ती आणि तो

Submitted by केशवकूल on 28 December, 2022 - 21:50

ती नेहमी प्रमाणे येत होती.
संध्याकाळचे सहा वाजले. भेळवाल्याने मनातल्या मनात नोंद केली.
ती हळूहळू चालत नेहमीच्या बाकड्याकडे जाते.
तिच्या चालीत काहीही विशेष नाही. आठ महिन्यापूर्वी जशी आली होती तशी ती दररोज येते.
आठ महिन्यापूर्वी उत्साह होता. चालण्यात डौलदार संथपणा होता. उत्सुकता होती. हुरहूर होती.
आशा आणि भीति यांचा पाठशिवणीचा खेळ
आता त्या भावनाही विरून गेल्या होत्या.
जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पहाते.
अस केव्हातरी अल्लड बोलणे झाले होते. तेच निभावते आहे.
वूडस आर लवली डार्क अॅंड ग्रीन
बट आय हॅव प्रोमिसेस तो कीप.
केवळ म्हणून ती येते.
हाच तो बाक. “श्री प्रकाश कट्टी ह्यांनी प्रतिभा कट्टी ह्यांच्या स्मरणार्थ...”
प्रत्येक बाकाची एकेक कथा.
आणि व्यथा.
बिचाऱ्यांना वाचा नाही म्हणून.
बाकावर टेकणाऱ्याच्याही कथा.
तिचीही एक कथा होती.
“मॅडम, विसराना आता प्लीज.”
एक मरतुकडे कुत्रे आशेने तिच्याकडे येते. काहीतरी खायला मिळेल...
जा बाबा, तिच्या कडे देण्यासारखे काही उरले नाहीये. जे देण्यासारखे होते ते देऊन झाले होते.
तो आला. उशीर झाला होता खरा. त्याच बाकावर तिच्या शेजारीच पण थोडे अंतर ठेवून बसला. काय बोलावे, कशी सुरवात करावी? काही सुचेना. शेवटी धीर केला.
“हॅलो.” तिने ऐकले कि नाही? रागावली आहे बहुतेक. अर्धा तासच तर उशीर झाला होता. राग नुसता नाकाच्या शेंड्यावर. त्याचच चुकलं होतं. येताना तिच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा आणायला हवा होता. कसा विसरलो मी. पण घाई होती ना. ती वात पहात असेल म्हणून पळत आलो.
“मिस्टर, खर तर तुम्ही टॅक्सी करायला पाहिजे होती.”
टॅक्सीच केली होती पण...
“पण काय?...”
“मला जरा हिच्याशी बोलू द्याल का? नंतर मी सांगेन सविस्तर. सुलू, प्लीज... इकडे माझ्याकडे बघ एक क्षण. रागावू नकोस ना. तू रागावलीस ना कि माझा जीव कासावीस होतो. टांगणीला लागतो.”
सागराच्या लाटावर लाटा. काय उपयोग?
हिला ऐकू येत नाहीये का? कि मुद्दामहून दुर्लक्ष?
तो उठला. तिच्या समोर जाऊन उभा राहिला. तरीही तिचे लक्ष नाही. त्याने आवाज चढवला. अक्चुली ओरडला.
“ऐक सुलू ऐक. ह्या रोरोवणाऱ्या सागराला साक्षी ठेवून सांगतो आहे. आय लव यू.”
दाही दिशातून त्या आक्रंदाचे प्रतिध्वनी उमटले.
“सुलू, आय लव यू. आय लव. लव लव ल... यू ...”
तिने आपल्या चिमुकल्या मनगटी घड्याळ्यात पाहिले. त्याची यायची वेळ टळून गेली होती.
आता थांबण्यात काही अर्थ नव्हता. ती आपल्या पर्स मधून छोटा रुमाल काढते. डोळे पुसते. पूर्वी डोळ्यात अश्रू यायचे.
उद्या पुन्हा इथेच ह्या बेंचवर. वाट बघायची.
ती उठली. पर्स सावरली. परतीची वाट चालायला लागली.
सात वाजले. भेळवाल्याने मनोमन नोंद केली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबा आभार.
मी मन बघितलेला नाही. मी आता विकी वर मनाची कथा वाचली. माझी कथा कल्पना अशी आहे.
सुलुला तिचा प्रियकर भेटायला येणार असतो. पण टॅॅक्सीच्या अपघातात तो जातो. आणि हे टाईम लूप सुरु होते. दररोज संध्याकाळी सहा वाजता. कोणीतरी एकजण ह्यातून बाहेर पडल्याशिवाय हे थांबणार नाही . खरे प्रेमी बाहेर कसे पडणार?
भेळवाला जस्ट अ टाईम कीपर.

छान ...

छान आहे कथा.
नानबानी म्हटलं तसे स्पष्टीकरण न देताही कळली.

@ अज्ञातवासी
मला ती कथा कुठे वाचायला मिळेल?

ही एक होती बहुतेक

https://www.maayboli.com/node/73492

आणि ही अजून एक.

https://www.maayboli.com/node/71534

तुमच्या कथेमध्ये आणि या कथांमध्ये फक्त टाईम लूप कॉमन आहे. गुंतागुंत बघता तुमची कथा मला जास्त उजवी वाटतेय, आणि खूपच आवडली आहे, हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. Happy

अज्ञातवासी
थॅंक्यू.
दोनीही लिंक वाचल्या. छानच आहेत.
मी इतके सरस आणि उच्च लिहू शकत नाही. हे समजल्यामुळे मी ही कथा कॉपी केलेली नाही ह्याची खात्री पटली.
माझा थीम असा आहे की काही लोकांना हे समजत नाही की ते मृत झाले आहेत. ते बिचारे त्यांचे अपुरे काम पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात.
बिच्चारे.
ही माझी कथा त्याच थीम वर आहे.
https://www.maayboli.com/node/81307
ह्या कथेवर फक्त दोनच प्रतिसाद आहेत. पैकी एक तर माझा स्वतःचाच आहे! ह्या... ह्या....
म्हणजे कथा फसली आहे एकूण.

धन्यवाद केशवकुल, स्पष्टीकरणसाठी. Happy

नायक पोहोचत नाही आणि नायिका वाट पाहत असते इथपर्यंत कळाल होत, फक्त ते टाईम लुप च लक्षात नाही आले, माझ्या मंदबुद्धीमुळे Happy

आबा
मन फिल्मच्या शेवटासारख आहे का हे !
ह्या साठी ते स्पष्टीकरण होते.

माझ्या मंदबुद्धीमुळे>>>
ह्याला क्रिकेट मध्ये "बॉलरच्या डोक्यावरून सिक्सर हाणणे" अस म्हणतात!

मन फिल्मच्या शेवटासारख आहे का हे !

>>>> ती हिरॉईन accident मुळे पोहोचू शकत नाही आणि हिरो वाट पाहत बसतो...
असं काहीसं असेल वाटलेले

केशवकूल
मस्त कथा - हुरहूर लावणारी

छान कथा...
लहानशी पण मस्त लिहिलीयं...