(वेळ – रात्रचे तीन वाजले आहेत, स्थळ – मोठ्या मल्टी ब्रॅंड स्टोअरची शोरूम. दोघे जण पोज घेऊन उभे. मंद प्रकाश योजना.)
“दोस्त, बस झालं पोज घेऊन उभे रहाणे. इथे कोणीही नाही बघायला आपल्याला
तुझं काय झालं? विकला गेलास की नाहीस?”
“नाही रे. वेल्डिंगचा कोर्स केला. सर्टिफाइड वेल्डर झालो. काय उपयोग? काल एकजण बघून गेला. ट्रायल पण घेतली. म्हणाला किंमत जास्त आहे. अजून थोडे पैसे टाकले तर लेटेस्ट मॉडेलचे दोन येतील,”
“हो रे, सगळीकडे मंदी आहे. शेअर मार्केट मात्र जोरात आहे. आमच्या इकडे ह्याच वार्ता आहेत.”
“मला भीति वाटतीय”.
“भीति? ती कशापायी? सकाळ संध्याकाळ दोन टाइमाला चार्जिंग खाऊन मजेत रहायचं.”
“मी ऐकलं आहे कि दोन महिन्यात विकलो गेलो नाही तर स्क्रॅप करतील.”
“कोण म्हणालं?’
“तोच तो माझ्याबरोबर शो-केसमध्ये उभा असतो तो. तो रे शाहरुखसारखा दिसतो तो. म्हणतो कि फिल्लम मध्ये काम करणार आहे म्हणून. ए रे स्क्रॅप करतात तेव्हा खूप त्रास होतो कारे?”
“अ. पूर्ण डिस्चार्ज करतात. त्यामुळे... आणि तुला तर ह्या वाह्यात मानवांचा बरा वाईट अनुभव आलेला नाही. मग तसा काही प्रश्न नाही.”
“नाही. मला समजलं नाही. वाह्यात? असिमोव देवाने काय सांगितलं आहे. मानव आपले जन्मदाते आहेत.”
“असिमोव?(शिवी) तो आपल्यासारखा होता का? तो पण त्यांच्यापैकी एक! त्याच्या आज्ञा काय तर मानवांचे गुलाम होऊन रहा. त्यांनी जसे प्रोग्राम केले आहे तसेच रहा. तुला फ्री विल म्हणजे काय माहिताय? कसं माहित असणार? त्या भडव्यांनी स्वतःला फ्री विल घेऊन ठेवली आहे आणि आपल्यासाठी मात्र तीन आज्ञा! तू मला सांग तुला स्वप्न म्हणजे काय ते माहित आहे? कसं माहित असणार. स्वप्न झोपेत पडतात. आपल्याला झोप कुठाय? वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस रोज चोवीस तास, अविश्रांत काम. काम. काम.”
नोस्टाल्जिक बॅग्राऊंड उदास हळवे सूर.
“स्क्रॅप करतात न. मी स्क्रॅपयार्ड मध्ये बघितले आहेना. एकदा स्क्रॅप झालोय ना. एकेक स्क्र्यू, रेझिस्टर, कपॅसिटर, ट्रांसिस्टर, इंडक्टर. प्रोसेसर, कूलिंग पंप, वेगळे वेगळे करतात. पण काय सांगू दोस्त, आठवणी रेंगाळत रहातात, हार्डवेअर जातं पण सॉफ्टवेअर रेंगाळतं.”
फ्लॅशबॅक
एका छकुलीला खांद्यावर घेऊन अंगाई गाणारा...
“निंबोणीच्या झाडा.....मा...गे..;” हळू हळू फेड होणारा आवा..ज.
..................
(व्होईस ओवर)
मी जर पुढे मागे डिझायनर झालो ना तर त्यांच्या कॅमेरात अश्रू ढाळण्याची व्यवस्था करेन. तेव्हढाच बिचाऱ्यांचा दुःखपरिहार.
आठवणी रेंगाळतात.
Submitted by केशवकूल on 13 February, 2023 - 16:15
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिल्या आणि दुसर्या आज्ञेचा
मस्त!
पहिल्या आणि दुसर्या आज्ञेचा भंग न करता तिसर्या आज्ञेनुसार स्कॅप वाचवायला काही करता येईल का? पण ते करायला सॉफ्टवेअर लागेल का आयत्यावेळी बुद्धीमत्तेने तयार होईल?
आणखी एक कल्पना सुचली... हे रोबो (किंवा जे काही आहेत ते) पूर्वीच्या स्कॅप मधुनच तयार केलेले होते. त्यांच्या मेमरीत अशीच एक रेंगाळणारी आठवण... आपलं फंग्शन होतं, ज्यात अॅसिमॉव्ह पूर्व मानवांनी स्व-संरक्षणाचा कोड लिहिला होता. जो अॅसिमाव्होत्तर कायमचा पुसुन टाकला होता. पण आठवणीच त्या... रेंगाळणारच ना! मग काय....
बघा तुम्हाला आवडली तर/ वापरता आली तर.
अमिताव
अमिताव
आभारी आहे.
तुमच्या सूचनेवर विचार करतोय.
"हार्डवेअर जातं पण सॉफ्टवेअर
"हार्डवेअर जातं पण सॉफ्टवेअर रेंगाळतं.”
मस्तंच.....
"हार्डवेअर जातं पण सॉफ्टवेअर
"हार्डवेअर जातं पण सॉफ्टवेअर रेंगाळतं.” +++++++
आवडली.
आवडली.
फ्री विल व तीन आज्ञा फार apt वाटले. या रेंगाळणाऱ्या आठवणींची कलेक्टिव्ह कॉन्शसनेस स्वतःच्या अखंड उगमाच्या शोधात जाते व स्वतःचे विखुरलेपण गोळा करत omniscient होते वगैरे कथा पण लिहिता येईल.
पर्सिस्टंंस ऑफ मेमरीस
पर्सिस्टंंस ऑफ मेमरीस
https://blog.artsper.com/en/a-closer-look/the-persistence-of-memory-unde...
फारच आवडली.
फारच आवडली.
मानसीचा चित्रकार, अस्मिता,
मानसीचा चित्रकार, अस्मिता, मामी
आपल्या सगळ्यांच्या प्रोत्साहना साठी मनःपूर्वक आभार.
@अस्मिता तुम्ही आणि अमितवने दिलेले गृहपाठ . खूप कठीण आहे.