अनेक राज्य सरकारांनी नविन पेन्शन बंद करुन जुनी पेन्शन हा विषय पुढे घेतलाय कारण सरकारी, निमसरकारी निवृत कर्मचार्यांचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताना वन रॅक वन पेन्शन। हा निवृत्त फौजी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय केंद्र सरकारने हाताळला होता. हे सगळे विषय राजकीय गरजेनुसार हाताळताना खासदार आणि आमदार आपल्या पेन्शनचा विषय मात्र तळे राखी तो पाणी चाखी नाही तर तळे राखी तो भरे टाकी या पध्दतीने दर पाच वर्षांसाठी एक पेन्शन या पध्दतीने काही राज्यात आपली टाकी फुल करुन घेतात.
या मारामारीत संजय गांधी निराधार योजना पेन्शन रुपये ५००/- किंवा खाजगी क्षेत्रातुन निवृत्त झालेले कामगार किंवा कर्मचारी यांची epf 95 pension ही मुळातच एखाद्या गतीमंद आणि बहुविकलांग बालकासारखी जन्माला आलेली आहे. ही योजना कै नरसिंहराव पंतप्रधान असताना आमलात आली आणि त्या वेळेला बहुसंख्य असलेल्या संघ विचारांच्या उजव्या, कम्युनिस्टी डाव्या किंवा ज्यांना स्वतःचे विचार नाहीत मध्य मार्गीय युनीयन सदस्यांचे नियामक मंडळावर अस्तित्व असुनही हे गतीमंद आणि बहुविकलांग बाळ ३०-३५ वर्षे सलग एकाच ठिकाणी नोकरी करुन निवृत झालेल्या कामगार किंवा कर्मचार्याला २ ते ३ हजार दरम्यान तुटपुंजी पेन्शन देऊ करते. त्याच्या पश्चात त्यांच्या पत्नीला याच्या निम्मी रक्कम पेन्शन मिळते ही शोकांतिका आहे.
२०१४ साला नंतर अनेक नोकर्या बदलल्या तरी एकाच UAN नंबरने सर्व कंपन्यातील पेन्शन जोडले जाऊन हे पेन्शन उच्चतम मिळण्याची शक्यता निर्माण झाली अन्यथा ज्या कंपन्या काळाच्या ओघात संपल्या, त्यांचे पेन्शन भविष्यात मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पण १९८० साला दरम्यान अनेक नोकर्या बदललेल्या लोकांना epf च्या लालफिती कारभारातुन तुटपुंजी का होईना पेन्शन मिळणे म्हणजे दिव्य करावे लागते.
माझा स्वतःचा अनुभव तर ग्रिव्हेन्स नावाचा पोर्टल नसता तर दरमहा दोन हजार तेवीस या रकमेला मुकावे लागले असते. बजाज कंपनीने दिलेली पेन्शन क्लेम ची कागदपत्रे epf स्विकारणार नाही असा फतवा २०२२ च्या जानेवारीत निघाला. आता सर्वांनी पेन्शनचा क्लेम online सबमीट करावा हा तो फतवा. मी २०१४ पुर्वी नोकरी सोडल्यामुळे माझा UAN नंबर अस्तित्वात नव्हता. त्यामुळे क्लेम online सबमीट करणे शक्य नव्हते. शेवटी ग्रिव्हेन्स दाखल करुन मी बाजी मारली. बजाज कंपनी मधील अधिकारी मला म्हणाला जोगळेकर तु स्टाफ मधे होतास, online ग्रिव्हेन्स तुला करायला आला म्हणुन तु बाजी मारली. पण अर्धशिक्षीत इंग्रजी न येणार्या कामगारांचे काय होणार.
दुसर्या बाजूला २०१४ मधे दाखला झालेला वाढीव पेन्शन संदर्भातील सुप्रिम कोर्टातुन खटल्याचे निकाल नोव्हेंबर २०२२ ला लागले ज्यातुन नविन प्रश्न निर्माण झालेत. epf 95 ही स्कीम आजतरी जास्तीत जास्त पेन्शन ७५००/- देणार असे चित्र नोव्हेंबर २०२२ च्या निकालातुन स्पष्ट झालेले असले तरी ही रक्कम मिनीमम वेज च्या गाईडलाईन पेक्षा कितीतरी खाली आहे.
६० लाख पेन्शनर असलेल्या epf 95 स्कीम मधील हजार रुपडे पेन्शन मिळवणारे, जगण्याचा दुसरा सोर्स नसलेले अनेक कामगार, कर्मचारी मुलांच्या जीवावर आपले जीवन काटत आहेत किंवा अपुरी मेडीकल सेवा घेऊन मरण पत्करत आहेत,
अश्या देशाला कल्याणकारी राज्य म्हणायचे का ?
संदर्भ -
१) https://testbook.com/question-answer/mr/the-concept-of-welfare-state-is-...
२) https://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/93093e91c94d92f93693...(%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AB).
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी
पेन्शन बंद होती / आहे तरीही या लोकांचे प्रश्न सुटलेत का ? जागतिकीकरणाच्या परिणामांमुळे दोन वर्ग तयार झाले. एक अमेरिकन वेतनाप्रमाणे वेतन घेतो तर दुसर्याचे फिलिपिन्सपेक्षाही खाली चालले आहे. सरकारी नोकर नशीबवान म्हणून जागतिकीकरणाने वाढलेल्या महागाई इतका भत्ता त्यांना मिळू लागला. त्यांचा पगार कमी करायचा असेल तर महागाई कमी करावी लागेल, त्यासाठी मूठभरांना मिळणारे जागतिक दर्जाचे वेतन कायद्याने बंद करावे लागेल, आणि जागतिकीकरणाचे चक्र उलटे फिरवावे लागेल. हे चालेल का तुम्हाला ?
पेशंटला थंडी ताप भरलाय आणि तुम्ही त्याचे निदान कॅन्सर करून इलाज करायचं म्हटलं तर कसं होईल ?
@ सामना
@ सामना
सरकारी नोकरांच्या पेन्शन योजना संदर्भात राजकीय पक्ष किमान सत्ता परिवर्तन घडू शकेल अश्या लहान राज्यात संवेदनशील आहे. पण खाजगी उद्योगातून बाहेर पडलेल्या संघटीत कामगारांच्या बाबतीत किंवा आयुष्य्भर कं त्राटदाराकडे काम केलेल्या आणि अनेकदा नोकर्या बदललेल्या असंघटीत क्षेत्रात काम केलेल्या कामगारांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाबाबत एक निश्चित धोरण अद्याप नाही ही बाब महत्वाची आहे.
खासगी असू किंवा सरकारी कामगार
खासगी असू किंवा सरकारी कामगार ना एक च न्याय हवा.
त्या प्रमाणे permanant असू किंवा कॉन्ट्रॅक्ट वर एक काम एक पगार हेच धोरण हवे.
सरकारी तिजोरी फक्त कामगार चे पगार देण्यात खर्च होवू नये .
आणि खासगी कंपन्या पण फक्त कामगार चे पगार देण्यात बुडू नयेत .
असे समतोल धोरण हवे.
कोणाचेच विशेष लाड नकोत आणि कोणावर पण अन्याय नको.
पेन्शन चैन पद्धती नी पण देता येईल सेवेत असणाऱ्या कामगार चे पैसे जे पेन्शन स्कीम मध्ये जमा होतात ते सेवामुक्त कामगार ना पेन्शन देण्यास वापरता येतील आणि जास्त पेन्शन आरामात देता येईल .
हे चक्र असेच चालू राहील.
इच्छा असेल तर अनेक मार्ग आहेत
विधानपरिषद , लोकसभा निवडणुकीत
विधानसभा , लोकसभा निवडणुकीत उमेदवार संपत्ती जाहीर करतात तेव्हा ती काही करोड मध्ये असते.
(खरी त्यापेक्षा कितीतरी जास्त असते हे सगळ्यांना माहीत आहे)
तरी एकदा आमदार -खासदार झालं की पेन्शन लागू![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
कल्याणकारी राज्य हा लोकशाही व
कल्याणकारी राज्य हा लोकशाही व गाभा आहे.
लोकशाही ची संकल्पना योग्य आहे.
पण सत्ताधारी चुकीचे आहेत.
योग्य सत्ताधारी निवडण्याचा अधिकार आज पण जनतेकडे च आहे(T N शेषन साहेबांचे अनंत उपकार आहेत त्यांनी हक्क शाबूत ठेवले)
पण जनताच लायक नाही योग्य सत्ताधारी निवडणे पण जनतेला जमत नाही.
कल्याणकारी राज्य हा लोकशाही व
कल्याणकारी राज्य हा लोकशाही व गाभा आहे.
लोकशाही ची संकल्पना योग्य आहे.
पण सत्ताधारी चुकीचे आहेत.
योग्य सत्ताधारी निवडण्याचा अधिकार आज पण जनतेकडे च आहे(T N शेषन साहेबांचे अनंत उपकार आहेत त्यांनी हक्क शाबूत ठेवले)
पण जनताच लायक नाही योग्य सत्ताधारी निवडणे पण जनतेला जमत नाही.