Submitted by च्रप्स on 28 November, 2022 - 12:03
नमस्कार- मला भारतात चांगल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूक करायची आहे...
hdfc संचय प्लस प्लॅन कसा आहे.. 7.38% रिटर्न आहे ग्यारेंटेड... आणखी चांगले इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुचवता का प्लिज...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गल्ली चुकली बघाhttps://www
गल्ली चुकली बघा
https://www.maayboli.com/hitguj/investment
थँक्स भरत .. तिथे भरपूर धागे
थँक्स भरत .. तिथे भरपूर धागे दिसत आहेत.. इतके वाचायला जमणार नाही.. कोणी इथेच उत्तर दिले तर आवडेल...
नो ब्रेनर स्कीम/प्लॅन हवा....
HDFC sanchay HDFC life चा आहे
HDFC sanchay HDFC life चा आहे.
लाइफ कव्हर + annuity अशी खिचडी दिसते.
तुमच्या आधीच्या धाग्यावर अशा प्लान बद्दल घमासान चर्चा झाली होती.
तुमच्यासाठी मस्तच आणि मस्टच आहे हा.
धागा त्या ग्रुपमध्ये हलवा
धागा त्या ग्रुपमध्ये हलवा
धागा हलवला..
धागा हलवला..
मला इन्शुरन्स प्लॅन नकोय - इथे इन्शुरन्स ऍड आहे पण प्रायमरी इन्शुरन्स प्लॅन नाहीय...
आणखी काही ऑप्शन्स आहेत का कुठे...
लोकांना व्याजावर पैसे ध्या.
लोकांना व्याजावर पैसे ध्या..बँका सहज पर्सनल कर्ज लोकांना देत नाहीत ..कर्ज जे हमखास बुडवितात त्यांनाच करोडो रुपयांचे कर्ज देतात...
तुम्ही व्याजावर पैसे ध्या खूप ग्राहक आहेत आणि व्याज पण २५ ते ३० टक्के
इतके व्याप नको आहेत लोकांना
इतके व्याप नको आहेत लोकांना व्याजावर पैसे देणे वगैरे...
एच डी एफ सी बँकेतील रिलेशन
एच डी एफ सी बँकेतील रिलेशन शिप मॅनेजर कडे चौकशी केल्यास बर्याच योजना उपलब्ध आहेत. वेल्थ मॅनेजमेंट/ एन आर आय विभागात चौकशी करा. साधे डिमॅट अकाउंट असेल तर शेअर्स मध्ये का नाही टाकत?!
साधे डिमॅट अकाऊंट लीगली अलाऊड
साधे डिमॅट अकाऊंट लीगली अलाऊड नाही. एनआरआय काढावे लागते. बाकी रिलेशनशिप मॅनेजर, वेल्थ मॅनेजरचा ही धसका घेतला आहे. त्यांना ज्यात फायदा तेवढंच ते सांगतात... नाही गळी उतरवतात. हल्ली भारतीय बँकांत फक्त तुसडेपणे वावरतो. त्यांना एनआरआय माज वाटत असेल. मी त्यांना टाळत असतो.
भारतात कशाला गुंतवणूक करताय? आणि त्यात इंन्शुरन्स मध्ये कशाला करताय?
पूर्वी आयसीआयसीआय मध्ये फार लक्ष न देता त्यांनी सांगितल्या गोष्टींना भुलून हात पोळून घेतले आहेत. तेव्हा पासून भारतात रहायचं नाही तर कशाला झेंगटं पाठी लावा हा सोयिस्कर विचार करतो. हे आर्थिकदृष्ट्या फार वाईज नसेल कदाचित. पण डोक्याला ताप कमी होतो.
तुम्हाला शुभेच्छा.
थँक्स अमितव - इन्शुरन्स मध्ये
थँक्स अमितव - इन्शुरन्स मध्ये नकोच आहे मला.. मला सिंपल इन्व्हेस्टमेंट हवी आहे जे पेंशन प्लॅन सारखे कामाला येईल...
अमेरिकेत फोरोवनके , स्टोक्स आणि म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट आहे...थोडी रियल इस्टेट देखील आहे... डायव्हर्सिटी म्हणून भारतात विचार करतोय....
ओके. मेक्स सेन्स!
ओके. मेक्स सेन्स!
बँकेची रिलेशनशिप मॅनेजर तिला
बँकेची रिलेशनशिप मॅनेजर तिला ज्या स्कीम /प्लानचं टारगेट असेल ती तुमच्या गळ्यात बांधू पाहील.
म्युच्युअल फंडांच्या वेबसाइट्सवर त्यांच्या स्कीमसची माहिती कोणत्याही अडथळ्याशिवाय वाचता येते. अशी एखाद्या इन्शुरन्स कंपनीची वेबसाइट असेल तर सांगा. फोन नंबर, वय असले डिटेल दिल्याशिवाय प्लानची सगळी माहिती देणारी.
भरत - पण म्युच्युअल फंड्स वर
भरत - पण म्युच्युअल फंड्स वर टॅक्स लागेल बरोबर?
Hdfc चा जो प्लॅन मला फोन वर सांगितला त्यात 7.38% रिटर्न म्हणतोय ग्यारंटेड... जो fD पेक्षा जास्त आणि मार्केट पेक्षा कमी आहे... मी कन्फयुज आहे म्हणून इथे प्रश्न टाकला....
मला बजाज अलायन्झचा प्लान
मला बजाज अलायन्झचा प्लान सांगितला होता. त्यात पैसे भरल्यावर काही वर्षांनी अॅन्युइटी / पेन्शन सुरू होते. (हे बरोबरच आहे ). त्यामुळे ७ -८ % जे काय असतात त्याचा रेट ऑफ रिटर्न एफ डी शी कंपेर करता येत नाही. दुसरं म्हणजे ही पेन्शन लाइफ लाँग आहे.
टॅक्सचं म्हणाल तर ते नियम सतत बदलत असतात. आज पेन्शनवर टॅक्स नसेल, तर उद्याही नसेलच असं नाही.
म्युच्यल फंडमध्ये फंडचा प्रकार, पे आउटचा प्रकार यानुसार टॅक्स लायाबिलिटी बदलेल.
मार्केट रेट ऑफ रिटर्न म्हणजे कोणता?
तुम्हाला शुभेच्छा.> नो नीड.
तुम्हाला शुभेच्छा.> नो नीड. माझ्या मॅनेजर्स छान वागतात. एकदम विनम्र. व मदत पण करतात. एच डी एफ सी तर एकदम सुरेख सर्विस. इट डिपेंड्स ऑन द कस्टमर ऑल्सो. करा मस्त इन्वेस्ट मेंट्स. एल आय सीच्या पण चांगल्या असतात योजना. माझा एजंट व त्याचे ऑफिस पीपल पण फार सपोर्टिव्ह आहेत. आपण पण इक्वली सहकार्य व माहिती घेउन प्रश्न विचारावे लागतात. इथे खरेतर अर्ध्या गोष्टी अॅप वर व ऑन लाइन साइट वर माहिती घेउन होतात. अगदी गरजच पडली तर ह्युमन इंटरफेस. मग हजारदा फीड बॅक विचारता त ते जरा बोअर होते.
मी एकदा देते. मग इग्नोअर.
एन आर आय माज मॅनेज करायला त्यांना भरपूर अनुभव असतो अहो. आता त्यात नाविन्य राहिलेले नाही. व त्यांचा खरा बिझनेस हाय नेट वर्थ भारतीय, फॅमिली ऑफिस मधून येतो.
ते इटलीत एक गाव एक डॉलर मध्ये मिळते तसे काहीतरी घेता येइल.
अमा अहो ते शुभेच्छा मला देत
अमा अहो ते शुभेच्छा मला देत होते
<इन्शुरन्स मध्ये नकोच आहे मला
<इन्शुरन्स मध्ये नकोच आहे मला.. मला सिंपल इन्व्हेस्टमेंट हवी आहे जे पेंशन प्लॅन सारखे कामाला येईल...
अमेरिकेत फोरोवनके , स्टोक्स आणि म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट आहे...थोडी रियल इस्टेट देखील आहे... डायव्हर्सिटी म्हणून भारतात विचार करतोय....>
यातलं अमेरिका भारत रियल इस्टेट सोडलं तर मलाही लागू पडतंय. मीही पेन्शन प्लान शोधतोय.
काही शॉर्टलिस्ट केले आहेत का
काही शॉर्टलिस्ट केले आहेत का भरत?
नाही अजून. इंटरमिडियरीशिवाय
नाही अजून. इंटरमिडियरीशिवाय माहिती काढणं कठीण दिसतंय
hdfc संचय प्लस प्लॅन कसा आहे.
hdfc संचय प्लस प्लॅन कसा आहे.. 7.38% रिटर्न आहे ग्यारेंटेड... आणखी चांगले इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुचवता का प्लिज... >>> भारतिय रुपयातच का गुंतवायचे आहेत. SBI चे अमेरिकेन डॉलरचे फिक्स डिपॉसिट (ज्याला अमेरिकत सि डी म्हणतात) त्ये ४.२५-४.७५ टक्याने उपलब्ध आहेत. SBI मधुन बाकीच्या देशात पण फिक्स डिपॉसिट (FCNR) करु शकता. अमेरिकेत SBI आहे. SBI च्या एवजी बाकी भारतिय बॅकेत पण FCNR करु शकता. FCNR रिटर्न पुर्णपणे करमुक्त आहे.
पण म्युच्युअल फंड्स वर टॅक्स लागेल बरोबर? > NRI म्युच्युअल फंड मधिल पैसे काधुन घेताना , जर एक वर्ष झाले असेल तर नफ्यावर १०.४% कर कापुन देतात. त्यातिल काही (किंवा पुर्ण ) रक्कम टॅक्स रिटर्न भरुन परत मिळु शकते. म्युच्युअल फंड (एक वर्षाच्या पेक्षा जास्त वेळ झाला असल्यास ) मधिल पहिले १ लाख रुपये करमुक्त, बाकिच्या रकमेवर १०.४% , जर भारतात काहिच उत्पन्न नसल्यास पहिले ३.५ लाख करमुक्त बाकी वर १०.४% .
हल्ली भारतीय बँकांत फक्त तुसडेपणे वावरतो. >> +१ , फक्त यस बॅकेत चांगली सेवा मिळते पण दोन वर्षापुर्वी या बॅकेला बेल आउट केले होते.
आयसीआयसीआय चा रिलेशन मॅनेजर
आयसीआयसीआय चा रिलेशन मॅनेजर हा प्रकार भारी आहे. त्यांना इमेल ला उत्तर कसे द्यायचे हे शिकवले जात नसावे. एक बॉयलरप्लेट उत्तर येते कायम ("तुमच्या अकाउंटला जर रिलेशन मॅनेजर असेल तर त्यांच्याशी संपर्क करा" ई.). एकदा माझ्या अकाउंटचा रिलेशन मॅनेजर बदलला म्हणून खुशखबर टाइप मेल आली. त्याला उत्तर म्हणून त्या आरएमच्या आयडीला सहज गंमत म्हणून लिहीले की अहो ती मागची रिलेशन मॅनेजर इमेलवर चुकूनही उत्तर देत नसे. होपफुली तुम्ही वेगळे असाल. तर त्यावर तेच बॉयलरप्लेट उत्तर आले. मग खुमखुमी येउन आणखी लिहीले की अहो आरएम ला काय संपर्क करायला सांगताय मी तुमच्याच मेलवर हे उत्तर पाठवले होते. माझ्या अकाउंटला जर आरएम नसता तर ही मेलच कशी आली असती. तर त्यावरही पुन्हा तसेच्या तसे तेच बॉयलरप्लेट उत्तर आले
मात्र प्रत्यक्षात ब्रांच मधे गेलो तर हे लोक अगदी अगत्याने वागतात. यांचे आणि इमेलचे काय वाकडे आहे माहीत नाही.
भरत NPS चा विचार करा. Yearly
भरत NPS चा विचार करा. Yearly 50000 tax benefit + you can add 10% of basic salary monthly as corporate NPS. This amount will be also tax free in addition to 50000
भरत, NPS बघा, चांगला पर्याय
भरत, NPS बघा, चांगला पर्याय असू शकतो.
भरत, पेन्शन प्लान साठी वेगळा
भरत, पेन्शन प्लान साठी वेगळा धागा सुरू करता काय?
तिथे उत्तम चर्चा होईल.
मी कधीचाच निवृत्त आहे.
मी कधीचाच निवृत्त आहे. त्यामुळे एन पी एस टॅक्स बेनेफिट मला उपयोगाचे नाहीत.
मला बजाजचा तो नो ब्रेनर पेन्शन प्लान आवडातोय कारण फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न आणि ११० व्या वर्षापर्यंत पेन्शन. (हे हसण्यावारी न्याल. मीही कोणे एके काळी पी एफ ला आलेला पेन्शनचा पर्याय , पेन्शन खायला कोण एवढं जगणार? पी एफ हातात घेऊन मजा करू, असं म्हणून धुडकावून लावलाय. आता पुढे वृद्धत्व तुम्हांला जगू देत नाही आणि कायदा, मेडिकल सायन्स मरू देत नाही अशी स्थिती येणार आहे)
आणखी काही वर्षांनी मला लागणार्या कॅश इन्फ्लोचा काही भाग असा रेग्युलर येत असेल तर आहे त्या इन्व्हेस्टमेंटचं चर्नींग करत बसणं कमी होईल.
पेन्शन प्लान्सबद्दल वेगळा धागा काढायला हवा. पण मला शक्य तितकी सगळी माहिती घेऊन धागा काढायला आवडतं आणि मी पेन्शन प्लान्सबद्दल आताच माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. तरी काढतो. कोणी अभ्यास केला असेल तर काढला तरी बरं होईल.
जर तुम्हाला ७.४% परतावा
जर तुम्हाला ७.४% परतावा चालणार असेल तर RBI Retail Direct वरून सरळ Sovereign Bonds, SDL मधे गुंतवणूक करा. तुम्हाला हव्या त्या कालावधी साठी पैसे गुंतवता येतील.
हे सगळे फिक्स्ड रिटर्न स्किम्स शेवटी कुठे पैसे गुंतवतात? त्यांचे एक्सपेन्सेस आपण पे करण्यापेक्षा सरळ Government bonds घेणे कधीही चांगले.
Senior citizens saving scheme
Senior citizens saving scheme (SCSS), Pradhan Mantri Vaya Vandana Yojana( PMVVY) यात पण. ७.४% व्याज आहे.
ज्येना साठी त्या पण चांगल्या आहेत.
फिक्स्ड् रिटर्न, कमीक कमी रिस्क प्रोडक्ट्स.
१. सरळ RBI RETAIL DIRECT वरुन. Govt bonds घेणे.
२. SCSS
3. PMVVY
4. Bharat bonds ETF or FOF
या सगळ्यामधे सध्या ७.४० टक्के परतावा मिळतो. आपली टॅक्स ब्रॅकेट, व्याज कधी हवे, गुंतवायची रक्कम, सोय वगैरे पाहून यातल्या एखाद्या मार्गाने गुंतवणूक करता येईल.
माझ्या मते PPFAS चा HYBRID FUND पण बरा आहे.
पेन्शन प्लान्सबद्दल वेगळा
पेन्शन प्लान्सबद्दल वेगळा धागा काढायला हवा. पण मला शक्य तितकी सगळी माहिती घेऊन धागा काढायला आवडतं आणि मी पेन्शन प्लान्सबद्दल आताच माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. तरी काढतो. कोणी अभ्यास केला असेल तर काढला तरी बरं होईल.>>> मला पण आता पेन्शन सुरु होईल जानेवरी पासोन काढा वेगळा धागा. तिथे आधार कार्ड मोबाइल चे मॅपिन्ग लागते असे आमच्या एच आर ने सांगितले.
आजच लेकीने ए च डी एफ सी ची एक स्कीम घेतली आहे.
कोणती स्कीम मामी?
कोणती स्कीम मामी?
FD,mf, insurance ह्या पलीकडे
FD,mf, insurance ह्या पलीकडे गुंतवणूक करण्याचे मार्ग असतात ...त्याचा विचार आपण का करत नाही .व्याजाने पैसे ध्या हा एक नी मार्ग सांगितला होता.
आपला पैसा आपल्यालाच वाढवायचा आहे.
बँका किंवा अर्थ संस्था तुमचा फायदा करण्यासाठी निर्माण झालेल्या नाहीत.
त्यांचा स्वतःचा फायदा करण्यासाठी आहेत.
आयुष्य सुरक्षित करून बाकी धोकादायक मार्ग गुंतवणुकी साठी वापरणे खरी कसोटी आहे.
डोळे उघडे ठेवले तर अनेक मार्ग आहेत.
Pages