दक्षिण व उत्तर कोरीआ संस्कृती, अन्न, पॉप कल्चर फॅन क्लब

Submitted by अश्विनीमामी on 29 October, 2022 - 22:46

मेजाक ग्वा पाककृती धाग्याव र थोडी अवांतर चर्चा कोरीअन संस्कृती संगीत मालिका ह्यांवर झाली. तिथे अवांतर नको म्हणून वेगळा धागा काढला आहे. सर्व फॅन्न्स ना आग्रहाचे आमंत्रण. भाषा, अन्न, संस्कृती, संगीत चित्रकला पर्यटन स्थळे ह्यावर जरुर लिहा. मालिकांच्या फॅन्सचे पण स्वागत. प्रतिसादात लिहिते.
कॉलिन्ग धनुडी, आंबट गोड

कोरीआत मुलांना २८ ते तीस परेन्त आर्मी मध्ये काम करणे बंधन कारक आहे. हा नियम मुलींना नाही.
अजून काय काय अपडेट लिहीत जाईन.

हलो म्हणजे आन्योन से : फोनेटिकली अनिअन ऑन सेल हे एका विशि ष्ट पद्धतीने हेल काढून म्हणायचे.
धनुडीला जास्त माहि ती आहे. आरासु आरास्सु म्हणजे नक्की काय गं.

मेजर फूड्सः किमची, किंबाप, बिबिंबाप.

पार्क किम ही रेग्युलर आडनावे आहेत. व एखादे वेस्टर्न नाव पण घेतात. संस्कृतीत खूपच सिमिलर स्थाने आहेत. वयस्कर व अधिकाराने मोठ्या व्यक्तींना फार झुकुन झुकुन नमस्कार करुन आदर दाखवणे. हायरार्कीचा आदर. मोठ्या व्यक्तींना विरोध न करणे आजी आजोबांचा आदर. त्यांच्या कडे लक्ष देणे. आई बाबांबरोबर खाली मांडी घालुन बसून बोल मधून काहीतरी खाणे. रात्रीचे जेवण एकत्र.

मेजर सीरीअल्सः होम टाउन चाचाचा, एक्स्ट. अ‍ॅट रनी वू.
सिनेमे: भरपूरच आहेत. पॅरासाइट माझा लै फेवरिट. इथे रोज जीवनात असे अनुभव येतात.
प्रगत तंत्रज्ञानाचा मजबूत वापर
गुड रिस्पॉन्स टु कोविड इमर्जन्सी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गमसाहम्मीदाssssss बोले तो थॅंक्यू थॅंक्यू. ( ख किंवा ह ,का सुद्धा येतो कधी कधी उच्चारात)
खुमायो हे पण थॅंक्यू. थॅंक्यू धागा काढल्या बद्दल अमा
आरास्सु आरास्सु हे ओके, ठिक आहे किंवा असं का ? हे आपल्या चं सेम हेलात म्हणतात ते. आणि आपण जस़ अईगं म्हणतो तसं आईगो आईगो असंही म्हणतात.
त्यांच्यात लॉकअप मध्ये जाऊन आल्यावर तोफू खायला देतात. शास्त्र असतं ते त्यांच्यात Proud
सिरीयल्स तर आता मी मोजणं सोडून दिलं पण बघते कोरियनच.

आज मेजर अ‍ॅक्सीडेंट झाला सेउल मध्ये. १५० च्या आसपास लोक गेले >> प्रेयर्स. हॅलोविन इवेंट साठी तरुण तरुणी जमले होते बिचारे. श्रद्धांजली.

आज मेजर अ‍ॅक्सीडेंट झाला सेउल मध्ये. १५० च्या आसपास लोक गेले >> प्रेयर्स. हॅलोविन इवेंट साठी तरुण तरुणी जमले होते बिचारे. श्रद्धांजली.+ १

Screenshot_2022-10-30-10-17-27-551_com.whatsapp.jpg

हो मगाशी कळलं. कोणीतरी सेलिब्रिटी आल्याच्या बातमीमुळे गोंधळ उडाला असं म्हटलंय.

वेडी लोक फक्त आपल्याकडे च नाहीत तर आपल्या पेक्षा महा वेडी लोक जगात आहेत.
अशा जगातील बातम्या वाचल्या की वाटत .
भारतीय खरेच सू संस्कृत आणि शिस्त प्रिय आहेत.

शीर्षकात 'दक्षिण' लिहिल्यामुळे आमच्या 'किम् तव नाम'चा विषयच नाही निघू शकत. झेपावे (आणि झोपावे) उत्तरेकडे.

धन्यवाद मानव. मुळातली कोटी माझी नाही हे प्रांजळपणे कबूल करतो. ह्या किम ची थीम एका संस्कृत मीम मध्ये पाहिली होती. Happy

Hemant 33 request kindly do not insult an entire culture and people. This thread is to know more. Young people have died. Please show some respect and sensitivity towards the departed.

अमा , थँक्यू. आठवण ठेवल्या बद्दल. Happy
लिहीन मी.
कोरीयन भाषेत आणि आपल्या तमिळ मधे आश्चर्य कारक साम्य आहे. अम्मा- अप्पा म्हणतात आई वडिलांना !
आणखीही काही कॉमन शब्द असतील तर पहायला पाहिजे...

Hemant 33 request kindly do not insult an entire culture and people. This thread is to know more. Young people have died. Please show some respect and sensitivity towards the departed.

बातमी वाचून नैसर्गिक माझी तीच प्रतिक्रिया आली ती मी शब्दात उतरवली.

इथे पण बेशिस्त गाडी चालवण्याचा ज ज्याला मोठी हौस असते आणि असा व्यक्ती अपघात मध्ये गेला तरी माझी अशीच प्रतिक्रिया असते.
उगाचच गर्दी करून संकटाला निमंत्रण देणाऱ्या लोकांबद्दल माझे वरील च मत आहे

अमा+१...

अमा जरा ते दक्षीणच दक्षिण करा की...

कोरीयन भाषेत आणि आपल्या तमिळ मधे आश्चर्य कारक साम्य आहे >> +७८६. मला तर ते लोक कोरियन बोलताना तमिळ बोलत आहेत असा भास होतो. त्यांचे काही हेल आणि शब्द म्हणायची पद्धत अगदी सेम!

अमा जरा ते दक्षीणच दक्षिण करा की...>> केलं हर्पाओपा तुझ्यासाठी उत्तर कोरीआचा पण समावेश केला आहे.

मी पाहिलेली पहिली कोरीअन मालिका स्क्विड गेम. आता त्यातील एक कॅरेक्टर माझा नेटफ्लिक्स अवतार आहे. जो शेवटाला मरतो तो.
त्यातील हिरो व त्याचा मित्र त्यांच्या आया ह्यांच्यातील नाते बघून मला तर एकदमच रिलेट झाले. हिरो व मित्र शेवटाला जगतो का मरतो फायनल फाइट मध्ये असतात व मित्र मरणारच तो ही हिरोच्या मांडीवर जीव टाकतो. अश्या भावनात्मक प्रसंगी मित्राला काय आठवते तर" लहान पणी आपण खेळत असू व आपापल्या आया आपल्याला जेवायला हाक मारत..... आता ते शक्य होणार नाही. व जीव जातो. " हा सीन बघून मी अर्धातास तरी रड ले होते. आत्ता लिहिताना पण पदर डोळ्याला. मेहनती आई तिचा हुषार मुलगा आता जीवनात कमी खडतर दिवस येतील
अश्या परिस्थितीत तो कर्जबाजारी होतो व गेम मध्ये मरुनच जातो. शेवटाला हिरो तिच्याक डे दुसर्‍या एका स्पर्धक मुलीचा बारका भाउ जो आता अनाथ झाला आहे व एक मोठी बॅग घेउन येतो. तर माउली - जी फिश व पदार्थांचे दुकान चालवत असते - ती बॅगेत काय आहे बघत पण नाही.
त्या मुलग्याला तुला फिश केक देउ का विचारते. मुले कायम भुकेलेली असतात हा पण एक मदरली इंस्टिंक्ट फारच फिट झाला डोक्यात.

पुढे थोड्या लाइट रोमँटिक सिरीअल्स पण पाहिल्या तसे काही मला वर्ज्य नाही. होम टाउन चाचाचा मधला एकदम सर्व गुण संपन्न हिरो
अ‍ॅटर्नी वू मधील मुलगी व तिचा सिंगल पेरेंट बाप, बिझनेस प्रपोजल मधील आजोबा. हे सर्व अगदी आपल्यातलेच वाटतात.

आधी काही सिनेमे पन पाहिलेले. शोधुन लिहिते.

खत्तरनाक आहे तो व्हिडिओ स्वप्नील. एवढी साम्यस्थळं बघून मी वेडा झालो. शिवाय भेदा म्हणजे कापणे म्हणाली ती. आवरा!!

कोरीअन केस, त्वचा व स्किन केअर हे एक मेजर पॉइन्ट आहे. त्यांची प्रसाधने व स्किन केअर उत्पादने नायका वर उपलब्ध आहेत. इतके स्वच्छ धुतलेले व नीट काप लेले भरदार केस बारीकच कट समोर बँग्ज, अगदीच गोड दिसते. पोरींचे केस पातळ पण मौ मौ वाटतात. व कोणताही हेअर कलर त्यांना कसा काय सूट होतो?! आर एम वगैरे अगदी प्लॅटिनम कलर पण छान कॅरी करतात. पोरे पोरी - मुले मुली - सर्वच कानातली घालतात. मजेशीर हेअर अ‍ॅक्सेसरीज घालतात. व ते त्यांनाच सूट होतात.

किम्स कन्विनियन्स नेटफ्लिक्स सीरीज बघितली नसेल तर बघा नक्की. कॅनडातल्या कोरियन इमिग्रन्ट फॅमिलीच्या टिपिकल एवरी डे स्ट्रगल्स वरची मस्त लाइट कॉमेडी.
आपल्याकडे कसे नात्यात नसले तरी कोणाही मोठ्या लोकांना आदराने काका काकू वगैरे म्हणायची पद्धत आहे तसे त्यांच्याकडे पण अजुशी, अजुमा असे (किंवा असे काहीतरी) म्हणतात.

मैत्रेयी+१

हेच लिहायला आले होते. किम्स कन्विनियन्स छान सिरीज आहे. Netflix वर फॅमिलीला पाहता येतील अश्या ज्या मोजक्या सिरीज आहेत त्या मध्ये किम्स कन्विनियन्स मोडते

काल दक्षिण कोरियात हालोविन सणानिमित्त जमलेल्या जमावात चेंगराचेंगरी होउन कित्येकजण मृत्युमुखी पडले. माझी मुलगी कालच त्या कार्यक्रमास जाणारच होती की जेट लॅगमुळे झोप येउन ती गेली नाही. थोडक्यात बचावलो. अर्थात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल सहानुभूती, सहवेदना आहे.

मी एकच पाहिलीये series
आवडली होती तेव्हा
Boys over flowers
किती दा repeat पाहिली नंतर!!
आता बालिश वाटते

हर्पाओपा तुझ्यासाठी उत्तर कोरीआचा पण समावेश केला आहे >> ओह्ह! मी बदललेलं शीर्षक आत्ता नीट पाहिलं. गोमावो Happy

डी एम झीचा पण समावेश केला पाहिजे खरे तर. त्या शिवाय कोरीआची पार्श्वभुमी समजणार नाही. सद्या इथे पर्यटन टूर्स जातात. मध्ये सोल ट्रीपचा प्लान केला होता तेव्हा सर्च केले होते.

डाय अनदर डे जेम्स बाँड पटात सुरुवातीचा भाग डीएम झी मध्येच चित्रित आहे. व्हिलन उत्तर कोरीअन आहे. व त्याने जी मजेशीर युद्धवाहने व शस्त्रे बनवली आहेत ती आहेत हॉवर्क्राफ्ट. अमेरिकेने तिथे ल लँड माइन पुरले असल्याने सर्व भाग धोका दायक आहे. पण जे बाँ तिथे मारामारीकरुन तुरुं गात जातो. तिथे त्यावर विंचू सोडून कोरीअन बाई छळ करते. भारी मनोरंजक सिक्वेन्स. व्हिलन एकाला बिचार्‍याला पोत्यात घालुन कुटतो कारण त्याला अँगर इशूज आहेत म्हणे. अ नि अ पिक्चर आहे.

अजून एक मालिका जुनी म्हणजे मॅश. अ‍ॅलन आल्डा व त्याचा मित्र अप्रतिम मालिका अमेरिकन आहे. पण युद्धावर आधारित आहे.

मिनारी सिनेमा पण छान आहे. तेच ते इमिग्रंट अ‍ॅडजस्ट्में ट इशूज. ह्यातही एक गोड पोरगा आहे झिपर्‍या.

पूह इन कोरिया , प्रेम किम फॉरेव्हर , कोरियन दोस्त, माय लव्ह फ्रॉम कोरिया हे काही युट्युब चॅनेल आहेत।

पूनम हि राजस्थानी जी इटलीला पैदा झाली आणि फार्मा शिकून आता दक्षिण कोरियात मॉडेलिंग व नोकरी करते व फावल्या वेळात ब्लॉग्स बनवते मस्त असतात तिचे ब्लॉग्स

प्रेम हा हरियाणवी आहे बहुदा किम कोरियन मुलीबरोबर लग्न करून तिथेच स्थायिक आहे हा सुद्धा ब्लॉग्स बनवतो

कोरियन दोस्त हा पुण्यात शिकून गेला आहे व भारतभर फिरला आहे त्याचे ब्लॉग्स मस्त असतात हिंदी तर इतकी छान बोलतो

माय लव्ह फ्रॉम कोरिया नेहा ने कोरियन मुलाशी लग्न केले आहे आधी इंडियात मग यावर्षी फेब मध्ये कोरियन पद्धतीने हिला हल्लीच कोरियात नोकरी लागली आहे व प्रेम च्या चॅनेल शी कोलॅब्रेशन करून व्हिडीओ बनविले आहेत तो तिला बहीण मानतो।

हे सर्व कोरियात छान छान ब्लॉग्स बनवितात ते तुम्हालाही बघायला नक्की आवडतील .

Pages