अ‍ॅड अस्त्रा: स्पेस कडबोळे खमंग व चविष्ट.

Submitted by अश्विनीमामी on 16 September, 2022 - 09:48

तर बंधु आणि भगिनिंनो, उकडीचे मोदक करुन आणि खाउन झाले असतील व देशी फराळाचे जुगाड करायला अभी थोडा टैम है लेव्हल वर असाल तर उघडा ते नेटफ्लिक्स दण्न. दण्न. आणि लावा हा चित्रपट. अ‍ॅड अस्त्रा हे ब्रम्हास्त्रातलेच एखादे उडुन अमेरिकेत पडले कि कॉय असा विचार करायला वाव आहे. पण पदार्थ एकदम लै भारी करमणूक प्रधान आहे.

अँड व्हाय नॉट. ह्यात माझे आव डते सर्व घटक पदार्थ आहेत. आउटर स्पेस. मिशन्स अँड लँडिन्ग्ज ब्रँड पिट त्याचा बाप!! टॉमी ली जोन्स. स्पेस सूट्स पिट चे बरेच लव्हली क्लोज अप्स आहेत. .... ते हिरवे निळे डोळे. पांढरी दाढी क्या कहने क्या कहने ग्लोबल सुपरस्टार. इथे भयानक पाउस असल्याने घरी बसावे लागत आहे.

तर सुरुवातीलाच मेजर रॉय हा स्पेसमध्ये पण प्रुथ्वीच्या जवळपासच काहीतरी रिपेअर करत आहे. ऑरेंज स्पेस सूट!! तर त्या टावर्स मध्ये वर काही तरी गडबड होते मेजर पावर बर्स्ट होउन आग लागलेली आहे. शेजारच्या टावरवर काम करणारा माणूस खाली पडतो. पण हा हिरो असल्याकारणाने मोठ्ठी लिव्हर का कायते दृष्यपणे दोन्ही हातांनी डावीकडे हलवून पावर सर्ज बंद करतो. आर्मी मेजर व इंजिनिअर जो ठहरा!! व इथपरेन्त स्वतः पण पडतो. मग मोठ्ठा फॉल. ग्राविटी सिनेमाची आठवण येते. पण ह्याचे पॅराशूट उघडते . त्यातूनही काही जळता कचरा पडतो व ते फाटत जाते पण हा जमीनीवर पडतो व वाचतो.

ह्याचे बाबा म्हणजेच टॉली जो. हे आकाश गंगेतले सर्वात टॉप बेस्ट अ‍ॅस्ट्रोनॉट आहेत/ होते. जिवंत की मेलेले ते अजून कळलेले नाही. कारण द लिमा प्रॉजेक्ट अंतर्गत हे टीम व शिप घेउन गुरु शनी व पुढे नेपचुनला गेलेले आहेत... तिथोन च त्यांनी तो पहिला पावर्सर्ज पाठवला आहे. चेन रिअ‍ॅक्षन प्रमाणे हा मोठा होत होत. शेवटी पूर्ण जगाला धोका आहे. ते झालेच. फार स्पेस पिक्चर बघून मला पण आता कळले आहे. म्हणून पिट्याला तुझ्या बापाला कंट्रोल कर नाहीतर मारून टाक म्हणून तिकडे पाठवले आहे. ही सर्व कन्सेप्ट इलॉन मस्क ने टॉप क्वालिटी गांजा ओढून फँटसी बघितल्यावाणी आहे. ह्यात त्याची बरीच स्वप्ने खरी केलेली आहेत. म्हणजे हे फूटेज आपल्याला त्याच्या स्पेस एक्स च्या पुढील प्रेझेंटेशन मध्ये नक्की दिसेल.

मग हा मिशन वर निघतो. आधी एक्स वाइफ साठी एक वॉइस मेसेज अलेक्सा टाइप वर ठेवतो व मग डिलीट पण करतो. उगीच कटकट नको.
तर मार्स ची फ्लाइट चंद्राच्या दूर बाजुवरुन आहे. हा एक एनिमी झोन आहे कारण जिथे तिथे मिनरल्स साठी इतर देशांनी पण खणून ठेवले आहे व ते भांडतात.( हाउ डेअर दे!!) बरोबरचा म्हातारा वडिलांचा कलीग असतो . हे चंद्रावर कमर्शिअल फ्लाइट ने जातात. एक ब्लांकेट व पिलो चे
१२५ डॉलर कते!!! पण ते काही घेउन झोपताना दिसत नाही. कारण चंद्र जवळच आहे ना. हे साधे एअर्पोर्ट सारखे दिसते. एक बुरखावाली पण आहे. मुले एलिअन टीशर्ट सर्व आहे. ते बघुन पिट्या तु क टाकतो. मग आहे हायपर लूपचा प्रवास!!! ( इ. म फँटसी अ‍ॅलर्त) इथून दोघे मून बग्गीने चंद्राच्या दुसर्‍या भागात जातात. ते जाताना मारामारी होते व एक ह्यांचा पण मरतो हे पोहोचतात. म्हातार्‍याला अचानक हार्ट अ‍ॅटेक येतो व त्याला सर्जरीला नेतात. तत्पुर्वी, तो एक सिक्रेट मेसेज वाली चिप ह्याला देतो.

आता मंगळ प्रवास!!( इ म फँ अ‍ॅलर्ट २) सीफस नावाचे रॉकेट आत लोक मजेने बसले आहेत. १९ दिवसांचा प्रवास हे ते. पिट्या दूर जाउन मेसेज ऐकतो तर काय तुझे वडील जिवंत आहेत इतकेच नाहीतर त्यांचे डोके फिरले आहेत व ते नेपचुन वरुन अर्थ वर भयानक मेंग्नेटिक रेज पाठवत आहेत. कारण सबका विनाश. आता ह्याला भावनिक लोड येते. पण आगे जाना है. मध्येच ह्यांना एक नॉर्वेजिअन शिपचा डिस्ट्रेस कॉल येतो.
पिट्या नको जाउ म्हणतो पण सीफस चा क्यापटन जायचेच म्हणतो. ते जातात तर काय ही बायोमेडिकल रिसर्च शिप असते व प्रयोगा साठी
नेलेले प्रायमेट खुनी हल्ला करून सर्वांना मारलेले असतात. हे गोरिले बरोबरच्या क्यापटन ला पण मारुन टाकतात.( इ म फँटसी अ‍ॅलर्ट न्युरालिंक साठी किती माकडे मारलीत. छोडेगा नै मै. )

मग ख्रिस्ती प्रार्थना करुन त्या क्यापटनचे स्पेस फ्युनरल. म्हणजे दार उघडून बाहेर ढकलून दिले.

आता मंगळावर लँड करताना पण काहीतरी चुकतेच. हे ही कॉमन सेन्स स्केप्टी क वर मस्त दाखवले आहे. पण सिनेमा असल्याने आपले साहेब मँन्युअल ओव्हरराइड करून नीट उतरवतात. इथे मोठा बेस आहे ( इम फें नं४) बायका पण मोठ्या पदावर आहेत. सेव्रन्स मधील ती एक रेक रूम असते तशी आहे. तिथे काही मानसिक मंबो जंबो करून एक स्त्री वैज्ञानिक ह्याला सीफस मध्ये परत घुसवते. आतील सर्व लोक त्यांच्या चुकीने किंवा आत कश्याला तरी धडकून मरतात व हा एकटाच पुढे जातो. ७९ दिवसांचा प्र्वास करुन आता नेपचुन वर लँड होतो आहे. पक्षी लिमा शिपला डॉक व्हायचा प्रयत्न करतो. पण तिथे काहीतरी लफडे दिसते. होत नाही. हा मागे बघतो तर ह्याची लँ डर क्यापसूल अंतराळात तरंगत नाहीशी होते. आता काय!! हा दार उघडून आत शिरतो तर कसले तरी अमेरिकन संगीत चालू आहे. १९७५ मधले. व लोक मेलेले तरंगत आहेत. एक लाल ग्लो आहे हिरो आत आत आत जात आहे. अहो आस्चर्यम त्याला वडिलांचे नाव असलेले जाकीट दिसते. पदर डोल्याला.

अजून इथे लाइट चालू आहे. २९ वर्शा पूर्वी लिमा मिशन गेलेले. काय बेस ना. आमच्याकडे दोन तास पाउस झाला की इंटर्नेट जाते. आता एकदम टॉ ली जोन्स चा एकदम रॉय अरे तूच आहेस का मला मोति बुंदी आहे नीट दिसत नाही. असा आवाज येतो. पिता पुत्राची भेट होते हो शेव्टी . बाप सर्ज थांबवायचा प्रयत्न करत आहे. ऐशीचा तरी दिसतो आहे. पिटचा वडिलांक्डे बघतानाचा क्लोज अप आहे. लै ग्वाड दिसतो. इज ही लाइक सिंगल!!

आता वडील इतक्या वरशांचे फालतू इमोशनल जस्टिफिकेशन देत आहे. पण हा श्राव्ण बाळ असल्याने आय स्टिल लव्ह यू म्हणतो काय ते निळे डोळे. व मी तुला घेउन जाईन म्हणूनच दूर आलो आहे म्हणतो. ( मग सर्ज चे काय जग उध्वस्त होईल त्याचे काय!!!) वडील बिचारा फार च अशक्त व वृद्ध झालेला आहे. त्यात स्पेस म्याडनेस. पण म्हातारा नक्की सरकलेला आहे. काहीही फेकत आहे.

एक चांगली व अनुकरणीय बाब म्हण्जे दोन्ही एकेकाळ चे सुरेख नट आता वयस्कर झालेले आहेत व अगदी सुजलेले डोळे, सुरकुत्या आहे
तश्श्या दाखिवल्या आहेत. नाहीतर अस्तात काही बोटॉक्स फिलर्स व सीजीआय सिक्स पॅक वाले. आता दोघे बापलेक स्पेस सूट घालून सज्ज होतात. वविमान चालू करायचा प्रयत्न चालू आहे. इंजिनेअर जो ठहरा. पण बाप एकदम खाली जंप करतो त्याला जायचे नाही. तर इंटेलिजेंट लाइफ शोधायचेच आहे. दोघे एका दोरीला बांधलेले आउटर स्पेस मध्ये भरकटत आहेत असा चक्क शॉट आहे. इस्पेस फुग्डी. टॉली जो जायची धडपड करत आहे. पण हा श्रावण बाळ असल्याने तो ही अमेरिकन छोडेगा नै मै मोड मध्ये आहे पण सोडतो तो चक्क म्हातार्‍यास. व श्वास घेत आहे रडत असावा बहुदा. पुअर थिंग. व स्पेस मध्ये किंकाळी फोडतो व ती आपल्याला ऐकू येते सुद्धा.!! कोण बनवते असल्या फिल्मा कहांसे आते है ये लोग.

आता ह्याला गीता अध्यात्म सांगणारे कोणीतरी हवे आहे. कारण त्याला वैश्वीक अंतराळी खिन्नता आलेली आहे व्हाय गो ऑन वॉट्स द पॉइन्ट असे म्हणतो. परत उलटा प्रवास चालू होतो. वर शनी दिसतो. हा वक्री असावा. मग हा सीफस वरुन विंगवर येतो व काहीतरी फ्युज सारखे काढून टाकतो. कसले तरी प्यानेल उघडतो. हा रेडारच्या पट्टीवर वटवाघुळ बसवे त्सा बसला आहे. व पट्टी घेउन स्पेस मध्ये जंप करतो. शनीच्या रिंग्ज मध्ये जातो. एकदम जेम्स बांड टेक्निक.

मग एक बारका फ्लॅष बॅक आहे. ह्याने नेप्च्युन वर वडिलांचा सर्व कलेक्टेड डेटा ट्रान्सफर करुन घेतला अहे. भली मोठी वायर लावुन.
सेफस शिप वर परत येउन आदळतो. दार उघडून आत येतो. आता हा लिमा प्रॉजेट न ष्ट करणार् आहे अर्थ काही बिलिअन माइल्स दूर आहे .
अमेरिकन चित्रपट आहे ना नाहीतर किलो मीटर मध्ये सांगितले असते ए आय बाईंनी. तर आता हा मी जगलो वाचलो तर घरी येइन पण आता न् न्युक्लीअर अस्त्रा टाकून लिमा प्रॉजेक्ट उद्वस्थ करत आहे. असा मेसेज देतो व त्याला त्याचा एकटे पणा दूर करायचा आहे. घरी एक्स वाइफ
वाट बघिंग. मोठा स्फोट होतो. व हा झोपी जातो. इतके अंतर टाकून हा अर्थ वर आला पण. पण अमेरिकेतच उतरतो. आफ्रिकेत उतरत पण न नाहीत हे लोक्स. क्या जी.

किती महि ने प्र्वास केला. इतके फ्युएल होते का का रिफील केले!! नो आयडिआ. आता परत निळ्या डोल्याचा क्लोज अप आहे. लोक्स त्याला उचलून घेतात. इतक्यात्रासात दाढी आजिबात वाढलेली नाही. परत हा बरा होउन एकट्यानेच कॉफी पीत आहे. व एक्स वाइफ समोर आलेली आहे. हा तिला बघुन हसतो. आता प्वार होउद्या एक. ही एशिअन चेहर्‍याची आहे. लकी गर्ल दो. आय विल लिव्ह अँड लव्ह म्हणतो हिरो साहेब.

ही भानगड जेम्स ग्रे माणसाने दिग्दर्शित केलेली आहे. ह्या मानाने इंटर्स्टेलर फारच शास्त्रीय माहितीवर आधारित होता हे माझे नम्र मत. बट एंजॉय धिस अस्त्रा ऑल्सो. ह्यावर उतारा म्हणून मी आता म्याट्रिक्स रिलोडेड लावली आहे. गोइन्ग ब्याक टू फेवरिट्स.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेक्षकांच्या माहिती साठी: तरुणांना कदाचित टॉमी ली जोन्स फार माहीत नसेल पण मेन इन ब्लॅक भाग एक व दोन हे त्यांचे क्लासिक सिनेमे आहेत. ह्यातही स्पेस एलिअन्स हेच विषय आहेत. विल स्मिथ पण आहे पण कंट्रोल मध्ये. सिनीअर एजंट म्हणून टॉ. ली.च प्रभाव पाडतो. वन ऑफ माय फेवरिट्स. चांगला अ‍ॅक्टर आहे. पिट व जोली एकत्र आले तेव्हा मी खरेच फार सुखावले होते. मुलगी शिलो तर अगदी बापावर गेलेली आहे.
गोड दिसते पोरगी. पिटचे काम नेहमीच सोला आने बेस्ट असते. इन्ग्लोरिअस बास्टर्ड्स, फाइट क्लब ओशन्स एट. ( ह्यात तर तो नुसताच वावरला आहे व कायम दर शॉट मध्ये खात पीत आहे. ) आपल्या रॅचेल चा नवरा.

अमा, पिट इतका आवडत असेल तर कुठूनतरी मिळवून 'बुलेट ट्रेन' पहा. नवीन पिक्चर आहे. आणि टोटल धमाल आहे. ब्रॅड पिट माझ्यासाठी पण 'डोळ्यात बदाम' कॅटेगरी. बुलेट ट्रेन मधे मी अजूनच फिदा झाले. म्हातारा झाला तरी चिकणं दिसायचं सोडत नाही हा माणूस Happy

अ‍ॅड अ‍ॅस्ट्रा आवडलाच होता. ते बापलेकाचे सीन्स टची आहेत एकदम.