एका खिडकीपाशी

Submitted by रघू87 on 5 November, 2022 - 12:49

एका खिडकीपाशी

इथून दिसतो मावळतीचा सूर्य
हळू हळू क्षितिजामागे जाताना
पक्ष्यांच्या थव्यातला एकेक पक्षी
आपापल्या घरट्याकडे परतताना
रखरखत्या उन्हान पोळलेले रस्ते
हलक्या पावलांनी चौकात येताना
ओणव्या उभ्या पुलाच्या पाठीवरील
रहदारीचं ओझं कमी कमी होताना
दिवसभर झोप काढून उठलेले दिवे
आळस देत मंद मंद पेटताना
पण....पण...
येईल आता खोट्या प्रकाशाने
झगमगणारी रात्र
आणि पुसून टाकेल हे चित्र
येईल पुन्हा तोच नेहमीचा
स्वयंप्रकाशी दिवस
घड्याळाच्या काट्याशी
हतबल विवश
दिवस आणि रात्र,
खरं आणि खोटं
यांच्यामध्ये,
थांबले आहेत हे काही क्षण
आणि...
आणि कदाचित...
थांबलं आहे,
माझं आयुष्यही
या एका खिडकीपाशी.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली....