रात अकेली है

Submitted by स्वप्ना_राज on 13 February, 2023 - 11:11

त्या दिवशी मध्यरात्री अचानक जाग आली नसती तर बरं झालं असतं.
जाग आल्यावर बेडरूमच्या खिडकीजवळ जाऊन खाली नजर टाकली नसती तर बरं झालं असतं.
निदान सुनसान रस्त्यावरून चाललेला तो पाठमोरा माणूस तरी दिसला नसता
रस्त्याच्या शेवटी उजवीकडे वळताना अचानक थांबून त्याने मान उंचावून थेट माझ्याकडे पाहिलं नसतं...

...आणि सातव्या मजल्यावरच्या एसी बेडरुममध्ये खिडकीजवळ मिट्ट अंधारात एकट्या उभ्या असलेल्या मला दरदरून घाम फुटला नसता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे जे काय लिहिले आहे ते एकदम जालीम आहे. एकदम हटके. मी इथे नवीन आहे आणि प्रथमच अस काहीतरी माबो वर वाचतो आहे.
अवांतर = मी पण शिकतो आहे.

ह्ह्म्म्म…

छान आहे पण अचानक संपली असे वाटले.

भारी.
मला अजून १ थरकाप उडणारा सीन आठवला. विराना मधे माणूस कॅजुअली डोळे उघडून बाजूला बघतो तर मध्य रात्री च्या प्रहरी हिरोईन त्याच्या कडे टक लाऊन बघत असते :घाबरगुंडी उडालेली बाहुली: ..... हे असं माझ्या लेकीने माझ्या सोबत एकदा केलंय Uhoh

भारी जमलंय.

हो हो आशु,
तो सीन प्रचंड भयंकर आहे
आणि मध्येच एकदा कारमध्ये तिचे पाय त्याच्या नजरेसमोर उलटे होतात
तो हिरो विजय अरोरा विराना मध्ये मरतो का आठवत नाही.

छान
हा पहिला भाग झाला
रात अकेली हैss बूझ गये दिये..

आता पुढचा भाग येऊ द्या,
आके मेरे पासss कानों मे मेरे.. Happy

mi_anu, मरतो विजय अरोरा. आणि तो हिरो नसतो अग पिक्चरात. मला वाटतं त्यात हेमन्त बिरजे हिरो होता.

प्रतिसादाबद्दल सर्वान्चे आभार.