दिवाळी अंक 2022

Submitted by अल्पना on 20 October, 2022 - 02:53

यावर्षीचे दिवाळी अंक प्रकाशित व्हायला सुरवात झाली आहे. कोणते अंक घेतले, घ्यायचे आहेत आणि वाचले याबद्दल चर्चा करायला हा धागा.
नेहेमीप्रमाणे यावर्षी सुद्धा बऱ्याच मायबोलीकरांचे साहित्य दिवाळी अंकांमध्ये असेल / आहे. त्याची सुद्धा इथे माहिती द्यावी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पुढचं पाऊल (दहावे वर्ष)
पाने शंभर,शंभर रु.
भटकंती विषयक.

रामटेक ते अलकानगरी प्रवास अर्थात मेघदूतच्या वाटेवर सायकलने विशेष.
_____________
ऋतुरंग
वर्ष ३०वे
पाने २८७
जाहिराती ३०
व्यक्तीरेखा विशेषांक आहे. ठीक आहे.
वरती @भरत यांनी अनुक्रमणिकेचा फोटो टाकला आहे. अश्व माझे सोबती - रसिका रेड्डी हा लेख विशेष आहे.
((नाशिकमध्ये सुला वाइनजवळ एक अश्वशाळा आहे. तिथे जाऊ शकतात इच्छुक. यूट्यूबवर काही विडिओ आहेत. तिथे राजस्थानी घोडे आहेत.))
__________________
साप्ताहिक सकाळ
पाने आर्ट पेपरची दोनशे(जाहिराती चाळीस)
रघुवंशातील निसर्गदृष्टी, डच नजरेतून मेघदूत ,हिमाचल वाटा (मुळीक यांची चित्रकला) हे तीन विशेष लेख आवडले.
विज्ञानकथा 'पहले कभी देखा है' नेहमीप्रमाणे गंडलेली वाटते.'देजा वू' शब्द तीस वेळा तरी येतो.

लोकमत दीपोत्सव
पाने २२४ , किंमत २९९
वाचलेल्या अंकात सर्वात वाचनीय अंक ! कथा , कादंबरी , कविता नाहीतच , सगळे लेख सुंदर . समाजातील वेगवेगळ्या घटकांचे व्यक्तिचित्रण मस्त रंगवले आहे . कोल्हापूर मधील तालीम आणि पैलवानाचे जग , ट्रक ड्रायव्हर च्या अडचणी , आशा सेविका , जिगोलो अशा अनेक माहीत नसलेल्या जगाची माहिती आपल्याला होते . तसेच सध्याची generation z यावरचा लेख ही आवडला . चिन्मय दामले यांचा खाद्यसंस्कृती वरचा लेख ही मस्त आहे . चिन्मय दामले म्हणजेच मायबोलीकर चिनुक्स ना ?
जामताडा वरचा लेख वेबसिरिज ची आठवण करून देतो . मिळाला तर जरूर वाचा .

लोकमत अंकाबद्दल @अश्विनी११ सहमत.
मिळाला लोकमत.
तिनशे रु
२०० पाने
वाचनीय.
विजय दर्डा -संपादकीय आणि त्यांचे चित्र प्रदर्शन - छान.
माहितीपर लेख
शोभा डे माझा प्रवास आणि भारतीय नवे श्रीमंत बदल -खास नाही. यापेक्षा यावर आधारित त्यांच्या कादंबऱ्या मजेदार असतात.
आशाबाई - गावात वैद्यकीय सेवा देणाऱ्या सेविकांचे काम आणि अडचणी. चांगला लेख.
भारतीय खाद्यपदार्थ प्रसार आणि बदल -चिन्मय दामले. नेहमीप्रमाणेच दीर्घ लेख.
रंगीत बरा अंक.
या अंकात चार पानी Relan fabric जाहिरात आहे. रिलायन्सचे नवे कापड fabric 2. या कापडाची माहिती आहे का कुणाला?
_____________

दिवाळी - साहित्य
(मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे निघणारा दिवाळी अंक)
पाने १८५
२०० रुपये
चांगल्या जाड कागदावरची सुरेख छपाई.
संकल्पना - स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य आढावा.
कथा,कादंबरी,विनोदी लेखन,संशोधन,समीक्षा,वाङ्मय प्रकार आणि ग्रंथ प्रकाशन यांचा आढावा घेणारे लेख.
मराठी साहित्य अभ्यासकांसाठी चांगला संग्रहयोग्य संदर्भ ग्रंथ म्हणता येईल.
मुख्य कार्यालय - गिरगाव.

((बरेचसे अंक वाचून झाले. जत्रा,आवाज,मोहिनी वगैरे मी पाहात नाही. इतरही सिनेमा, कलाकार यासाठीचे पाहात नाही.))

__________________

<दिवाळी - साहित्य
(मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे निघणारा दिवाळी अंक)>

हे मुंबई मराठी साहित्य संघ यांचे त्रैमासिक आणि त्याचा दिवाळी अंक आहे, असे दिसते.
https://www.mumbaimarathisahityasangh.com/downloads/

मी मुं म ग्रं सं त विचारलं तर आमचा असा काही अंक नसतो, असे उत्तर मिळाले. मुख्य शाखा गिरगाव यावरून साहित्य संघ असेल असं वाटलं. मुं म ग्रं सं ची मुख्य शाखा दादर इथे आहे.

ठाकूरद्वार येथील भाई जीवनजी लेनमध्ये मुंमची शाखा आहे.इतके दिवस तीच मुख्य शाखा समजत होते.दादरची दासावा(सादर सार्वजनिक वाचनालय) म्हणून प्रसिद्ध होती.

@ भरत, गिरगावातील शाखा -हे मुंबई मराठी साहित्य संघ यांचे त्रैमासिक आणि त्याचा दिवाळी अंक आहे, असे दिसते. होय. तसेच लिहिले आहे.

दादर सार्वजनिक वाचनालय हे छबिलदास शाळेसमोर आहे.

मुं म ग्रं सं ची दादर शाखा पुणे एशियाड बसेस सुटतात त्या आतल्या गल्लीत कोहिनूर मिलसमोर आहे. ती इमारत बहुतेक पाडली आहे.

मोडीदर्पण
संपादक सुभाष लाड
कोकणातील बंदरे विशेषांक
पाने १४०
दोनशे रुपये.
मोडी लिपी बाराखडीसह मराठी लिप्यंतराचे आठ लेख हे मोडी शिकणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत.
बंदरे विशेषांकासाठीचे पंधरा लेख.
पंचवीस कविता ,कोकण पर्यटनाचे पाच लेख,त्यामध्ये कोकणातील सूर्यमंदिरे विशेष. चांगली छपाई आणि कागद.

वाचनालयात दिवाळीपासून जे चांगले वाचनीय अंक हाती लागत नव्हते ते एकेक उगवू लागले.
चौफेर समाचार (वर्ष २२)
प्रकाशन सांगलीतून
पाने २४० आर्ट पेपर,सुंदर छपाई,चित्रे
रु तीनशे.
मुंबईतील पुतळे लेख फोटोंसह फार आवडला. आणखी अनेक चांगले लेख. दणदणीत अंक

धन्यवाद भरत.
मला आवडलेले इथे लिहिले आहेत. विश्वफोरम काय सांगतं ते बघू.

मुं म ग्रं स मधून 'आपले छंद' हा यंदाचा शेवटचा अंक आणला होता. किंमत ३५० रु. अख्खा अंक ग्लॉसी पेपरवर छापला आहे. सुरुवातीला सलग जाहिराती. लेखांत छायाचित्रांची रेलचेल.
मुखपृष्ठावर सर्वधर्मसमभाव वाचन संस्कृती विशेषांक म्हटलंय. यांच्या दिवाळी अंकाला भरपूर पारितोषिके मिळत आली आहेत . पुरुषोत्तम बेर्डे यांचा त्यांच्या मुलाच्या आरोग्यसमस्या व त्याला झालेल्या विचित्र अपघातांबद्दलचा वाचला.
दुसरा शेफाली वैद्य यांचा पुरातन देवालयांसंबंधीचा लेख चाळला. वैद्य यांना Temple Architecture Buff, म्हटलं जातं किंवा कदाचित् त्या स्वतःच तसं म्हणत असतील.
लेखात शेवटी इंटरनेटवर अनेकदा दिसले ल्या दोन गोष्टी दिल्या आहेत. रामेश्वरम , केदारनाथ आणि मधली अनेक मंदिरे एकाच रेखांशाच्या जवळपास आहेत. आणि काही देवळे एकमेकांपासून १११ (की ११११ ते विसरलो) च्या पटीतील अंतरावर आहेत.

- अवांतर - आता मॅजेस्टिकवर दिवाळी अंक २५% डिस्काउंटवर मिळत आहेत. मुंमग्रंस सुद्धा काही दिवसांनी दिवाळी अंक बर्‍याच कमी किंमतीला विकायला काढतात. खाजगी लायब्ररीवाले पिशव्या भरभरून ते घेऊन जातात.

Pages