सणाची सावली

Submitted by मुग्धमानसी on 30 October, 2022 - 12:42

सणाची सावली ओल्या मनावर मुग्ध पायांनी,
अशी रांगून जाते भाबड्या ओढाळ धावांनी....
जसे ऐसेच कोणी खरवडावे बाळ जखमेला
नी व्हावे प्रौढ अन गंभीर त्या जरतार घावांनी!

Group content visibility: 
Use group defaults

रिलेटेबल आहे, 'खास' दिवसांपेक्षा रोजचे दिवसच बरे वाटतात. आवडली.