करायला येतो तेव्हा मिली आश्चर्यचकित होते. मात्र कीज ओळखतो की गाय खरोखर एक एनपीसी असला तरी त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कोडमधून ही प्रेमाची भावना निर्माण झाली आहे .कारण मिलीच्या वैयक्तिक आवडीनिवडी कीजने लाइफमध्ये समाविष्ट केल्या होत्या, आणि त्या ओळखुन गायला मिलीमध्ये रस निर्माण झाला आहे.

याव्यतिरिक्त, गायच्या इतर एनपीसीशी झालेल्या संवादामुळे त्यांनाही आत्म-जागरूकता येत आहे. इकडे कंपनीला दोन दिवसांत फ्री सिटी २ हा सिक्वेल तयार करायचा आहे. पण त्या आधीच सुनामीच्या सर्व्हरमधून कोड पुसण्यापूर्वी मिलीला त्यांचा कोड परत मिळविण्यात मदत करण्याचे कीज ठरवतो. ईकडे मिली गायला त्याच्या परिस्थितीची सत्यता सांगते की तो एन पी सी आहे आणि हे सगळे आभासी जग आहे. पण ती मात्र खरी आहे. तथापि, परिस्थितीबद्दल बडीशी बोलल्यानंतर, गायला उमजते की त्यांच्या नात्यात प्रेमापेक्षा काहीतरी जास्त आहे. गाय मिलीकडे परत येतो आणि तिला मदत करण्यास तयार होतो.

ईकडे या सगळ्यामुळे घोटाळ्यामुळे त्रासलेला आणि आपली सोर्स कोडची चोरी पकडली जाउ नये म्हणुन जंग जंग पछाडणारा व्हिलन गायची लोकप्रियता बघुन पिसाळतो आणि त्याला कंट्रोल करण्याचा पुर्ण प्रयत्न करतो. तो फसल्यावर फ्री सिटी या गेमचे सर्वर रिबूट करुन गाय च्या डोक्यातील प्रोग्राम पुसुन टाकतो आणि गेम पुन्हा सुरु करतो. आता गाय सगळे विसरला आहे, तो मिली ला सुद्धा ओळखत नाही. पण मिली पुन्हा कॅरेक्टर बनुन त्याला भेटते आणि किस करुन प्रेमाची भावना पुन्हा जागवते. आता गायचे डोके म्हणजे ए आय पुन्हा काम करु लागते आणि जगभरचे त्याचे चाहते सुस्कारा सोडतात. मात्र अधिकच पिसाळलेला व्हिलन गेममध्ये घाइघाइने अजुन एक नवीन कॅरेक्टर निर्माण करतो आणि त्याला गायला मारायला पाठवतो. त्यावरही गाय मात करतो. मग मात्र तो गाय नको आणि तो फ्री सिटी गेमही नको असे ठरवुन व्हिलन सरळ सर्वर रूम् मधे घुसतो आणि कुर्हाडीने सगळॅ सर्वर फोडायला सुरुवात करतो. एकेका सर्वर बरोबर खेळात गायच्या आजुबाजुच्या बिल्डींग, रस्ते, झाडे, मोटारी सगळे नाहीसे होउ लागते. पण गाय आणि बडी धावत सुटतात. त्याना एक पूल ओलांडायचा आहे आणि मग ते खेळातुन बाहेर पडुन मुक्त होणार आहेत. मात्र एका क्षणी बडी मागे राहतो आणि गाय व त्याच्या मध्ये अंतर पडते. खोटा गेम का होईना, पण गायचा तो जिवलग मित्र असतो.गायची घालमेल होते पण बडी त्याला काळजी करु नको, "तू चाल पुढं" असे सांगुन पूलाच्या अलीकडेच अडकुन मरतो. गाय मात्र पुढे पुढे जातच राहतो आणि "फ्री गाय" होतो.

ईकडे मिली सर्वर रूम मध्ये घुसुन व्हिलनला थांबवते आणि त्याला सोर्स कोड चोरल्याबद्द्ल माफ करते. पैशापाठी धावणार्‍या व्हिलनलाही हे ऐकुन धक्का बसतो, पण मग पश्चात्ताप सुद्धा होतो. आता मिली व कीज आणि अजुन एक डेव्हलपर सुनामीतुन बाहेर पडले आहेत आणि स्वतःचे काहीतरी करत आहेत. पण आपले मिलीवर प्रेम आहे हे सांगायचे धैर्य अजुनही किजकडे नाही. शेवटी एकदा त्या गेम च्या प्रोग्राममध्ये काहीतरी बघत असताना मिलीला साक्षात्कार होतो की हे तर सगळे आपल्या खर्‍या जीवनातील आवडी निवडी नुसार कीज ने बनवले आहे. म्हणजे एका अर्थाने गेम मधील गाय हा खर्‍या जीवनातील कीज आहे. आणि मग त्यांचे मिलन होते.

सिनेमात काही प्रसंगात फुसकन हसुही येते. उदा. गायला मारायला व्हिलन ने जे कॅरेक्टर घाईघाईने खेळात घुसवले आहे, त्याचे प्रोग्रामिंग नीट झालेले नाही. त्यामुळे तो संवाद म्हणताना विनोदी प्रकर करतो. उदा. ओळख दाखवायला हात उचलला की तोंडाने "फ्रेंडली जेश्चर" असे म्हणतो. माझ्या ३ आवडीच्या गोष्टी आहेत, फ्राईज, एक्स एक्स आणि टी बी डी (टु बी डिसाईडेड) असे अर्धवट संवाद म्हणतो.

काही काही प्रसंग अचानक जीवनाचे तत्वज्ञान सांगुन जातात आणि डोळ्यात पाणी येते. उदा. गायला नुकतेच समजले आहे की आपण एन पी सी आहोत आणि हे आभासी जग आहे. तो बडीकडे जाउन हे सगळे सांगतो आणि म्हणतो की हे सगळे जर आभासीच आहे तर काय अर्थ राहिला? तेव्हा बडी त्याला म्हणतो की आपण खरे आहोत की आभासी---याने काय फरक पडतो? हा क्षण तर खरा आहे ना? आपली मैत्री तर खरी आहे ना? आणि प्रेक्षकांच्या काळजाची तार छेडली जाते. आजकालच्या रोबोट, चॅट जीपीटी, चॅट बॉट, वर्चुअल आणि ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या दुनियेत कदाचित माणसाला मैत्री करायला माणुस तरी भेटेल का? असे प्रश्न डोक्यात घोंगावु लागतात. आणि आभासी व खर्‍या दुनियेच्या सीमारेषेवर रेंगाळणारा हा सिनेमा तुम्हाला विचार करायला भाग पाडतो.

असो. जमले तर सिनेमा नक्की बघा.आणि परीचय आवडल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरु नका.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults