वाळवी - या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट
आताच बघून आलो! रात्रीचा शो! फुल्ल धमाल!! फुल्ल पैसा वसूल चित्रपट!!!!
पुर्वार्धात असे काही नाट्य की काही मिस होऊ नये म्हणून एक क्षण, अक्षरशा एक क्षण पडद्यावरून नजर हटू नये. आणि उत्तरार्धात ईतका ड्रामा की बरेच दिवसांनी दिवसांनी असे पुर्ण थिएटर नॉनस्टॉप खळखळून हसताना बघितले.
हो, रात्रीचा शो होता. चित्रपट मराठी होता. आणि तरीही थिएटर हाऊसफुल्ल होते. मी मात्र एकटाच गेलेलो. काहीतरी बायकोच्या मर्डरचा प्लान आहे हे ट्रेलर बघून समजलेले. त्यामुळे या इन्फॉर्मेशन शेअरींग सेशनला तिला सोबत नेले नव्हते. पण असे वाटलेच नाही की मी एकटा आहे.
मोजकी चार पाच कॅरेक्टर.. पण काय तो अभिनय, काय ते संवाद, काय तो एकेकाचा टायमिंग..
स्वप्निल जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते... सर्वच भारी!
मोजकीच चार पाच लोकेशन्स.. पण काय ते चित्रीकरण, काय तो साऊंड, काय ती बॅकग्राऊंड म्युजिक..
कमाल केलीत परेश मोकाशी..
आणि शेवट तर ईतका अनपेक्षितपणे आला की क्षणभर काळजाचा ठोकाच चुकला. छातीवर हात ठेऊन थोडावेळ खुर्चीतच बसून राहिलो.
पण मला आश्चर्य वाटते की मायबोलीवर अजून एकानेही कसे वाळवीबद्दल लिहिले नाही..
अजून कोणी पाहिला नाही का? ईथल्या लोकांपर्यंत अजून हा पोहोचला नाही का?
वाट कसली बघता आहात? आपलाच मराठी चित्रपट आहे. कोणी आमंत्रण देणार नाहीये. जा ऊठा, बूक माय शो करा, जवळचे चित्रपटगृह गाठा आणि पहिले बघून घ्या. लगेच या धाग्यावर लिहून मोकळे व्हा. तोपर्यंत मी रोज हा धागा हलता कसा राहील आणि हा चित्रपट एकूण एक मायबोलीकर कसा बघत नाही हेच बघतो.
आणि हो, चित्रपट मराठी आहे म्हणून नाही, तर ईतका उत्क्रुष्ट बनवलाय की थिएटरातच बघायचा आहे. त्यातच मजा आहे. ओटीटीच्या छोट्या स्क्रीनवर बघाल तर त्या नाट्यातली मजा घालवाल. केवळ मल्टीस्टार्रर, बिग बजेट, वीएफएक्स आणि स्पेशल ईफेक्टवाले चित्रपटच थिएटरमध्ये बघायचे असतात हा माझा भ्रम तोडला या चित्रपटाने. माझ्याकडून फुल्ल पाच स्टार !
धन्यवाद,
काही खुसखुशित पंचेस ला हसू
काही खुसखुशित पंचेस ला हसू येत होते, मुव्ही बघण्याचा मूड अखेरपर्यंत राहिला. वेगवान आणि ईंटरेस्टींग आहे!
पण मुलांना दाखवण्या सारखा खरंच नाहिये.
मुलं खरंच भंजाळतिल की खुना वर खून पडत आहेत तरी विनोदी चालू आहे आणि लोक हसतायत. वर लिहिलय त्या प्रमाणे मुलांना डार्क हुमर कळणे शक्य नाही. अजून काही प्रौढांना ही नसावा..
Spoiler आहे पुढे वाचू नये.
Spoiler आहे पुढे वाचू नये.
आताच पाहिला.
झी 5 वर.
भारी ट्रीटमेंट आणि धक्क्यावर धक्के देत सरकणारा वेगवान चित्रपट.
शेवट एकदम धाडकन अंगावर आलेला.
कितीही प्लान केले तरी आयत्या वेळी काय गोंधळ होईल ते सांगता येत नाही.
2 प्लान एकदम एकमेकाला क्रॉस गेल्याने झालेला घोटाळा.
सगळ्यात भारी डायलॉग.
कॉन्फरन्स डायलॉग सगळ्यात भारी.
शिवानी सुर्वे भारी. शॉर्ट टेम्पर्ड आणि अरे का कारे .
स्वप्नीलला कशी पटली देव जाणे. तो बऱ्यापैकी गोंधळी वाटला. केलेला घोळ निस्तरताना पुन्हा सगळं घेउन मुंबईत येण्याचा निर्णय मात्र पटला नाही.
मजा तर आली. मराठीत असे चित्रपट फार नाहीत.
कोणाला असेल वेगळेपण असलेले चित्रपट आठवत असतील तर नावे आठवूया.
बघता येतील.
वाळवी आवडला. शेवट खूप भारी
वाळवी आवडला. शेवट खूप भारी आहे. डार्क कॉमेडी Genre चे सिनेमे नवीन नवीन निघत आहेत. आयुष्मान खुराणा चां अंधाधून आठवला, पण वाळवी नक्कीच मात देतो अंधाधून ला.
वाळवी आवडला. अजिबात पाणी न
वाळवी आवडला. अजिबात पाणी न घातलेला असल्याने एकही मिनिट उगाचच ताणलाय असे वाटत नाही. डार्क कॉमेडी असावी तर अशी !
आता वरचे प्रतिसाद वाचून पुन्हा एकदा बघणार व मिसलेले पंचेस एन्जॉय करणार.
इतर धाग्यांवर तावातावाने
इतर धाग्यांवर तावातावाने मूल्याच्या/ नीती अनीतीचा कंमेंट्स करणार्यांनी वाळवी सारख्या तद्दन illogical/ इंसेन्सिबल/ कथा असणाऱ्या, सगळी मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करावे, वारेमाप कौतुक करावे ह्याचे आश्चर्य वाटले.
एक तर त्यांच्या विचारात कॅलॅरिटी नसावी असेच वाटते.
१. एक्सट्रा मॅरेटीअल अफेअर चे उदात्तीकरण
२. डॉक्टर - पेशंट नात्यातील confeditiality, तत्व पायदळी तुडविणे
३. इतके सारे खून एखाद्या सराईत किलर च्या थंडपणे करणे,
न संपणारी यादी आहे
सर्वात मूर्खपणाचा कळस म्हणजे
एव्हढा मोठं कोणत झुंबर प्लास्टिकच्या दोरीने टांगलेल असत (जो ह्या कथेचं गाभा आहे )
हरीशचंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी बनविणाऱ्यानेच बनवावा विश्वास बसत नाही. पैसे आणि वेळ दोन्ही फुकट गेलं.
Clarity
Clarity
confidentiality
extra marital affair
Kindly correct spelling ma'am
इतर धाग्यांवर तावातावाने
इतर धाग्यांवर तावातावाने मूल्याच्या/ नीती अनीतीचा कंमेंट्स करणार्यांनी वाळवी सारख्या तद्दन illogical/ इंसेन्सिबल/ कथा असणाऱ्या, सगळी मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करावे, वारेमाप कौतुक करावे ह्याचे आश्चर्य वाटले. <<<
नेमका हा सल आहे का..?
वाळवी आवडला. अजिबात पाणी न
वाळवी आवडला. अजिबात पाणी न घातलेला असल्याने एकही मिनिट उगाचच ताणलाय असे वाटत नाही. डार्क कॉमेडी असावी तर अशी !
>>>>>>>> +१०००
वाळवी "डार्क कॉमेडी" म्हणूनच
वाळवी "डार्क कॉमेडी" म्हणूनच आवडला आहे.
छंदीफंदी, कदाचित तुम्हीही तीच
छंदीफंदी, कदाचित तुम्हीही तीच चूक करत आहात. वाळवीचा जॉनर समजून घेण्यात गडबड करत आहात
एक्सट्रा मॅरेटीअल अफेअर चे उदात्तीकरण >>> हे मला यात कुठे दिसले नाही. शेवटी त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळते. आणि प्रेक्षकांना त्यांच्या मृत्युबद्दलही काही सहानुभुती वाटत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे एक्सट्रा मॅरेटीअल अफेअर हा प्रकार सरसकट बदनाम उगाच आहे. त्याचा विचार केस बाय केस व्हावा. पण त्यावर पुन्हा कधीतरी. या धाग्याला ते वळण नको.
अरे वाह.. धागा वर आला म्हणून
अरे वाह.. धागा वर आला म्हणून १०० प्र ति सा द झाले. हे लक्षात च नाही आले.
मराठी चित्रपटाच्या धाग्याने १०० खेचले याबद्दल सर्वांचेच अभिनंदन
वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे
वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे डार्क कॉमेडी आहे ती. उदा. अंदाधुंद, A Series of Unfortunate Events. नुकताच Mrs Undercover पाहिला. तो ही असाच डार्क कॉमेडी आहे. मस्त enjoy केला. मला आवडते राधिका आपटे.
सिनेमा न आवडणे वेगळे आणि हा जॉन्राँ झेपणे वेगळे. टिपिकल सिनेमाचे नियम याना लावायचे नाहीत. यात बरेचदा अतिशयोक्ती असते.
या सिनेमाची तुलना 'शामची आई' अथवा 'माहेरची साडी' सारख्यांशी करून चालणार नाही. त्यांची जातकुळी वेगळी. याची वेगळी.
अंदाधुंद, A Series of
अंदाधुंद, A Series of Unfortunate Events>>>A Series of Unfortunate Events पुस्तक (१८) भाग वाचले आहेत तुम्ही? का पिक्चर म्हणताय? कसही असो. माबो वर किमान एक जण तरी माई का लाल भेटला. पुस्तकात जे काय आहे ते सिनेमात नाही.
माझे दंडवत घ्या.
मी पिक्चर पाहिलाय. आता सिरीज
मी पिक्चर पाहिलाय. आता सिरीज बघायला घेतली तर मधेच Black Mirror चा नवा घाणा दिसला अन तिथे वळले.
पुस्तकं जास्त इंटरेस्टिंग असतील यात शंकाच नाही. पण मला या सिनेमाचं प्रॉडक्शन काम भारी वाटलंय.
आमच्या बारक्याला भेटा केकू.
आमच्या बारक्याला भेटा केकू. सिरीज ऑफ अन फॉरच्युनेट इव्हेंट पुस्तकं आणि टीव्ही शो कोळून प्यायलेला आहे. त्याच्या शाळेतल्या तिसरीच्या बाई ते पुस्तकं वाचून दाखवायच्या. मग आम्ही चालू केली आणि आवडलीच.
आमच्या बारक्याला भेटा केकू>>>
आमच्या बारक्याला भेटा केकू>>> अजून एक भेटला.
त्याच्या शाळेतल्या तिसरीच्या बाईला भेटायचे आहे.
ह्या लेमोनी स्निकेटची (डॅॅनिअल हॅॅँँडलर)अजून चार पुस्तकांची सेरीज आहे. All The wrong Questions.
हा लेखक वाचकाला गूूढ विश्वात घेऊन जातो. जिथे फक्त अन्याय आहे. कायदा पोलीस कुछ नाही.
अन फॉरच्युनेट च्या शेवटच्या अठराव्या भागात तीन मुलांना छळणाऱ्या विलनचा अंत होतो. तो त्या मुलांचा दुरचा नातेवाईक असतो. पण त्यांच्या मनात सूडाचा लवलेशही नसतो. त्याची उत्तर क्रिया ते यथासांग पार पाडतात.
मला का कुणास ठाऊक पण श्री ज्ञानेश्वरांची आठवण झाली.
BTW माझ्या मुलाचे नाव बारकू आहे.
इतक सरळ सोप्प सुंदर लिखाण
इतक सरळ सोप्प सुंदर लिखाण क्वचित वाचायला मिळते. उपमा नाहीत उत्प्रेक्षा नाहीत अर्थगर्भित नाही संदेश नाही अहंं नाही उपरोध नाही. हे मला फक्त चार्ल्स डिकन्स अर्नेस्ट हेमिंग्वे आणि कदाचित बायबल मधेच भेटले.
बाकी सगळी मायक्रोसॉफ्टची मॅॅन्युअल्स.
All The wrong Questions. >>
All The wrong Questions. >> नोंदवून ठेवले आहे.
एक दुरुस्ती
एक दुरुस्ती
A Series of Unfortunate Events ही तेरा भागांची सेरीज आहे. अठरा नाही.
पुस्तक नाही मिळाले तरी बेहत्तर मग हि विकी वाचा.
https://en.wikipedia.org/wiki/A_Series_of_Unfortunate_Events
मला पण आवडला वाळवी.....
मला पण आवडला वाळवी.....
वाळवी यू ट्यूबवर आला आहे. काल
वाळवी यू ट्यूबवर आला आहे. काल पाहिला. आवडला.
https://youtu.be/a5HgBnAIUkY?si=76PTR46h01EqmZhb
बघितला. मस्त आहे. लूपहोल्स
बघितला. मस्त आहे. लूपहोल्स आहेत अनेक पण तरीही खूप आवडला. शिवानी सुर्वेचं काम विशेष आवडलं. सुबोधचे आणि तिचे संवाद मस्त घेतलेत. शेवट एकदमच अनपेक्षित आणि धक्का देऊन जातो.
>>>>शेवट एकदमच अनपेक्षित आणि
>>>>शेवट एकदमच अनपेक्षित आणि धक्का देऊन जातो.
करेक्ट. सिनेमाचे नाव सार्थ आहे.
Pages