Submitted by अनन्त्_यात्री on 2 October, 2022 - 08:30
हवीहवीशी प्राणफुंकर
कुठूनशी येते अचानक
फिकटलेली प्राणठिणगी
झगमगे मग बघ अचानक
कातळाशी झुंजताना
झुळझुळे निर्झर अचानक
नश्वराच्या कर्दमातून
उसळते अमृत अचानक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा