घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती,
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती
मराठी मध्ये घराचं वर्णन करणारी किती सुंदर विशेषणे आहेत. नांदतं घर, भरलेलं घर, हसतं खेळतं घर, गोकुळ. ह्या सगळया उपमां, त्या घराच्या एकदर दर्जा किंवा डामडौलापेक्षा त्या घरातील माणसांविषयीच बरच काही बोलून जातात.
टुमदार कौलारू घर, छोटंसं सडा मर्जन केलेलं अंगण, अंगणात तुळशी वृंदावन, दोन-चार गुलाब, मोगरा, गुलबक्षी ची झाडं, पारिजातकाचा सडा, सुंदरशी सोपी रांगोळी, दाराला तोरण, समोरच ओटी वरची बैठक, माजघरातला किरकिरणारा झोपाळा, पडवीतली चूल, जातं, मागच्या विहिरीवरचा गडगडता रहाट, त्या मागच्या केळी, आंबा पोफळीच्या बागेतून येणारा वारा... काय मनानं पोहोचलाय ना सासरी, माहेरी, आजोळी, किंवा एखाद्या लाडक्या मराठी सीरियल मधल्या घरात? पण खर सांगायचं. तर हे मनात जपलेलं घर, किंवा त्याच चित्र प्रत्यक्षात बऱ्याचशा लोकांना व्यावहारिक किंवा प्रापंचिक कारणामुळे अनुभवता येत नाही, अपवाद काही भग्यावंतांचा एखाद महिना तरी वर्षातून गावी जावून राहता येत.
मी शहरातच वाढले असल्यामुळे, मी बघीतलेली आहेत ती शहरातली, बिल्डिंग मधली घर. त्यांचा काडेपेटी सारखी छोटी घरं म्हणून बराच उपमर्द ही होतो. पण त्या घरांनाही एक कॅरॅक्टर असतं.
कारण... ? घर माणसानं मुळे बनतं, माणसं आली की characterization पण आलच की.
आमच्या ओळखीत एक जण होते, त्यांचं घर कधीही जा, पसरलेल. दार उघडल्यावर बरोबर हा मोठा चपलांचा ढीग, त्याच ढिगाऱ्यात आपली चप्पल सरकवयची , पण परत जाताना पटकन मिळेल ह्या हिशेबाने. दाराच्या बाजूला असलेल टीव्हीचं कपाट, त्याच्यावर धुळीला बसायला सुध्दा इंचभरही जागा नाही., सोफे, दिवाण, बेडरूम मधील बेड, डायनिंग टेबल, ओटा सगळीकडे वस्तूच वस्तू. पुस्तकं, कॅसेट्स, कंगवे, purses, bags, सुकलेले दांडी वरून (बाईने) काढलेले कपडे, बाजारातून आणलेल्या भाज्या, वर्तमान पत्रे सगळे आनंदाने कुठेही रमलेले दिसतील. मग आलेल्यानेच सोफ्यावरच मासिक उचलून बाजूला पुस्तकांच्या ढीगार्यावर टाकून स्वतःल बसायला जागा करायची ...आता सांगा घर अस्ताव्यस्त की माणसं बेशिस्त.
तर आमच्या नात्यातल्या एक बाई, त्यांचं घर एकदम आरशासरख लखलखीत. पांढरी शुभ्र संगमरवरी फरशी, पाढरी शुभ्र कपाट, चकचकीत ओटा, कधी स्वयंपाक करतात की नाही असा प्रश्न पडावा. दारा बाहेरच चप्पल काढायची आणि दारातच आतल्याबजुला कपाट होत त्यात हाताने उचलून ठेवायची... चुकून एखादा चप्पल आतमध्ये काढायला लागला तर लगेच काका केरसुणी आणि केरभरणं घेऊन येणार, पाहुण्यांसमोर लगेच केर भरणार, म्हणजे आल्या आल्या पाहुणा खजील आपण उगाच ह्यांच्या घरी येऊन कचरा केला. त्यांच्या कडे बसताना सुद्धा एकदम बिचकायला होई, ना जाणो चुकून डोकं भिंतीला लागलं, तेलाचा डाग पडला, त्यांच्या शुभ्र लादिवर चहाच सांडला..ह्या भीतीने लोकं त्यांच्याकडे च हाच काय पाणी पण घ्यायला घाबरायची.
एकदा हात पुसायला म्हणून मी एक बाजूला तारेवर वाळत घातलेला नॅपकिन घेतला, तर त्या पळतच आल्या " अग अग थांब तो लादी पुसायचा पोछा आहे." मी दचकून बघितलं " अरे हा आपल्या घरी ताट पुसायला पण खपून जाईल..इतका स्वछ!!" मग हे घर आरस्पानी की ही अतिशिस्तीची माणसं?
एकदा एक बाई आम्ही नवीनच घेतलेल्या घरात आल्या, त्यांनी पण बाजूच्याच बिल्डिंग मध्ये नवीन घर घेतलेलं. काही निमित्त काढून आल्या. मी काही कधी कुणाला घर दाखवायच्या भानगडीत पडताच नाही, इन मिन तीन खोल्या, घर सुरू झालं की संपत. आणि म्हणा दाखवण्यासारखे असेल तर माणूस दाखवेल ना? तर असो त्यांनी हिंडून स्वतः च बघितलं. बहुदा त्या हिरमुसला असाव्यात. जाताना मला आग्रहाचं निमंत्रण देऊन गेल्या. त्यांच्या घरी दारातच स्वागताला अगडबंब फिश tank. मग तो कसा बँगलोर मधून मगवलाय, त्याचतले मासे अजून कुठून magvlet, त्याच पाणी कुठून आणतात, वगैरे वगैरे अर्धा तास ते आख्यान झाल्यावर मग बाकीचं घर. त्यांच्या मुलींची डॉल हाऊस कम स्टडी कम बेड रूम, त्यातले तीन चार हजार रुपयांचे स्टिकर्स, त्यांचे लिव्हिंग रुम मधलं सेंटर कम डायनिंग टेबल कम चेअर, त्यांच्या वार्डरोबला लावलेले वेताचे पडदे, त्यांचा सात फुटी लांब मास्टर बेड (कारण नवरा उंच होता).. मला भीती वाटायला लागली की आता वॉर्डरोब उघडून अजून काय काय प्रापंचिक दर्शन घडवतायत.
"पुलंच्या त्या सैतान कम कुलकर्ण्यांच्या अपरधाचा बदला तू म्या पामरीवर का घेत्येस ?" असं दहा वेळेला तरी जिभेवर आलेलं मी गिळून टाकलं.
शेवटी काहीतरी कारण सांगून दीड ते दोन तासांनी घोटभर चहा सुद्धा न घेता (त्यांच्या तावडीतून) सटकले.
आता आताच आमच्या परिवारातील कोणी खूपच पॉश वस्तीत, पॉश घर घेतलं. खुप महाग घर, तेवढच महाग इंटिरिअर. अगदी मासिकात शोभतील इतके सुंदर फोटो होते. घरातून दिसणारा सुंदर सूर्यास्त, त्या सोनेरी प्रभेत बुडलेली अख्खी दुनिया..अगदी अस्मान ठेंगणं वाटावं! कधीतरी जाऊन एक दोन दिवस राहूनच येऊ. घराचं पण कौतुक आणि घरवल्यांच पण कौतुक! पण काही कारणाने माझं जाणं पुढे पुढे ढकलत होत. मग मध्ये त्यांचाच फोन आला. आता त्यात त्या अतीव सुंदर घराविषयी न बोललो तरच आश्चर्य.
"आम्ही घरात जेवत नाही"
मी दचकले, " म्हणजे?"
"अग म्हणजे पाहुणे वगैरे आले की त्यांना बाहेरच घेऊन जातो, किंवा क्लब हाऊस वर नेतो आणि तिकडेच बाहेरून मागवतो. इतकं छान इंटिरिअर केलंय.. मला ते अजिबात खराब नाही करायचंय. मी म्हणून मग डायनिंग टेबल च नाही ठेवलं मुद्दामून"
" तेव्हा ठीक आहे, पण मग रोजचं काय? घरी जेवतच नाही? सोफ्यावर डाग पडू नये म्हणून?"
"रोजचं काय ? उभ्या उभ्याच जेवतो..."
आता माझं डोकं गरगरायला लागलं, येवढे पैसे देऊन घेतलेल्या, एव्हढ्या सुंदर घरात आपणच आरामात राहायचं नाही? अगदी आरामात जाऊदे पण सुखाने शांतपणे आपल्याच कमाईचे दोन घास खाता येऊ नयेत. म्हणजे सुंदर घर आपल्या राहण्यासाठी की त्या सुंदर घराच्या शोकेस मध्ये आपण काचकड्याच्या बाहुल्यांसारखे .. आणि शोभे साठी म्हणावे तर मग माझ्यासारखी ने (स्वतःचे आरशातले रुपडे) बघून ती लक्ष्मण रेषा ओलांडूच नये...
आणि आता जर तुम्हाला उत्सुकता असेल तर आमच घर...
इकडे अमेरिकेला आल्यावर, पहिल्यांदाच माझी बहीण आली. दारातून चप्पल काढता काढता तिचा पहिलाच प्रश्न " अरे हे काय? इकडे पण तुम्ही असेच राहता???"
"अग तिकडे काय आणि इकडे काय, अगदी अंटार्क्टिका वर गेलो तरी घरातली माणसं तिचं आहेत ना? " माझं थंड उत्तर.
आता ह्यावरून मी, माझी बहिण, आमचं घर( खर तर घरातली माणसं) सगळाच अंदाज तुम्ही बांधला असणारे.
"अरे हे काय? इकडे पण तुम्ही
"अरे हे काय? इकडे पण तुम्ही असेच राहता???" >>
तुम्ही अमेरिकेत राहता, हे कळलं. पण असेच राहता, म्हणजे कसे? ते नाही कळलं.
छान.
छान.
तुम्ही अमेरिकेत राहता, हे
तुम्ही अमेरिकेत राहता, हे कळलं. पण असेच राहता, म्हणजे कसे? ते नाही कळलं.<<<<
म्हणजे भारतातल्यासारखेच अघळ पघळ (स्वतः ला असतयास्त म्हणवत नाहीये )
तुम्ही अमेरिकेत राहता, हे कळलं.<<< ते महत्वाचं नाहीये .. सातत्य महत्वाचे
हीरा thank you
हीरा thank you
चर्चा धागा वाटतोय.
चर्चा धागा वाटतोय.
घर घर की कहानी
छान
निलुदा thank you
निलुदा thank you
छान लेख
छान लेख
आमच्या कडे एकाने मस्त बंगला
आमच्या कडे एकाने मस्त बंगला बांधला . एवढा पॉश आणि इतके जबरदस्त इंटेरियर, पण ते कुलूप लावून ठेवतात बंगल्याला आणि आमच्या इमारतीत भाड्याने फ्लॅट घेऊन रहातात. आधी आम्हाला वाटलं खास मुहूर्त वगैरेची वात बघत असतील पण वर्ष संपलं तेव्हा विचारलंच आम्ही.
तर म्हणाले एवढा मस्त आणि महागडा बंगला खराब होऊ नये म्हणून स्वतःही त्यात रहात नाहीत आणि कोणाला दाखवत सुद्धा नाहीत आतून. बाहेरूनच दाखवतात आणि इकडे फ्लॅटवर घेऊन येऊन त्यांना टिव्हीवर आतले सगळे बंगल्यात बसवलेल्या वेब कॅमेराने दाखवतात.
मस्त लेख.
मस्त लेख.
मानव, धन्य आहेत ते बंगलेवाले.
मानव पृथ्वीकर , अविश्वस्निय
मानव पृथ्वीकर , अविश्वस्निय
अन्जू , अश्विनीमावशी thank you
मानव काहिच्या काहीच ...काय
मानव काहिच्या काहीच ...काय धन्य लोक असावेत!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
अति टापटीप असेल घर तर ते घरपण मिसिंग वाटतं मला.
मानव अतिपैसे दिसतात त्यात लोकांकडे.
पहिलाच फोटो खल्लास.. आमचेच
पहिलाच फोटो खल्लास.. आमचेच कोकणातले घर वाटले
लेखही छान आहे. विचार अगदीच ईंच का पिंच.
आमच्याकडेही बायको जाऊन येते बिल्डींगमध्ये कोणाकोणाच्या घरात, तर आल्यावर अर्धा पाऊण तास नुसते त्यांच्या ईंटीरीअरचे कौतुक असते. माझा मात्र कोणाच्या घरात गेले की जीव घुसमटतो. त्यांच्या टापटीपपणाला आपण गालबोट तर लावणार नाही ना याचे उगाचच दडपण येते. परत येऊन आपल्या सोफ्यावरचा पसारा तिथे खालीच ढकलून आडवातिडवा पसरतो तेव्हा जरा छान वाटते.
बाई दवे,
ते लेखातील पॉश घरातील लोकं खरेच उभ्या उभ्या जेवतात का
डायनिंग टेबल आम्हीही घेतलेय. तिथे मी वर्क फ्रॉम होम करतो. बायको ट्युशन घेते. पोरगा त्यावर चढून भिंती रंगवतो. ईतरवेळी घरचा सारा पसारा त्यावर निवांत पसरलेला असतो. जेवायला मात्र जमिनीवर बसल्याशिवाय घरी जेवल्यासारखे वाटतच नाही
अरे लोकहो, ते मानव मजाक करत
अरे लोकहो, ते मानव मजाक करत आहेत
ते लेखातील पॉश घरातील लोकं
ते लेखातील पॉश घरातील लोकं खरेच उभ्या उभ्या जेवतात का Lol<<< अस ते तरी म्हणाले.. पण खरंच असावं, कारण आमचा संवाद गंभीर नोटेवर चाललेला
पहिलाच फोटो खल्लास<<<< फोटो क्रेडिट => गुगल
झकासराव थँक you
अति टापटीप असेल घर तर ते घरपण मिसिंग वाटतं .<<<<ते पण खरं आहे .. मला आवडत पण ठेवायला जमत नाही :।
काही लोक घर बघताना वॉर्डरोब ,
काही लोक घर बघताना वॉर्डरोब , किचन ट्रॉली पण उघडून बघतात च्यायला....
काही लोक घर बघताना वॉर्डरोब ,
काही लोक घर बघताना वॉर्डरोब , किचन ट्रॉली पण उघडून बघतात च्यायला.... << . काही लोक त्यांच्या ट्रॉली , कपाट उघडून बरण्या, एका लायनीत एका, रंगाच्या झाकणाच्या वगैरे वगैरे काय काय दाखवतात .. कशाचंही कौतुक असतं
ज्यांना हे वोर्डरोब किचन
ज्यांना हे वोर्डरोब किचन बनवायचे असेल ते बघत असावेत. तरी विचारून बघणेच उत्तम. अर्थात विचारल्यावर कोणी नाही म्हणत नाही. पण कोणाला ते नाही आवडत. अश्यावेळी समोरचा दाखवायला फार उत्सुक दिसला नाही तर उगाच डोकावून बघणे टाळावे.
जे स्वतःहून कौतुकाने आपले घर ट्रॉली कपाट बरण्या दाखवतात ते ही ओके वाटते. लोकांनी हौसेने घर सजवले असते, त्यामुळे बारीक सारीक गोष्टींचेही कौतुक असू शकते एखाद्याला.
एका घरी मला लाईटचे किती पॉईंट आहेत घरात हे कौतुकाने दाखवत होते. पन्नास शंभर की काहीतरी मोठा आकडा घेतलेला. आणि कुठे कुठे कश्या लाईटस आहेत हे मोजून दाखवणे चालू होते
बाकी मला मुंबईतल्या घरांमध्ये काय बघायचे आणि काय दाखवायचे हे कळत नाही. बसल्या जागेवरून नजर टाकली तरी अर्धेअधिक संपते. फक्त बेडरूममधील प्रायव्हसीत तेवढे डोकावायचे राहते. तरी स्वतःवर कधी कोणाला घर दाखवायची वेळ आली तर मी बाल्कनी तेवढ्या नेऊन दाखवतो. तेच बरे वाटते. मोकळे ढाकळे, हवेशीर, बाहेरचा व्यू बघत बसा छान, पाहुणेही खुश.. थोड्याफार गप्पा मग तिथेही रंगतात..
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
आमच्या घरमालकीण काकू त्यांच्या व्याहीबुवांची गंमत सांगायच्या. घासून आलेली भांडी परत धुवून, पुसून शिवाय मग ते पंख्याखाली वाळवून मग जाग्यावर ठेवायचे. शोकेसची सरकवण्याची काच असते, तिथे एक स्वच्छ छोटंसं फडकं ठेवलेलं. काच सरकवताना बोटावर फडकं घेऊन मग ती काच सरकवायची म्हणे!
घरात थोडा तरी पसारा हवाच. अती टापटीप असली की सवय नसल्यामुळे बिचकायला होतं.
काच सरकवताना बोटावर फडकं घेऊन
काच सरकवताना बोटावर फडकं घेऊन मग ती काच सरकवायची म्हणे! >>
लहानपणीचा भावाचा एक किस्सा आठवला. त्यांच्या घरी जेव्हा नवीन फ्लोरींग केलेले तेव्हा तो खाली बसून जेवताना ताट थेट जमिनीवर न ठेवता त्याखाली न्यूजपेपर ठेवायचा. कारण ताटातील गरम पदार्थांमुळे खालच्या नव्याकोर्या फ्लोरींगला चटका बसू नये
भाऊ माझ्यापेक्षा मोठा आणि कॉलेजला होता. त्याला माझ्यापेक्षा जास्त सायन्स वायन्स कळत असावे म्हणून मी ते बघून कधी हसायचो नाही.
मानव >> काहिही.
मानव >> काहिही.
शिसवी तख्तपोशी ( छत) वाली घरे
शिसवी तख्तपोशी ( छत) वाली घरे पाहिली आहेत. कानडी घरेही छा न असतात. स्वयंपाक उपकरणे पूर्वी दहा पंधरा लोकांसाठीची असल्याने किचन ट्रॉलीत राहणारी नव्हती.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मी नताशा Thank you
मी नताशा Thank you