NRI भारतात गुंतवणूक

Submitted by च्रप्स on 28 November, 2022 - 12:03

नमस्कार- मला भारतात चांगल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूक करायची आहे...
hdfc संचय प्लस प्लॅन कसा आहे.. 7.38% रिटर्न आहे ग्यारेंटेड... आणखी चांगले इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुचवता का प्लिज...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईन-लॉजला द्या आणि त्यांच्याकडून जबरी व्याज वसूल करा, भारतात जावयाला नाही म्हणायची सोय नसते. पुन्हा 'लेकी-बहिणीच्या घरचे पाणीही वर्ज्य' असे मानणारे ईन लॉज असतील तर पैसे डुबायचीही भिती नाही. Happy

Govt of India bonds/SGS bonds (sovereign) हा सुरक्षीत आणि उत्तंम पर्याय होउ शकतो.
Internet वर माहिती मिळेल.

Govt of India bonds ,infra structure bonds, ppf यांचे उद्देश प्रथम दिलेले असतात. त्यातून ठरवता येईल. उदाहरणार्थ ppf हे वयाच्या ४५-ला सुरू करणं योग्य ठरते. साठीला आल्यावर पंधरा वर्षे पूर्ण होतात. मग दरवर्षी जमा झालेले व्याज काढून घेत राहणे हे पेन्शन. काही जण जमा झालेले सर्व पैसे काढायला बघतात. पण तो ppf चा उद्देश नाही.
असे प्रत्येक स्कीम घ्या काही गाईडलाईनस सरकारने ठरवल्या आहेत. त्याला काट मारून /फाटे फोडून काहीतरी नवीनच ठरविल्यास ती स्कीम आपल्यासाठी यशस्वी ठरत नाही. जे भारतात तेच अमेरिकेतही असेल. Ppf १९७८ सारी सुरू झाली आणि ती EEE वर्गात आहे . त्यात आतापर्यंत बदल म्हटला तर जमा होणारे व्याजदर कमी झालेत, आणि Huf साठी बंद झाली . बाकी नाही. Ppf मध्ये किती रक्कम टाकावी यावरही चर्चा होतात. सूज्ञ लोकांचे मत पडते की प्रा.फंड, बॉन्ड,इंशुरनस यांचीच गोळाबेरीज एवढी होते की पीपीएफमध्ये फुल्ल लिमिट पैसे (दीड लाख ) टाकून 80cc चा तिबेट मिळत नाही. मग थोडीच रक्कम टाकतात. मग काय होतं की पीपीएफमध्ये पंधरा वर्षांनंतर फारच थोडी रक्कम जमा असते आणि त्यावर फारसे व्याज मिळत नाही. रक्कम बिल्डप होण्यासाठी फुल मर्यादा रक्कम भरणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक स्कीमची अपेक्षा आणि लक्ष्य ध्यानात घेणे महत्त्वाचे.

Srd ppf मधून फक्त व्याज कसं काढता येतं? १५ वर्षांच्या शेवटी पूर्ण रक्कम काढणे किंवा ५ वर्षांनी मुदत वाढवणे हे दोनच पर्याय असतात

ppf मधून फक्त व्याज कसं काढता येतं?
ही पेन्शन स्कीम आहे. म्हणजे असं धरून चालू की साठ वयापर्यंत कमावणारा पैसे या अकाउंटला जमा करत राहायचे. मग {समजा} निवृत्ती घेऊन कमावणे बंद केलं तर यातून पेन्शन प्रमाणे रक्कम काढत राहाणे.
कसं?
१५ वर्षांनी मुदत संपली की पाच वर्ष मुदतवाढ घ्यायची आणि दरवर्षी पाचशे रुपये भरून अकाउंट चालू ठेवायचे. शेवटच्या वर्षी जमा असलेली एकूण रक्कम अधिक/ आणि शेवटच्या वर्षीचे जमा झालेले व्याज दिसेल . तेवढे व्याज काढायचे. दरवर्षी जमा झालेले व्याज काढत राहायचे. हीच पेन्शन.

गेल्या पंधरा वर्षांत एक ते दीड लाख रु डिपोझिट मर्यादा होती. ती समजा पूर्ण भरणा करत गेली असेल तर आता अंदाजे पंचवीस लाख रु जमा असतील. म्हणजे साधारणतः दरवर्षी दोन लाख रुपये व्याज येत राहील ते एप्रिलमध्ये काढत राहायचे. ( Withdrawal चा नियम असा आहे की एक रकमी एक वर्षात काढता येते. दोन लाख रु एकदम काढून ते तुमच्या दुसऱ्या कोणत्या सेविंग अकाउंटला घ्यावे लागतात. तिथून हवे तसे काढता येतील. पीपीएफमधून लागेल तसे पैसे दोन चार वेळा काढता येत नाहीत.))

स्कीम नियमांत वापरली तर वाईट नाही.

नॉमिनी कोण करणार त्याला अकाउंटधारकाच्या मृत्यूनंतर सर्व पैसे टॅक्स न लागता मिळतात. म्हणजे त्यांच्या इन्कमला टॅक्सफ्री हे महत्त्वाचे. नॉमिनी अकाउंट धारक कधीही बदलू शकतो.

HDFC संचय प्लस या स्कीम मध्ये ५ वर्षेH प्रीमियम भरला आणि २५ वर्षे पोलिसी टर्म घेतली तर ६.१ % आणि ६ वर्षे प्रीमियम भरून २५ वर्षे पोलिसी टर्म घेतल्यास
६.३८% IRR मिळतो. टॆक्स फ्री रिटर्न्स आहेत . शिवाय पोलिसी टर्म पूर्ण झाल्यावर प्रिंसिपल परत केले जाते.
अगदी १० किंवा १२ वर्षे प्रीमियम भरला तरीही जास्तीत जास्त ७. १% IRR मिळतो.

अमेरिकेत गुंतवणूक करणे फायद्याचे आणि सुरक्षित असेल ना?
काही प्रॉब्लेम आला तर तिथेच मार्ग काढण्यासाठी जवळपास गुंतवणूक करणे सोयीस्कर असेल का?
भारतात गुंतवणूक करावी असे वाटण्याचे काय कारण असेल?

एका देशातून दुसऱ्या देशात गुंतवणूक किंवा अगदी भारतातही कुठूनही योग्य अचूक गुंतवणूक माहितीसाठी त्यांच्या वेबसाइट्स एकत्र करून धागा काढायला हवा.
जानेवारीत काढा.

अमेरिकेत आधीच बरीच गुंतवणूक केली आहे... घरे आहेत आणि फेरोवंके आहे.. हेडज फंड आहे...
ऑल एग्स इन वन बास्केट ( अमेरिका) नको म्हणून भारतात थोडी गुंतवणूक...
संचय 12 + 1 आणि 12 रिटर्न आहे... 7.30% - मनी इन्वेस्टड इन debts अँड नॉट मार्केट... गॅरेंटेड रिटर्न...

आता यावर हसावे कि रडावे कळत नाही,
LIC चे प्लान सांगितले वर लोक धावुन धावुन अंगावर येतात, ज्याला 8% गॅरेंटेड रिटर्न आयुष्य भरा साठी, करमुक्त, गॅरेंटेड, आयुष्यभर.
पण HDFC मात्र वाहवा.. त्याच्या एजंट तर लोक कल्याणास्तव कार्य करत असतो ना...
8% गॅरेंटेड विथ हायेस्ट बोनस
sum assured and even bonus also is sovereign guaranteed.
IMG-20220709-WA0001(2).jpg

अमेरिकेत आधीच बरीच गुंतवणूक केली आहे... घरे आहेत आणि फेरोवंके आहे.. हेडज फंड आहे... >>>>> अभिनंदन !!
ऑल एग्स इन वन बास्केट ( अमेरिका) नको म्हणून भारतात थोडी गुंतवणूक... >>> पी एम केअर फंड.

<< हेडज फंड आहे >>
Hedge fund = accredited investor.
Consider Mohnish Pabrai's India Zero fee fund and Junoon Zero fee funds.
This is not a recommendation, just suggesting an option.

उबो- धंदो च्या वेबसाईट वर जास्त माहिती नाहीय.. नुसता लॉगिन आणि रिक्वेस्ट लॉगिन आहे... कुठे मिळेल पूर्ण माहिती...

The gain on tax free returns will become taxable on your US tax return, imo. Have you checked with you CA about it? Only applicable to US citizens.

एकाच रकमेवर दोन वेळा tax कसा काय लागेल? ( असा एक वाद आता सुरू आहे #युके पीएमची बायको म्हणजे नारायण मूर्तींची मुलगी हिच्या भारतातल्या इन्कमच्या tax बद्दल. ही बातमी उघड चर्चेत आहे म्हणून देत आहे, अफवा पसरवणे /आरोप करणे हेतू नाही.)

This is called capital gain or interest. You will pay tax on the amount you receive less the amount you invested. US citizen are taxed on worldwide income. CA चा सल्ला घेत्ला असेल्च. मि फाक्त्त माझे मत मान्द्ले.

US citizen are taxed on worldwide income.
>> इंटरेस्टिंग...

Taxation rules in USA यासाठी डिजिटल साईट आहे काय?
अवांतर होत आहे पण उत्सुकता वाढली आहे.
("इन्कम टॅक्स आणि त्याचा दर - नागरिकांनी जलद, अतीजलद श्रीमंत होण्याबद्दल सरकारला द्यावयाचे पैसे" - नानी पालखीवाला.)

>>एकाच रकमेवर दोन वेळा tax कसा काय लागेल?<<
डबल टॅक्सेशन टाळण्याकरताच अमेरिकेत रिटर्न्स (१०४०) भरताना त्याचा उल्लेख करावा लागतो. १०४० सोबत दोन फॉर्म्स जोडावे लागतात, नंबर्स आता आठवत नाहित पण गरज पडल्यास मागचे रिटर्न्स बघुन सांगेन. एक अ‍ॅसेट (> $१००के) डेक्लरेशनकरता आणि दुसरा टॅक्स क्रेडिट्स करता. भारतातहि इंन्वेस्ट करताना पॅन नंबर सोबत अमेरिकन सोशल द्यावा लागतो...

Pages