दक्षिण व उत्तर कोरीआ संस्कृती, अन्न, पॉप कल्चर फॅन क्लब

Submitted by अश्विनीमामी on 29 October, 2022 - 22:46

मेजाक ग्वा पाककृती धाग्याव र थोडी अवांतर चर्चा कोरीअन संस्कृती संगीत मालिका ह्यांवर झाली. तिथे अवांतर नको म्हणून वेगळा धागा काढला आहे. सर्व फॅन्न्स ना आग्रहाचे आमंत्रण. भाषा, अन्न, संस्कृती, संगीत चित्रकला पर्यटन स्थळे ह्यावर जरुर लिहा. मालिकांच्या फॅन्सचे पण स्वागत. प्रतिसादात लिहिते.
कॉलिन्ग धनुडी, आंबट गोड

कोरीआत मुलांना २८ ते तीस परेन्त आर्मी मध्ये काम करणे बंधन कारक आहे. हा नियम मुलींना नाही.
अजून काय काय अपडेट लिहीत जाईन.

हलो म्हणजे आन्योन से : फोनेटिकली अनिअन ऑन सेल हे एका विशि ष्ट पद्धतीने हेल काढून म्हणायचे.
धनुडीला जास्त माहि ती आहे. आरासु आरास्सु म्हणजे नक्की काय गं.

मेजर फूड्सः किमची, किंबाप, बिबिंबाप.

पार्क किम ही रेग्युलर आडनावे आहेत. व एखादे वेस्टर्न नाव पण घेतात. संस्कृतीत खूपच सिमिलर स्थाने आहेत. वयस्कर व अधिकाराने मोठ्या व्यक्तींना फार झुकुन झुकुन नमस्कार करुन आदर दाखवणे. हायरार्कीचा आदर. मोठ्या व्यक्तींना विरोध न करणे आजी आजोबांचा आदर. त्यांच्या कडे लक्ष देणे. आई बाबांबरोबर खाली मांडी घालुन बसून बोल मधून काहीतरी खाणे. रात्रीचे जेवण एकत्र.

मेजर सीरीअल्सः होम टाउन चाचाचा, एक्स्ट. अ‍ॅट रनी वू.
सिनेमे: भरपूरच आहेत. पॅरासाइट माझा लै फेवरिट. इथे रोज जीवनात असे अनुभव येतात.
प्रगत तंत्रज्ञानाचा मजबूत वापर
गुड रिस्पॉन्स टु कोविड इमर्जन्सी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा, अमा. प्रतिसाद अजून वाचते आहे.
किंबाप प्रकार सुशीसारखा वाटला. जरा (खूप) प्रॅक्टीस लागेल. बघू कसा जमतोय. सोपे पदार्थ शोधते.

जरा (खूप) प्रॅक्टीस लागेल. बघू कसा जमतोय>> बनवु नका ऑर्डर करा व एंजॉय करा. स्विगी झॉमॅटो झिंदाबाद. आम्ही पवईतून मागवतो कधी कधी.

आज बीटी एस चा ग्रामी २०२२ मधील नृत्य पर्फॉर्मन्स पाहिला. फार स्मूथ नाचली आहेत मुले. माझे इन्स्टा अकाउंट ब्लॉक झाले. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक सर्व्हे आला होता त्याला उत्तरे दिली होती. ती पट ली नसावीत. मग मी अ‍ॅपच हाकलले फोन वरून . माझे चिल्लर अकाउंट कम्युनि टी गाइडलाइन्स फॉलो करत नाही म्हणे. कुत्रे मांजरे कावळे फुले मुले ह्यात काय ऑब्जेक्षनेबल असावे. सो लाइक दॅट.

रॉयटर्सच्या अनुसार, कोणताही एक कार्यक्रम नियोजित नव्हता . पण गजबजलेल्या बार आणि नाइटक्लबमधील गर्दी एका अरुंद, उतार असलेल्या गल्लीत सबवे स्टेशनला मुख्य रस्त्याला जोडत होती.

रात्री 10 नंतर काही वेळाने रस्ता क्षमतेपेक्षा जास्त भरला. रॉयटर्सने संकलित केलेल्या रात्रीच्या सोशल मीडिया अकाउंट्समध्ये असे म्हटले आहे की गल्लीच्या वरच्या भागाजवळील लोक त्यांचे पाय गमावले आणि खाली गर्दीत पडले आणि एक जीवघेणा क्रश सुरू झाला.

या शोकांतिकेने दक्षिण कोरियामध्ये राष्ट्रीय शोक व्यक्त केला आणि ते रोखण्यासाठी आणखी काही केले जाऊ शकले असते का असे प्रश्न विचारले गेले.

गर्दीच्या गतिशीलतेचा अभ्यास करणाऱ्या बर्लिनमधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधील संशोधन शास्त्रज्ञ मेधी मौसेद यांनी इनसाइडरशी गर्दी केव्हा प्राणघातक होते याबद्दल बोलले.

सेवुल मध्ये ही मंडळी night life enjoy करायला आली होती.
जिथे ही दुर्घटना घडली तो भाग night life साठी प्रसिद्ध आहे.
Night life म्हणजे.
सेक्स आणि नशा ह्याचा बाजार.
त्या लोकांना धोक्याची जाणीव पण होती.

'स्टॅटिस्टिकस कोरिया' ही दक्षिण कोरियातील (बहुतेक शासकीय) संस्था UNFPA च्या सहकार्याने 'लोकसंख्या शास्त्र' ह्या विषयावर दरवर्षी सहसा जुलै व ऑगस्ट महिन्यांत तीन आठवड्यांची कार्यशाळा आयोजित करते. त्यात जगभरातील PhD स्कॉलरसह आमच्या मुंबईतील इंस्टीट्युटमधलीही अनेक मंडळी जात असे. एकदा आमची एक सिनियर जी जरा सावळ्या वर्णाची, कुरळे केस व दोन्ही भुवया जुळलेली (बाजीगर मधल्या काजोलसारखी) असलेली (माफ करा, इथे मला रंग व वर्ण भेद करायचा नाही, किंबहुना मला तशी टिपणीही केलेली आवडत नाही. पण प्रसंगाची गरज म्हणून वर्णन करत आहे) होती, ती जेव्हा केव्हा सेऊल व इतर शहरांमध्ये फिरायला निघत असे तेव्हा तेव्हा कोरियन लोक तिला जवळ बोलवून आंजारून गोंजारून फोटो काढत असत (जसे विदेशी लोक दिसले की त्यांच्यासोबत फोटो काढायला आपल्याकडचे अनेक लोक धावतात), शेवटी तिने वैतागून बाहेर निघणेच बंद केले होते.

एके वर्षी मीही अप्लाय केले होते, पण आधी गेलेल्या अनेकांकडून तिथल्या जेवणाबद्दलच्या विविध आख्यायिका ऐकून न जाणेच पसंद केले. अगदी फळे, रेडी टू कूक, व खिचडी ह्यासारखे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी तीन आठवडे केवळ ह्यावर काढून स्वतःचे हाल करायचे नव्हते. मात्र काहीस माझ्यासारखेच मत असलेला माझा एक मित्र खूप उत्साहात गेला होता, आणि शेवटी वैतागून आला. कधी भारतात परत जातोय म्हणून दिवसांची उलटगणना करत असे.

सोल मधे बरीच भारतीय रेस्टोरेंट आहेत‍ पण थोडी महाग पडतात‍. >>> असतीलही. विद्यार्थीदशेत, विशेषतः PhD करतांना बाहेरदेशी जायचे म्हणजे एक तर इन्स्टिटयूटमधून किंवा बाहेरून फंडींग मिळाली तरच परवडण्यासारखे असते. त्यात भारतात IIM/IIT चा अपवाद वगळता इतर इन्स्टिटयूट मध्ये PhD करतांना मोजकीच फेलोशिप भेटत असते, ज्यामुळे आपण आपल्या पालकांवर अवलंबून नाही हेच एक समाधान देत असते.

खरे तर अगदी साध्या कोपर्‍याव रच्या दुकानातून रामेन वगैरे मिळ ते स्वस्तात. स्ट्रीट फूड पण चॉइस आहे पण वेगले वास, फिश ऑइल ह्याने त्रास होत असेल.

खरे तर अगदी साध्या कोपर्‍याव रच्या दुकानातून रामेन वगैरे मिळ ते स्वस्तात. स्ट्रीट फूड पण चॉइस आहे पण वेगले वास, फिश ऑइल ह्याने त्रास होत असेल. >>> अगदी, अगदी. आदल्या वर्षी एका कॉन्फरेन्स साठी बाली, इंडोनेशियाला एकटाच गेलो असतांना असाच अनुभव आला होता. सुदैवाने जवळच भारतीय रेस्टॅारेंट होते, पण तेथेही विचित्र वास (कदाचित फिश ऑइल) येत असे. एकटाच असल्याने रडकुंडीस आलो होतो, वेगळेच नैराश्य आले होते (भारतातून मोजकीच मंडळी आली होती). जेव्हा विमानाने बालीहून मुंबईसाठी (व्हाया सिंगापूर) झेप घेतली, तेव्हा जरा माणसांत आल्यासारखे वाटले. त्यामुळेच कोरियाला गेलो नाही. खरं सांगायचं तर माझ्यात तेवढी ऍड़ोप्टीबिलिटी नाही, म्हणून मी जोखीम घ्यायला टाळतो.

मी खाल्लेले कोरियन पदार्थ म्हणजे..
कोरियन चिकन विंग्स (Bonchon चिकन फेमस आहे).

कोरियन डेझर्ट मध्ये एक बिंग सू प्रकार आहे. तो खाल्ला आहे बरयाचदा. shaved ice वर फळे, कंडेन्सड मिल्क, सिरप्स वगैरे वेगवेगळी टॉपिंग्स टाकून बनवले जाते. माझ्याकडे फोटोही आहे. शोधून टाकीन इथे.
तसेच तैयाकी नावाने ओळखले जाणारे फिशच्या आकाराची पेस्ट्री असते. त्यात रेड बीन्स किंवा अन्य फीलिन्ग भरून. तेही मस्त लागते. त्याचे कोरियन नाव आठवत नाही.
टेकबोकी हा कोरियातील स्ट्रीट फूड. kdrama त कदाचित बघितला असेल. त्यात छोटे छोटे राईस केक्स असतात व एक मस्त सॉस करण्याचे पॅकेट मिळते. सॉस गरम करून त्यात राईस केक मिक्स करायचे. गरम फार मस्त लागते.

मी बरयाचदा के मार्टच्या दुकानात चक्कर मारून काय काय नवीन आहे ते बघत असते. तऱ्हेतऱ्हेचे फीलिन्ग भरलेल्या पेस्ट्री मस्त मिळतात तिथे. squid गेम मधल्या त्या geometric कूकीज पण असतात.

squid गेम मधल्या त्या geometric कूकीज पण असतात.>> त्या मस्तच लागत असतील. मी बनवायचे ट्युटोरिअल बघितले. आहे.

कोरियन बार्बेक्यू आणि हॉटस्पॉट ही लोकप्रिय आहे. अर्थात हे अमेरिकेतच खाल्ले असल्यामुळे कदाचित थोडे टेस्टला अमेरिकन मॉडिफाइड असतील. प्रत्यक्ष कोरियात कसे असेल माहित नाही.
हॉटपॉट मध्ये तुम्ही ब्रॉथ निवडायचा आणि त्यात घालायचे मीट किंवा व्हेजिझ सिलेक्ट करायचे. तुमच्या टेबलवरच ब्रॉथ मध्ये घालून शिजवायचे.
बार्बेक्यू हे टेबलवरच ((बार्बेक्यू नेशन सारखेच) त्यातही सर्व प्रकारचे मीट व भाज्या घालता येतात. सरकत्या बेल्टवरून हे पास होत असते. आपल्याला हवे ते निवडायचे. मॅरिनेटेड चिकन, श्रिम्प तसेच तऱ्हेतऱ्हेचे मशरूम, कॅबेज, सॅलड वगैरेही असतात. एक pickled radish पण मिळते. तेही मस्त लागते.
रेस्टॉरंट बऱ्यापैकी महाग असते. पण थोडा वेगळा अनुभव म्हणून जायला हवे.

अजूनही माझे एक पर्सनल मत आहे की जगात सगळ्यात फॅशनेबल व ट्रेंडी कपडे घालणारे लोक म्हणजे कोरियन पोरे पोरी.
वेल ग्रूम्ड, सुंदर स्किन(पुरुष, स्त्रिया दोघांच्याही ), लेटेस्ट ब्रँडेड बॅग्स, इलेक्ट्रॉनिक्स व टिपटॉप कपडे घालून जाणारे हे खूप छान दिसतात. बाकी जगात कोणीच इतके छान रहात नाही.कदाचित ते सोशल प्रेशरही असेल

My idea is to create airport looks of bangtan boys. My ambition is to dress up like RM darling.

कोरियन मसाज पण मस्त असते Wink>> च्रप्स अरे इथे फॅमिली फ्रेंडलीच बोलायचे हं भावजी. विनंती नम्र.

तो महा बिल्ड ब्रँड सर्च केला तर मला महा. सरकारच्या संस्थांचीच यादी आली. हा कदाचित सिंगाप्पोर मध्येच मिळत असेल . तेव्ढ्यासाठी सोल ला कोण जाईल.

शुभ भुभु प्रभात.

मजला रन बीटी एस चॅनेल सापडले आहे व बरोबरीने के बी एस वर्ल्ड पण त्यामुळे बराच कोरीअन कंटेंट दिसत आहे. सध्या डायनामाइट गाण्याचे प्राक्टिस व्हिडीओ बघत आहे. त्यांच्या १/१०० नाचता आले तरी बेस्ट.

के बी एस वर्ल्ड वर एक तिळ्या मुलांची व बाबांची स्टोरी चालू असते. सर्व बेदम खातात मुले सांड लवंड करत असतात. मोमो, व सूप इतर जेवण. एक मुले घरी मोमो बनवतात तो हि व्हिडीओ आहे.

आन्यॉंगहासेयो - हॅलो या अर्थाने
कामसामिदा - थॅंक्यू
आरास्सो - कळलं या अर्थाने वापरतात.
इस्सॉयो / ऑपसॉयो - आहे/नाहीये या अर्थाने
ऑप्पा /ऑम्मा - बाबा/आई

किमची, किंबाप, दोलसोत बिबिंबाप, एक पॉरिज रेस्टॉ. होतं तिथे नशिबाने व्हेज. पॉरिज मिळायचं. जबरदस्त असायचं.

बाकी कोरिया फिरायला पण फार छान आहे. आय मिस दोज डेज.

उद्या बीटीएस गृपची १० वर्शाची अ‍ॅनिवर्सरी आहे. मुंबई बीटीएस गृप तर्फे मोठा कार्यक्रम पर्फॉरमन्सेस गेम्स वगैरे आहे. हे दहिसर इथे आहे. त्यामुळे जाणे शक्य नाही मला पण पर्पल हार्ट. पर्पल रुमाल घालुन ह्पीसला जाईन.

सुगा हा जो आहे तो एक कार्यक्रम चालवतो युट्युब वर सुचविटा म्हणून. काल त्यात जिन चा आधीच रेकॉर्ड केलेला कार्यक्रम दाखवला. त्यात सर्प्राइज म्हणून होप - होबी पण आला होता. तिघे मित्र एकत्र बसून खात पीत आहेत असा सीन होता. मी इंग्रजी सब टायटल्स लावुन बघितला.
जिन सुद्धा( वर्ल्ड वाइड हँड्सम) किती नाजूक आहे खरेतर. अगदी चिट्टिया कलाइयां वाले पोर आहे. त्याने घरी बनव्ले ली दारु आणली होती.
अन्न पाणी सर्व्ह करताना अगदी आपण करतो तसेच उजव्या हाताला कोपरापाशी डावा हात लावुन सर्व्ह करत होता. सो क्युट.

घरगुती पद्धतीने खाली बसून मजेत गप्पा चालल्या होत्या.

बीटीएस चे टेक टू म्हणून नवे गाणे आले आहे. नामजून ची आर्मीचा पब्लिक रिलेशन्स अँबेसेडर म्हणून नेमणूक झालेली आहे.

मागच्या महिन्यात मी फॉलोअप साठी क्लिनिक मध्ये गेले होते. तेव्हा सरांनी एकदम एक इंजेक्षन घ्यायला सांगितले. आत्ता घेउनच जा म्हणून. तर रूम मध्ये नर्स ची वाट बघत होते. समोरच्या रो मध्ये एकदम बीटीएस चे एक गाणे वाजले. ते ऐकून मला एकदम हुरूप आला. कोणाची तरी कॉलर टून असावी. विचारेपरेन्त लगेच बंद झाली. जय बीटीएस जय आर्मी.

Pages