पोस्ट ऑफीस उघडं आहे - सोनी मराठी वरील नवीन मालिका

Submitted by सान्वी on 6 January, 2023 - 11:53

सोनी मराठी वर कालपासून म्हणजेच ५ जानेवारी पासून 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' ही नवीन मालिका सुरू झाली आहे. अजून २ च भाग प्रसारित झालेत. पण तरी पाहताना मजा आली. सगळी उत्तम आणि अनुभवी स्टारकास्ट दिसते, बरीचशी मंडळी हस्याजत्रे मधलीच आहेत. मकरंद अनासपुरे यांना टीव्ही वर मी पहिल्यांदाच पाहिले. पोस्टातले इरसाल नमुने मस्त दाखवलेत एकेक. सध्याची पोष्टाची परिस्थिती पाहता १९९७ च्या काळातले पोस्ट आणि त्यावेळी घडणाऱ्या गमतीजमती पाहताना नॉस्टॅल्जिया आला. मर्यादित भागांची असेल असे त्यांनी आधीच जाहीर केलंय. माझ्यासारखीच अजून कुणाला मालिका आवडली असल्यास नक्की या धाग्यावर चर्चा करायला आवडेल.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त मालिका आहे. युट्यूबवर दहा भाग पूर्ण टाकले आहेत. पुढचे बघण्यासाठी सोनी लिव्हचा उपयोग करतोय.
पूर्वीच्या मुंगेरीलाल के हसीन सपने , मालगुडी डेज प्रमाणे साधे साधे प्रसंग आहेत. खूप लवकर आपण त्यांचा एक भाग होतो. त्या गावातला हिस्सा बनतो. मकरंद, समीर सारखे कलाकार असले तरी सर्वांचीच कामे खूप छान झालेली आहेत.

बडोद्याच्या ट्रेनिंगचा एपिसोड समीरच्या हिंदीवरील विनोदासाठी घेतल्यासारखे वाटतात. पण त्यातली हिंदी बोलणारी पात्रे सुद्धा गोंधळेलेले हिंदीच बोलतात.

एक "टोकन नंबर" नावाची सिरीयल होती , दिलीप प्रभावळकर होते त्यात , चांगली होती , त्या सिरीयल ची आठवण झाली.>>>अगदी हेच म्हणायचे आहे. फक्त सिरियलचे नाव आठवत नव्हते. टोकन नंबर मध्ये प्रकाश इनामदार होते. तेसुद्धा छान काम करायचे. बँकेवरील मालिका होती ती. पोस्ट ऑफीस पण छान ....एकदम nostalgic करते.

ट्रेलर पायला होता हेचा, इतली जबर अशीन अशे वाटले नोते मले.

बाकी ते नाव उल्सक अलग ठेव्याची गरज हाय, पोस्ट ऑफिस उघडे आहे, हे आमच्या शाळेत पोट्टा प्यांटीची चैन खुल्ली ठीउन आला का म्हणत जात बाकी लेकरं...

Pages