Submitted by deepak_pawar on 29 November, 2022 - 10:16
एक झलक तुझी पाहता आयुष्य उधळून जाते
चैत्रातच झरती मेघ शिशिरात बहरून येते.
रूप तुझे पाहुनी बघ सूर्याचे दिपती नयन
चाहूल तुझी लागता वाऱ्याचे थबकती चरण
तू नुसती पाहून हसता रात्र उजळून निघते.
रातीस तुला पाहण्या हा चंद्र नभात तरसे
अंगास चुंबून घेण्या मेघ ही अवचित बरसे
उन्हं कोवळे तू दिसता बाहूत लपेटून घेते.
पाण्यास लावता हात पाण्यास लागे आग
पाहून तुला वैरागी भगव्याचा करती त्याग
डोळ्यांचे गहिरेपण मजनूस डुबवून देते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
पाण्यास लावता हात पाण्यास लागे आग
पाहून तुला वैरागी भगव्याचा करती त्याग
ह्या ओळी आवडल्या.
केशवकूल मनःपूर्वक धन्यवाद.
केशवकूल मनःपूर्वक धन्यवाद.
सॉलिड!!
सॉलिड!!
>>>चैत्रातच झरती मेघ शिशिरात बहरून येते.
आवडली ही ओळ.
अवांतर - आम्हा अध्यात्मिक लोकांकरता चैत्र म्हणजे - रामनवमी, हनुमान जयंती व नवरात्रीचा महीना
सामो मनःपूर्वक धन्यवाद.
सामो मनःपूर्वक धन्यवाद.
चैत्र महिना हा निसर्गा सहीत सर्वांनाच आनंददायी महिना आहे.