Submitted by deepak_pawar on 6 December, 2022 - 09:46
आली जरी रात सजणी पण नभी हे चांदणे
तुझिया मनातील गुज मज सांगती तव कंकणे.
हा गार वारा बिलगता झाकता तू लोचने
हे मेघ ही बरसले तव पाहता ते लाजणे.
का डोलती या लता? ही वाट झाली धुंद का?
तू चालता छेडताती सुर तुझी ती पैंजणे.
डोळ्यात डोळे मिसळुनी तू मला गे पाहता
नाही जरी बोललो हृदयात या झंकारणे.
रेंगाळतो दीस माझा रूसुनी बसताच तू
तेव्हा मला आवडे ना ते तुझे गे वागणे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे कविता. पुढील लेखनास
छान आहे कविता. पुढील लेखनास शुभेच्छा.
अश्विनीमामी मनःपूर्वक धन्यवाद
अश्विनीमामी मनःपूर्वक धन्यवाद.
फारच छान!
फारच छान!
केशवकूल मनःपूर्वक धन्यवाद.
केशवकूल मनःपूर्वक धन्यवाद.
सुंदर रचना..!
सुंदर रचना..!
छान रचना
छान रचना
रूपाली, आर्त आपले मनःपूर्वक
रूपाली, आर्त आपले मनःपूर्वक आभार.