Submitted by विनोद इखणकर - श... on 31 October, 2022 - 12:09
शीर्षक:- खरच सांगतो
तंत्रज्ञानच्या युगात
तिचा अन माझा
संवाद होत नाही
खरच सांगतो हल्ली भांडण होत नाही
कधी व्हॉट्सअप,कधी फेसबुक
तर कधी व्हिडीओ
कॉलवरच होतं बघणं
खरच सांगतो हल्ली भेटणं होत नाही
ती तिच्या मोबाईल मध्ये
मी माझ्या मोबाईल मध्ये
मुलांचं आता धडपडणं होत नाही
खरच सांगतो हल्ली खेळणं होत नाही
पाहुणे येतात,पाहुणे जातात
पण आमचे मोबाईल बंद करून
आदरातिथ्य होत नाही
खरच सांगतो हल्ली संस्कार होत नाही
दंगा नाही,मस्ती नाही
आमचं जीवन सारं व्यस्त
थोडंस हसू सुद्धा होत नाही
खरच सांगतो हल्ली हसणं होत नाही
दया मोबाईल फेकूनी
हसा,बसा,खेळा,नाचा
आनंदाचे गाणे गाऊनी
या सारे एकत्र होऊनी
हा बदल गरजेचा होत आहे
खरच सांगतो हल्ली परिवर्तन गरजेचे होत आहे
✍️ विनोद नंदू इखणकर
(शब्दप्रेम) नाशिक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा