महाराष्ट्रात मी बर्याच गावात पाणीपुरी खाल्लीय (नवीन गावात गेलो की तिथली पाणीपुरी चाखल्याशिवाय चैन पडत नाही). पण नेहमीच नागपूरमधल्या पाणीपुरीला जी चव आहे ती कुठेच मिळाली नाही. महाराष्ट्रात तरी सगळ्यात चांगली पाणीपुरी नागपूरात मिळते असे माझे प्रामाणिक मत आहे. (कुठेही)कदाचित उत्तर भारतात किंवा मध्यभारतात जास्त चांगली मिळत असेल पण मला तो अनुभव नाही. पण नागपूरातल्या चिंचेला एक वेगळी चव असावी. पाणीपुरी अत्यंत बंडल दक्षिण भारतात कुठेही. बंगलोर, मद्रास, त्रिवेंद्रम सगळीकडे बेचव. मुख्य म्हणजे चिंचेच्या पाण्याला/चटणीला कसल्यातरी बेचव पीठाची चव असते.
सीताबर्डी ला घुगरेंची टपरी/दुकान आहे. तिथे सांबरवडी आणि वडापाव मस्त मिळतो.
अभ्यंकर नगर पेट्रोल पंपाच्या आणखी थोडं पुढे एक छोटंसं दुकान आहे, तिथेपण वडापाव एकदम सही.
आनंद भंडार मधलं मिश्टी दही.
बापटांकडच्या ओल्या करंज्या आणि सांबरवडी.
प्रीती : दुर्गा मंदिर म्हणजे प्रताप नगर चौकातलं का? तीथे 'बॉम्बे चाट' नावाचं दुकान 'होतं'. सगळेच पदार्थ बेफाम असायचे. मला कळलं की ते अगदी अलिकडेच बंद झालंय म्हणून.
<< टेकडीवर पी जी टी डी कँपसच्या कळकट्ट कँटीनचा चहा, समोसा आणि कचोरी!>>
तिथेच एल आय टी पण आहे ना? आम्ही तिथे असताना असले काही खायला किंवा चहा सुद्धा आयता हवा असेल तर धरमपेठच्या मेन रोडवर जावे लागायचे. अर्थात नाहीतरी धरमपेठला अधून मधून जाणे आवश्यकच असे. कारण टेकडीवर एकही मुलगी नसे. मुलगी कशी दिसते हे विसरायला होऊ नये म्हणून मधून मधून धरमपेठेत जावे असे तिथल्या सिनियर मुलांनी आम्हाला सांगितले होते.
घुगरे म्हणजे आमच्या घरासमोरच. तिथे तेंव्हा सांबरवडी, वडापाव मिळत नसे. एकदा आम्ही असेच कुठेतरी सिनेमाला जाऊन परत येत असता भूक लागली म्हणून त्यांच्या दुकानी थांबलो. बहुतेक सगळे संपले होते. फक्त कंबरघट्ट लाडू शिल्लक होते. ते साधे डिंकाचे लाडू निघाले. त्यांना कंबरघट्ट का म्हणतात हे बर्याच वर्षांनी कळले.
<<जगतमधले समोसे, शेरेपंजाब मधले छोले भटुरे>> हे पन्नास वर्षांपूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. कदाचित् जास्तच.
पाणीपुरीला नागपूरमधे गपचूप म्हणत असत, पन्नास वर्षांपूर्वी. तेंव्हा मी पुण्याहून सुट्टीत नागपूरला गेलो असता माझा नागपूरचा मित्र म्हणाला, आपण गपचूप खाऊ या का? काहीतरी बाहेरचे गुपचूप खायचे म्हणजे चैनच. मी म्हंटले हो, पण काय खायचे? तो म्हणाला गुपचूप. असे "who's on first" सारखे दोन तीन मिनिटे झाल्यावर त्याने मला पाणीपुरीची गाडी दाखवली तेंव्हा मला कळले!
अपना बाजार (सीताबर्डीला) लागून असलेलं घुगरेंचं दुकान. तिथला बटाटेवडा आणि श्रीखंड.
सरस्वती हायस्कूलच्या चौकात, आणि त्या चौकाला लागून असलेल्या चायनीज, भेळपुरी, पावभाजी - पुलाव आणि गुझियावाल्यांच्या गाड्या.
धरमपेठेतील यांकी डुडलचं आईस्क्रीम आणि त्यासमोरच्या प्रीती चाट कॉर्नरची सांबारवडी आणि आलू टिक्की.
सावजींचं चिकन आणि मटन.
वर्धा रोडवर असणारी मोठमोठी गार्डेन रेस्टॉरंट्स- त्यात द्वारका आणि अजून एक फेमस- आता नाव आठवत नाही.
शेवाळकरांचं पर्णकुटी.
बाकी मृनी लिहिलेली सगळीच.
<महाराष्ट्रात मी बर्याच गावात पाणीपुरी खाल्लीय (नवीन गावात गेलो की तिथली पाणीपुरी चाखल्याशिवाय चैन पडत नाही). पण नेहमीच नागपूरमधल्या पाणीपुरीला जी चव आहे ती कुठेच मिळाली नाही. महाराष्ट्रात तरी सगळ्यात चांगली पाणीपुरी नागपूरात मिळते असे माझे प्रामाणिक मत आहे<>
आमच्या अकोल्याबद्दल आम्ही असंच म्हणतो. अकोल्यातलीच पापु बेष्ट, असा सार्वत्रिक समज आहे.
हॉटेल सेंटर पार्काच्या जवळ, लोकमत चौकात, मिदास टच हॉस्पिटलाच्या मागे एक गुरुद्वारा आहे. तिथल्या लंगरात अप्रतिम राजमा-चावल मिळतात. त्याच्याच शेजारी एक ढाबा आहे. तिथलं जेवणही मस्त.
धरम पेठला जायच्या रस्त्यावरच्या आनंद भांडार बद्दल कोणीच काही लिहिलं नाही. रसमलाई आणि रसगुल्ले , मी , माझा नवरा आणि तिथलं मित्रमंडळ अक्षरशः पैज लावून खातो . नागपुरी मित्र एका बैठकीत २ किलो सहज खातात . ( मी मूळची नागपूरची नाही . , तेव्हा गैरसमज नको. )
>>पाणीपुरी अत्यंत बंडल दक्षिण भारतात कुठेही. बंगलोर, मद्रास, त्रिवेंद्रम सगळीकडे बे>>>>
अगदी, अगदी इतकी बंडल बनवतात की काय! अणि ज्यात त्यात गाजरं टाकतात! पाणीपुरीत गाजरं टाकायला स्कोप नाही म्हणा, पण भेळेत गाजरं, चाटमध्ये गाजरं, गाजरांची भाजी, आमटीत गाजरं, भातही सुटत नाही ह्यातून! पुलावच्या नावाखाली गाजरं! शप्पत!
अरे हो. जाई. बोरकुट. ऑसम.
आईच्यामते खोकल्याला आमंत्रण. पण जबरदस्त. अशी बोरं पुण्या,मुंबईला पाहायला पण मिळत नाही.
बोरं नाही आणि घोळ, चिवळ, भोकराचं लोणंच, पुडाच्या वड्या आणि खास नागपुरी पांढरे कांदे नाही. चालायचच.
वर सगळ्यांच पाणीपुरी वर्णन वाचून, आता कधी जायची वेळ आल्यास नक्की खाऊन पाहणार.
माझा एक कलिग आहे नागपुरचा. तो नागपुरला गेला की ऑफिसात सगळ्यांची बोरकुटाला जाम मागणी असते. नागपुरची संत्रा बर्फी पण छान लागते खुप.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
राम भंडार...महाल...
इथली लस्सी एकदम झकास...!!! परवाच नागपुरला जाऊन तिथली लस्सी पिऊन आले ;)...
आणि बोरकुट दिलंय आज्जीनी घरी तयार केलेलं...
यशवंत स्टेडीयम जवळची पाव भाजी मस्तं अस्ते...
हल्दीराम ची राज कचोरी तर एण्ड...
आणि खव्याची जिलेबी...पण राम भंडार महाल...
खव्याच्या करंज्या (नागपुरातच मिळतात)....राम भंडार महाल...
पंडितांकडच्या नारळाच्या वड्या....एण्ड...
हो रे बी, रोज ताजे पदार्थ असतात. आमच्या घराजवळचं दुकान वर्धारोडला अजनीचौकात आहे.
यशवंतनगरला एक 'पर्णकुटी' होतं. आहे का अजून माहिती नाही. पानं मांडून, रांगोळ्या काढून साग्रसंगीत जेवण असायचं.
महालात 'घाटे दुग्ध मंदीराचे' पेढे लई फ्येमस होते असं ऐकलंय.
जामनगरी फरसाण्वाल्याकडे (अभ्यंकर रोड, बर्डी) फरसाण आणि समोसे अफलातून मिळायचे.
गोकुळपेठेत कॉफीहाउसची कॉफी पण पॉप्युलर होती आमच्या लहानपणी. वेस्ट हायकोर्ट रोडला लक्ष्मीभुवन चौकात 'दिलीप कुल्फी'चं दुकान आलं की हमखास घशाला कोरड पडायची. आनंदभंडार तर विचारायलाच नको.
लक्ष्मीभुवन चौकातच आधी एक 'अरुण वाचनालय' होतं. त्याच्या समोरच्या टपरीतली चाट त्रिभुवनात मिळणं शक्य नाही. त्याने अश्या मोक्याच्या जागेवरून दुकान सरोजटॉकीजच्या मागे हलवलं तरी तुफान गर्दी असायची.
सरस्वतीशाळेसमोरच्या ठेल्यांपैकी एकात कणसाचा उपमा मिळायचा. मसाला भुट्टा आणि हा उपमा खायला तडफडून जायचो.
झक्की, LITच्या टेकडीवरचा सीन माहिती नाही. युगंधर त्याबद्दल जास्त सांगु शकतील.
शिंगाडे (उकडलेले) हा प्रकार मी पहिल्यांदा नागपूरला खाल्ला. जेवण झाल्यावर मस्त गप्पांचा फड रंगवावा. उन्हाळ्यात अंगणात किंवा गच्चीवर असाल तर अधिक चांगले. मग किती गप्पा मारल्या आणि किती शिंगाडे खाल्ले याची नोंद ठेवू नये.
नागपुरातलि पाणिपुरि बेस्टच पण नागपुरातहि सर्वोत्तम दोन ठिकाणि एक जनता चौकात गुजरात पॉइंट इथलि आणि दोन इतवारिमध्ये व्यंकटेशाच मंदिर आहे त्याच्या जवळ खास उत्तर प्रदेशातले लोक येतात त्यांच्या कडचि, प्रचंड मोठि आणि अप्रतिम चविचि पाणिपुरि असते अशि कुठेच नाहि मिळणार ह्याचि ग्यारंटि!
बाकि बोरकुट, आनंद भंडार मधिल बंगालि मिठाइ, ऑल टाइम फेव्ह.
हल्दिराम कडचा बटर मसाला डोसा, ठाठ बाट मधलि राज कचोरि आणि आणि ते नविन हल्दिराम च दुकान झालय यशवंत स्टेडिअम जवळ तिथलि सोनपापडि आणि सॉफ्टि आइस्क्रिम!
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!
सोमलवार रामदासपेठच्या शेजारी एक ज्यूस सेंटर होतं (आता आहे कि नाही, माहित नाही) तिथे शाळेच्या मधल्या सुट्टीत काय गर्दी जमायची! तिथले समोसे, doughnuts तेव्हा खूप आवडायचे.
ईथे जुन्या ठिकाणांची जास्त माहिती दिली आहे सर्वांनी, त्यातील काही ठिकाणे आता तितकी चांगली राहिलेली नाहीत किंवा बंद पण झालीत.
जसे की
"नैवेद्यमची थाली, आर्यभुवनमधला दोसा, जगतमधले समोसे" यापैकी जगत आणि आर्यभुवन ईथे एक दोन वर्षांपुर्वी अस्वच्छ किचन असल्यामुळे नागपूर मनपाची कारवाई झालेली.
धरमपेठची सोफ्ट सेल आईसक्रिम << आता ती क्वालिटी देत नाही.
दुर्गा मंदिरासमोरील पाणी पुरीचे जे दुकान आहे >> बंद झाले.
लक्ष्मीभुवन चौकात 'दिलीप कुल्फी'चं दुकान >> बंद झाले
धरमपेठेतील यांकी डुडलचं आईस्क्रीम >> बंद झाले
शेवाळकरांचं पर्णकुटी. >> बंद झाले.
चाटचे दुकान सरोजटॉकीजच्या मागे >> हेही बंद झाले
जनता चौकात गुजरात पॉइंट << याचे नाव रामदेव डेअरी आहे. पाणिपुरी आणि रगडा पॅटीस अल्टिमेट मिळते.
हॉटेल सेंटर पार्काच्या जवळ, लोकमत चौकात, मिदास टच हॉस्पिटलाच्या मागे एक गुरुद्वारा आहे. >> चिनूक्स तो गुरुद्वारा हॉटेल सेन्टर पॉईन्ट च्या जवळ, लोकमत चौकात, मिडास हाईट्स ईमारती च्या मागे आहे.
वरिल माहिती मला कसे अद्ययावत ज्ञान आहे याचे प्रदर्शन करायला दिलेली नसून केवळ या ठिकाणांच्या शोधात कुणी मायबोलीकर जायचे आणि पस्तावायचे म्हणून दिली आहे.
असो. तर नागपूरातील काही नविन (किंवा वर उल्लेख नं झालेली) ठिकाणे >>>
१.माऊंट रोड, सदर येथे फ्लेम्स म्हणून नविन रेस्तरॉ सुरू झालय (व्ही फाईव या हॉटेलच्या आत आहे.) कबाब्स अल्टीमेट मिळतात.
२.दुसरे नॉन व्हेज सर्वात उत्तम मिळणारे ठिकाण म्हणजे "बार्बेक्यु" , माऊंट रोड, सदर. चिकन टिक्का आवर्जून खावा असा.
३. सावजी उत्तम मिळण्याची ठिकाणे वर कुणिच लिहीलेले नाही. काबर? (मला सावजी मसाला विशेष आवडत नाही त्यामुळे या बाबतीत माहिती नाही) ऐकिव माहिती वरून: महालात शुक्रवार तलावा समोरचे जगदिश सावजी.
४. कॉफी हाऊस चौकातील : "ओव्हन फ्रेश" मधली चॉकलेट आणि ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री, "गोकुळ वृंदावन" येथील ईडली, वडा आणि "सांबार"!
५. देना बॅन्क चौकातील बर्फाचा गोळा (फक्त उन्हाळ्यात असतो)
६. VRCE (आता VNIT), अभ्यंकर चौकातले, बटर भुट्टे.
७. "काठी क्रॉसिंग" म्हणून सदर, डागा ले आउट येथे काठी रोल्स (कलकत्ता रोल्स). मस्त असते चव.
८. अशोका हॉटेलचे सिझलर्स
९. सिव्हील लाईन्स मधे जैन कुल्फी चे एक छोटे दुकान नविन सुरू झालय. जुन्या हॉट ब्रेड्स,(VCA stadium) च्या बाजूला. तिथे सिताफळ कुल्फी आणि केशर बदाम कुल्फी छान मिळते.
ह. ह. चांगलं लिहिलंय. खरंच गेल्या १५ वर्षात नागपुरात काय बदलंय त्याबद्द्ल आता जास्त माहिती नाही.
कॉफीहाऊस चौकातलं वृंदावन आठवणीत आहे. (कारण आम्ही गोकुळपेठेत रहायचो.)
मोतीमहल आहे का अजून?
सदरला कराची स्टोअर्सच्या जवळ एक हॉटेल होतं. (नाव आठवत नाही.) पण तिथे कबाब, कसले कसले टिक्के आणि खिम्याचे पराठे मिळायचे.
सुरुची!! नाव आठवून दिल्याबद्दल थँक्यु! त्यांच्याकडे ऑर्डर देऊन पुडाच्या वड्या मिळतात. त्या पंडीत आणि इतरांपेक्षा खूSSप चांगल्या असतात. त्याच दुकानात आवळा सुपारी, बोरकूट, मेतकूट, कुटाच्या मिरच्या असं सगळं पण मिळतं. फक्त दुकानासमोर पार्किंगच्या जागेची मारामार असते. तेव्हा ऑटोरिक्षानी जावं. नाहीतर अगदी संगम टॉकीजच्या पार्किंग लॉटात किंवा महाजन मार्केट्मध्ये गाडी पार्क करावी लागते.
महाराष्ट्
महाराष्ट्रात मी बर्याच गावात पाणीपुरी खाल्लीय (नवीन गावात गेलो की तिथली पाणीपुरी चाखल्याशिवाय चैन पडत नाही). पण नेहमीच नागपूरमधल्या पाणीपुरीला जी चव आहे ती कुठेच मिळाली नाही. महाराष्ट्रात तरी सगळ्यात चांगली पाणीपुरी नागपूरात मिळते असे माझे प्रामाणिक मत आहे. (कुठेही)कदाचित उत्तर भारतात किंवा मध्यभारतात जास्त चांगली मिळत असेल पण मला तो अनुभव नाही. पण नागपूरातल्या चिंचेला एक वेगळी चव असावी. पाणीपुरी अत्यंत बंडल दक्षिण भारतात कुठेही. बंगलोर, मद्रास, त्रिवेंद्रम सगळीकडे बेचव. मुख्य म्हणजे चिंचेच्या पाण्याला/चटणीला कसल्यातरी बेचव पीठाची चव असते.
दुर्गा
दुर्गा मंदिरासमोरील पाणी पुरीचे जे दुकान आहे तिथले सगळेच चाट प्रकार मस्त असतात.
पाणीपुरीब
पाणीपुरीबद्दल अजय, तुम्हाला अनुमोदन!
नैवेद्यमची थाली, आर्यभुवनमधला दोसा, , हल्दिरामचे सगळेच पदार्थ, जगतमधले समोसे, शेरेपंजाब मधले छोले भटुरे हे सगळं प्रचंड आवडतं.
सावजी भोजनालयातलं मटण चिकन फार चवदार असतं असं ऐकलंय.
हल्दिरामकडे खाण्यासारखं : ढोकळे, समोसे, कटोरिचाट, सुरळीच्या वड्या, बुटकुल्यातलं दही, बाकी मिठाई.
ढोला-मारु मधली मारवाडी थाली.
मोदी नं३ मधल्या पंडीतांच्या दुकानातली अफलातून चटणी : 'वाटलं' नावाची. त्यांच्याकडचा चिवडा, चकल्या.
खामला रोडला एका टपरीत कचोर्या अप्रतीम मिळतात.
अमरावती रोडला टेकडीवर पी जी टी डी कँपसच्या कळकट्ट कँटीनचा चहा, समोसा आणि कचोरी!
आणि अभ्यंकर रोडला हल्दिरामच्या बाजुला असलेल्या दुकानातली पुडाची वडी!!!!!!!!
सीताबर्डी
सीताबर्डी ला घुगरेंची टपरी/दुकान आहे. तिथे सांबरवडी आणि वडापाव मस्त मिळतो.
अभ्यंकर नगर पेट्रोल पंपाच्या आणखी थोडं पुढे एक छोटंसं दुकान आहे, तिथेपण वडापाव एकदम सही.
आनंद भंडार मधलं मिश्टी दही.
बापटांकडच्या ओल्या करंज्या आणि सांबरवडी.
प्रीती : दुर्गा मंदिर म्हणजे प्रताप नगर चौकातलं का? तीथे 'बॉम्बे चाट' नावाचं दुकान 'होतं'. सगळेच पदार्थ बेफाम असायचे. मला कळलं की ते अगदी अलिकडेच बंद झालंय म्हणून.
<< टेकडीवर
<< टेकडीवर पी जी टी डी कँपसच्या कळकट्ट कँटीनचा चहा, समोसा आणि कचोरी!>>
तिथेच एल आय टी पण आहे ना? आम्ही तिथे असताना असले काही खायला किंवा चहा सुद्धा आयता हवा असेल तर धरमपेठच्या मेन रोडवर जावे लागायचे. अर्थात नाहीतरी धरमपेठला अधून मधून जाणे आवश्यकच असे. कारण टेकडीवर एकही मुलगी नसे. मुलगी कशी दिसते हे विसरायला होऊ नये म्हणून मधून मधून धरमपेठेत जावे असे तिथल्या सिनियर मुलांनी आम्हाला सांगितले होते.
घुगरे म्हणजे आमच्या घरासमोरच. तिथे तेंव्हा सांबरवडी, वडापाव मिळत नसे. एकदा आम्ही असेच कुठेतरी सिनेमाला जाऊन परत येत असता भूक लागली म्हणून त्यांच्या दुकानी थांबलो. बहुतेक सगळे संपले होते. फक्त कंबरघट्ट लाडू शिल्लक होते. ते साधे डिंकाचे लाडू निघाले. त्यांना कंबरघट्ट का म्हणतात हे बर्याच वर्षांनी कळले.
<<जगतमधले समोसे, शेरेपंजाब मधले छोले भटुरे>> हे पन्नास वर्षांपूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. कदाचित् जास्तच.
पाणीपुरीला नागपूरमधे गपचूप म्हणत असत, पन्नास वर्षांपूर्वी. तेंव्हा मी पुण्याहून सुट्टीत नागपूरला गेलो असता माझा नागपूरचा मित्र म्हणाला, आपण गपचूप खाऊ या का? काहीतरी बाहेरचे गुपचूप खायचे म्हणजे चैनच. मी म्हंटले हो, पण काय खायचे? तो म्हणाला गुपचूप. असे "who's on first" सारखे दोन तीन मिनिटे झाल्यावर त्याने मला पाणीपुरीची गाडी दाखवली तेंव्हा मला कळले!
अपना बाजार
अपना बाजार (सीताबर्डीला) लागून असलेलं घुगरेंचं दुकान. तिथला बटाटेवडा आणि श्रीखंड.
सरस्वती हायस्कूलच्या चौकात, आणि त्या चौकाला लागून असलेल्या चायनीज, भेळपुरी, पावभाजी - पुलाव आणि गुझियावाल्यांच्या गाड्या.
धरमपेठेतील यांकी डुडलचं आईस्क्रीम आणि त्यासमोरच्या प्रीती चाट कॉर्नरची सांबारवडी आणि आलू टिक्की.
सावजींचं चिकन आणि मटन.
वर्धा रोडवर असणारी मोठमोठी गार्डेन रेस्टॉरंट्स- त्यात द्वारका आणि अजून एक फेमस- आता नाव आठवत नाही.
शेवाळकरांचं पर्णकुटी.
बाकी मृनी लिहिलेली सगळीच.
खामला रोड
खामला रोड वर राजेश्चे समोसे, कचोरी - अप्रतिम असतात.
भाग्या ने सांगितलेले बर्डीतले अपना बाजार शेजारचे बटाटे वडे...
धरमपेठची सोफ्ट सेल आईसक्रिम, कलकत्ता रोल्स...
हल्दीरामचे सर्वच पदार्थ!
<महाराष्ट्
<महाराष्ट्रात मी बर्याच गावात पाणीपुरी खाल्लीय (नवीन गावात गेलो की तिथली पाणीपुरी चाखल्याशिवाय चैन पडत नाही). पण नेहमीच नागपूरमधल्या पाणीपुरीला जी चव आहे ती कुठेच मिळाली नाही. महाराष्ट्रात तरी सगळ्यात चांगली पाणीपुरी नागपूरात मिळते असे माझे प्रामाणिक मत आहे<>
आमच्या अकोल्याबद्दल आम्ही असंच म्हणतो.
अकोल्यातलीच पापु बेष्ट, असा सार्वत्रिक समज आहे. 
हॉटेल सेंटर पार्काच्या जवळ, लोकमत चौकात, मिदास टच हॉस्पिटलाच्या मागे एक गुरुद्वारा आहे. तिथल्या लंगरात अप्रतिम राजमा-चावल मिळतात. त्याच्याच शेजारी एक ढाबा आहे. तिथलं जेवणही मस्त.
नागपुरच्य
नागपुरच्या पाणीपुरीला अर्थातच प्रचंड बहुमत !! मॄ च्या यादीत मिसलेले काही ..
घुगरे-कचोरी, शंकरनगर चौकातून लक्ष्मीभुवन कडे जातांना लगेच डावीकडे पॅटिसवाला, बजाजनगर मा.से.सं. समोर चाटच्या गाड्या, यशवंत स्टेडीअम जवळ दहि भल्ले, कॉफी हाउस मधले कटलेट, तेलंखेडी हनुमान मंदिराजवळ समोसे, राम भंडार-खव्याच्या जिलब्या, बडकस चौकाजवळ अशोका कुल्फी, वगैरे वगैरे...
आणि ती
आणि ती अॅल्युमिनियमच्या वाटीत मिळणारी बर्डीवरची कुल्फी? तश्शी चव जगात कुठेही नाही.
जागेचं नाव काय ?
धरम पेठला
धरम पेठला जायच्या रस्त्यावरच्या आनंद भांडार बद्दल कोणीच काही लिहिलं नाही.
रसमलाई आणि रसगुल्ले , मी , माझा नवरा आणि तिथलं मित्रमंडळ अक्षरशः पैज लावून खातो . नागपुरी मित्र एका बैठकीत २ किलो सहज खातात .
( मी मूळची नागपूरची नाही .
, तेव्हा गैरसमज नको. )
>>पाणीपुरी
>>पाणीपुरी अत्यंत बंडल दक्षिण भारतात कुठेही. बंगलोर, मद्रास, त्रिवेंद्रम सगळीकडे बे>>>>
इतकी बंडल बनवतात की काय! अणि ज्यात त्यात गाजरं टाकतात! पाणीपुरीत गाजरं टाकायला स्कोप नाही म्हणा, पण भेळेत गाजरं, चाटमध्ये गाजरं, गाजरांची भाजी, आमटीत गाजरं, भातही सुटत नाही ह्यातून! पुलावच्या नावाखाली गाजरं! शप्पत!

अगदी, अगदी
नागपुर ला
नागपुर ला बंगाली मिठाई पण खुप छान मिळते. एवढे छान रसगुल्ले, खीरकदम आणि रसमलाई मला पुण्यात कुठेही मिळाली नाही.
अहाहा.....
अहाहा..... काय चविष्ट गोष्टी सुरु आहेत इथे .....
आणि खादाडी म्हटली की मृ आलीच पाहिजे .....;)
खव्याची जिलबी बहुतेक फक्त नागपुरातच मिळते..... कारण मी बर्याच ठिकाणी शोधली !! काय जबरी लागते !!
ए आणि तुम्ही केळकरांचं बोरकुट आणि व-हाडी ठेचा कसा विसरलात ?
बर्डीवरच्या पंडीतांकडच्या चकल्या, बाकरवडी, ओल्या नारळाच्या करंज्या, पुडाची वडी पण सॉलीड !!
आजकाल बापटांकडे चिरोटे पण कसले जबरी मिळतात !
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
अरे हो. जाई.
अरे हो. जाई. बोरकुट. ऑसम.
आईच्यामते खोकल्याला आमंत्रण. पण जबरदस्त. अशी बोरं पुण्या,मुंबईला पाहायला पण मिळत नाही.
बोरं नाही आणि घोळ, चिवळ, भोकराचं लोणंच, पुडाच्या वड्या आणि खास नागपुरी पांढरे कांदे नाही. चालायचच.
वर सगळ्यांच पाणीपुरी वर्णन वाचून, आता कधी जायची वेळ आल्यास नक्की खाऊन पाहणार.
माझा एक
माझा एक कलिग आहे नागपुरचा. तो नागपुरला गेला की ऑफिसात सगळ्यांची बोरकुटाला जाम मागणी असते. नागपुरची संत्रा बर्फी पण छान लागते खुप.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8242 इथे जा आणि आपले अनुभव शेअर करा.
राम
राम भंडार...महाल...
इथली लस्सी एकदम झकास...!!! परवाच नागपुरला जाऊन तिथली लस्सी पिऊन आले ;)...
आणि बोरकुट दिलंय आज्जीनी घरी तयार केलेलं...
यशवंत स्टेडीयम जवळची पाव भाजी मस्तं अस्ते...
हल्दीराम ची राज कचोरी तर एण्ड...
आणि खव्याची जिलेबी...पण राम भंडार महाल...
खव्याच्या करंज्या (नागपुरातच मिळतात)....राम भंडार महाल...
पंडितांकडच्या नारळाच्या वड्या....एण्ड...
आणि
आणि हो....मीना बाजार किंवा बर्डीवर कुठेही चनाजोर गरम....एकदम सही.....
हल्दिरामक
हल्दिरामकडे खाण्यासारखं : ढोकळे, समोसे, कटोरिचाट, सुरळीच्या वड्या, बुटकुल्यातलं दही, बाकी मिठाई.>>
मृ मला कळले नाही .. रोज ताजे पदार्थ पण बनवतो का हल्दीराम? कुठे आहे त्यांचे दुकान?
'बॉम्बे
'बॉम्बे चाट' बंद झालं

सावजीची अंडाकरी एकदम झ्याक
हो रे बी,
हो रे बी, रोज ताजे पदार्थ असतात. आमच्या घराजवळचं दुकान वर्धारोडला अजनीचौकात आहे.
यशवंतनगरला एक 'पर्णकुटी' होतं. आहे का अजून माहिती नाही. पानं मांडून, रांगोळ्या काढून साग्रसंगीत जेवण असायचं.
महालात 'घाटे दुग्ध मंदीराचे' पेढे लई फ्येमस होते असं ऐकलंय.
जामनगरी फरसाण्वाल्याकडे (अभ्यंकर रोड, बर्डी) फरसाण आणि समोसे अफलातून मिळायचे.
गोकुळपेठेत कॉफीहाउसची कॉफी पण पॉप्युलर होती आमच्या लहानपणी. वेस्ट हायकोर्ट रोडला लक्ष्मीभुवन चौकात 'दिलीप कुल्फी'चं दुकान आलं की हमखास घशाला कोरड पडायची. आनंदभंडार तर विचारायलाच नको.
त्याने अश्या मोक्याच्या जागेवरून दुकान सरोजटॉकीजच्या मागे हलवलं तरी तुफान गर्दी असायची.
लक्ष्मीभुवन चौकातच आधी एक 'अरुण वाचनालय' होतं. त्याच्या समोरच्या टपरीतली चाट त्रिभुवनात मिळणं शक्य नाही.
सरस्वतीशाळेसमोरच्या ठेल्यांपैकी एकात कणसाचा उपमा मिळायचा. मसाला भुट्टा आणि हा उपमा खायला तडफडून जायचो.
झक्की, LITच्या टेकडीवरचा सीन माहिती नाही. युगंधर त्याबद्दल जास्त सांगु शकतील.
आहाहा
आहाहा बोरकुट!!! काय आठवण काढली!
बी, हल्दीरामचे बर्डीत पण एक मोठे दुकान आहे. सर्वच मिळतं तिथे - सामोसे, ढोकळा, चाट, मिठाई, चायनीज, इटालियन, इ,
शिंगाडे
शिंगाडे (उकडलेले) हा प्रकार मी पहिल्यांदा नागपूरला खाल्ला. जेवण झाल्यावर मस्त गप्पांचा फड रंगवावा. उन्हाळ्यात अंगणात किंवा गच्चीवर असाल तर अधिक चांगले. मग किती गप्पा मारल्या आणि किती शिंगाडे खाल्ले याची नोंद ठेवू नये.
नागपुरातल
नागपुरातलि पाणिपुरि बेस्टच पण नागपुरातहि सर्वोत्तम दोन ठिकाणि एक जनता चौकात गुजरात पॉइंट इथलि आणि दोन इतवारिमध्ये व्यंकटेशाच मंदिर आहे त्याच्या जवळ खास उत्तर प्रदेशातले लोक येतात त्यांच्या कडचि, प्रचंड मोठि आणि अप्रतिम चविचि पाणिपुरि असते अशि कुठेच नाहि मिळणार ह्याचि ग्यारंटि!
बाकि बोरकुट, आनंद भंडार मधिल बंगालि मिठाइ, ऑल टाइम फेव्ह.
हल्दिराम कडचा बटर मसाला डोसा, ठाठ बाट मधलि राज कचोरि आणि आणि ते नविन हल्दिराम च दुकान झालय यशवंत स्टेडिअम जवळ तिथलि सोनपापडि आणि सॉफ्टि आइस्क्रिम!
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!
या
या खादाडीच्या जागांची नावे, पत्ते लिहिले तर उपयोगी माहिती होईल. काही पदार्थ काही गावांची खासियत असते पण तिथे सर्वच ठिकाणी ते चांगले मिळतील असे नाही.
(अजय, शिंगाडे कोणाच्या अंगणात किंवा गच्चीवर मिळतील?
)
म.स. >> अजय,
म.स.
>> अजय, शिंगाडे कोणाच्या अंगणात किंवा गच्चीवर मिळतील?
आणि त्याआधीचे जेवण?
सोमलवार
सोमलवार रामदासपेठच्या शेजारी एक ज्यूस सेंटर होतं (आता आहे कि नाही, माहित नाही) तिथे शाळेच्या मधल्या सुट्टीत काय गर्दी जमायची! तिथले समोसे, doughnuts तेव्हा खूप आवडायचे.
ईथे जुन्या
ईथे जुन्या ठिकाणांची जास्त माहिती दिली आहे सर्वांनी, त्यातील काही ठिकाणे आता तितकी चांगली राहिलेली नाहीत किंवा बंद पण झालीत.
जसे की
"नैवेद्यमची थाली, आर्यभुवनमधला दोसा, जगतमधले समोसे" यापैकी जगत आणि आर्यभुवन ईथे एक दोन वर्षांपुर्वी अस्वच्छ किचन असल्यामुळे नागपूर मनपाची कारवाई झालेली.
धरमपेठची सोफ्ट सेल आईसक्रिम << आता ती क्वालिटी देत नाही.
दुर्गा मंदिरासमोरील पाणी पुरीचे जे दुकान आहे >> बंद झाले.
लक्ष्मीभुवन चौकात 'दिलीप कुल्फी'चं दुकान >> बंद झाले
धरमपेठेतील यांकी डुडलचं आईस्क्रीम >> बंद झाले
शेवाळकरांचं पर्णकुटी. >> बंद झाले.
चाटचे दुकान सरोजटॉकीजच्या मागे >> हेही बंद झाले
जनता चौकात गुजरात पॉइंट << याचे नाव रामदेव डेअरी आहे. पाणिपुरी आणि रगडा पॅटीस अल्टिमेट मिळते.
हॉटेल सेंटर पार्काच्या जवळ, लोकमत चौकात, मिदास टच हॉस्पिटलाच्या मागे एक गुरुद्वारा आहे. >> चिनूक्स तो गुरुद्वारा हॉटेल सेन्टर पॉईन्ट च्या जवळ, लोकमत चौकात, मिडास हाईट्स ईमारती च्या मागे आहे.
वरिल माहिती मला कसे अद्ययावत ज्ञान आहे याचे प्रदर्शन करायला दिलेली नसून केवळ या ठिकाणांच्या शोधात कुणी मायबोलीकर जायचे आणि पस्तावायचे म्हणून दिली आहे.
असो. तर नागपूरातील काही नविन (किंवा वर उल्लेख नं झालेली) ठिकाणे >>>
१.माऊंट रोड, सदर येथे फ्लेम्स म्हणून नविन रेस्तरॉ सुरू झालय (व्ही फाईव या हॉटेलच्या आत आहे.) कबाब्स अल्टीमेट मिळतात.
२.दुसरे नॉन व्हेज सर्वात उत्तम मिळणारे ठिकाण म्हणजे "बार्बेक्यु" , माऊंट रोड, सदर. चिकन टिक्का आवर्जून खावा असा.
३. सावजी उत्तम मिळण्याची ठिकाणे वर कुणिच लिहीलेले नाही. काबर? (मला सावजी मसाला विशेष आवडत नाही त्यामुळे या बाबतीत माहिती नाही) ऐकिव माहिती वरून: महालात शुक्रवार तलावा समोरचे जगदिश सावजी.
४. कॉफी हाऊस चौकातील : "ओव्हन फ्रेश" मधली चॉकलेट आणि ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री, "गोकुळ वृंदावन" येथील ईडली, वडा आणि "सांबार"!
५. देना बॅन्क चौकातील बर्फाचा गोळा (फक्त उन्हाळ्यात असतो)
६. VRCE (आता VNIT), अभ्यंकर चौकातले, बटर भुट्टे.
७. "काठी क्रॉसिंग" म्हणून सदर, डागा ले आउट येथे काठी रोल्स (कलकत्ता रोल्स). मस्त असते चव.
८. अशोका हॉटेलचे सिझलर्स
९. सिव्हील लाईन्स मधे जैन कुल्फी चे एक छोटे दुकान नविन सुरू झालय. जुन्या हॉट ब्रेड्स,(VCA stadium) च्या बाजूला. तिथे सिताफळ कुल्फी आणि केशर बदाम कुल्फी छान मिळते.
१०. स्वागत मिठाई भंडार, श्रद्धांनंद पेठ ईथली बासुंदी.
११. मृ म्हणतेय त्या हल्दीराम, अभ्यंकर रोड च्या बाजुला मिळणार्या "सुरुची" च्या पुडाच्या वड्या.
१२. नानकिंग, सदर येथील चायनिज (यांचे मे फेअर म्हणून हल्दीराम हॉट्स्पॉट जवळ आता नविन आणि जरा मोठे रेस्तरॉ सुरु झालय.
सध्या ईतकेच आठवतेय.
ह.ह., नवीन
ह.ह., नवीन माहिती बद्दल धन्यवाद! हीच लिस्ट घेऊन जावं नागपूरला.
ह. ह. चांगलं
ह. ह. चांगलं लिहिलंय. खरंच गेल्या १५ वर्षात नागपुरात काय बदलंय त्याबद्द्ल आता जास्त माहिती नाही.
कॉफीहाऊस चौकातलं वृंदावन आठवणीत आहे. (कारण आम्ही गोकुळपेठेत रहायचो.)
मोतीमहल आहे का अजून?
सदरला कराची स्टोअर्सच्या जवळ एक हॉटेल होतं. (नाव आठवत नाही.) पण तिथे कबाब, कसले कसले टिक्के आणि खिम्याचे पराठे मिळायचे.
सुरुची!! नाव आठवून दिल्याबद्दल थँक्यु!
त्यांच्याकडे ऑर्डर देऊन पुडाच्या वड्या मिळतात. त्या पंडीत आणि इतरांपेक्षा खूSSप चांगल्या असतात. त्याच दुकानात आवळा सुपारी, बोरकूट, मेतकूट, कुटाच्या मिरच्या असं सगळं पण मिळतं. फक्त दुकानासमोर पार्किंगच्या जागेची मारामार असते. तेव्हा ऑटोरिक्षानी जावं.
नाहीतर अगदी संगम टॉकीजच्या पार्किंग लॉटात किंवा महाजन मार्केट्मध्ये गाडी पार्क करावी लागते.
Pages