किलबिल किलबिल चित्रे डोलती..
मायबोली परिवारातील छोट्या मित्रांनो,
मायबोलीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे आणि त्यात तुमचाही सहभाग आवश्यक आहेच.
बालपण म्हणजे खाऊ, खेळ,गाणी,गोष्टी , चित्रे आणि असे बरेच काही!
तर या वर्षीच्या उपक्रमात तुमचे आवडते मराठी गाणे तुम्ही चित्ररूपाने मांडायचे आहे.
नियम
१.कोणतेही मराठी बालगीत ,कविता निवडा आणि त्यावर आधारित चित्र काढा. चित्राचा आकार,माध्यम, रंग याला कोणतेही बंधन नाही
२. वयोगट - १५ वर्षांपर्यंत
३. एकातरी पालकाने मायबोलीचे सदस्यत्व घेतलेले असावे.
४. एका सदस्याला कितीही चित्रे देता येतील.
५. चित्रे पूर्वप्रकाशित नसावीत.
६. मायबोली मराठी गौरव दिन २०२३ या ग्रुपचे सभासदत्व घेऊन त्यात लेखनाचा धागा उघडावा.
७. धाग्याचे शीर्षक मराठी भाषा गौरव दिन - किलबिल किलबिल चित्रे डोलती - सदस्याचे नाव - पाल्याचे नाव असे द्यावे.
८. मजकुरात पाल्याचे नाव , वय . चित्राचे माध्यम आणि निवडलेले गाणे / कविता यांची पहिली ओळ लिहावी.
९ धाग्याला शब्दखूण 'मराठी भाषा गौरव दिन २०२३' अशी द्यावी.
१०. धागा सार्वजनिक करावा. {Group content visibility ->Public :accessible to all site users}
७. २५ फेब्रुवारी २०२३ ते १ मार्च २०२३ या पाच दिवसांत सादर करावे.
बालमित्रांनो, मायबोलीकर तुमच्या चित्रांची वाट पाहताहेत. लागा बरं तयारीला!
हाही उपक्रम छान!
हाही उपक्रम छान!
छान मजेशीर आहे. चटचट बालगीते
छान मजेशीर आहे. चटचट बालगीते आणि युट्यूब विडिओ आठवले..
छान उपक्रम. सहभागी व्हायला
छान उपक्रम. सहभागी व्हायला आवडेल
या उपक्रमात लहान मुलांच्या
या उपक्रमात लहान मुलांच्या साठी चलत चित्र असलेला युट्युव व्हिडीओ चालेल ना ?
नमस्कार नितीनचंद्र . या
नमस्कार नितीनचंद्र . या उपक्रमात मुलांनी स्वतः चित्र काढणे अपेक्षित आहे.
छान उपक्रम.
छान उपक्रम.