लेह लडाख वारी भाग चार

Submitted by pravintherider on 16 September, 2022 - 04:36

जयपूर ते बिलासपूर दिनांक १४-०८-२०२२ अंतर ६२८ किमी
आज नेहमी प्रमाणे लवकर उठून तयार झालो होतो मात्र काल रात्री जेवण खुप छान मिळालं होत मग त्यांना विचारलं तर म्हणे हो नाष्टा पण तयार आहे मग आम्ही नाष्टा करूनच निघालो. आम्ही रात्री उद्या कोणत्या रस्त्याने जायचं ते ठरवलं, जरी आम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी कसं जायचं ठरवत होतो पण फक्त एक उजळणी म्हणूनच. जवळपास दोन महिने अगोदर पासून सर्व तयारी केली होती. मोबाईल मधे नारनौल ते अंबाला एक सरळ रस्ता दिसत होता. माझ्या गाडी मध्ये ऑफलाईन मॅप आहे त्या मुळे नविन रस्ता दिसत नव्हता. आम्ही साधारण कोटपुतली पासुन डावी कडे वळण घेतलं आणि एक सहा पदरी रस्ता चालू झाला जो सरळ २०-२५ किमी नंतर त्याच रस्त्या ला मिळत होता. रस्ता एक तर नवीन झाला आहे नी सरळ म्हणजे एकदम सरळ आहे ना वळण ना त्यावर ट्रॅफिक होती पण आम्ही कुठे ही घाई करणार नव्हतो. नारनौल पासुन आम्हाला 152D ट्रान्स हरयाणा एक्सप्रेस हायवे लागला. मग बुरहान कडे गाडी चालवायला देवुन मी मस्त साईड ला बसून आराम केला तीन तास. या रस्त्यावर थांबण्याची परवानगी नाही आणि पूर्ण रस्ता सीसीटीव्ही यंत्रणा खाली आहे. दोन्ही बाजूला शेती आहे आणि जवळ जवळ २३० किमी अंतरात एक ही हॉटेल नाहिये. मात्र काही ठराविक अंतराने पद्धतशीर पने साईड ला जागा ठेवली आहे. जेथे पेट्रोल पंप, हॉटेल च काम चालू आहेत.  जवळ जवळ साडे दहा पर्यंत आम्ही अंबाला बायपास ला होतो आणि पुन्हा गाडी चालवायला मी घेतली. अंबाला नंतर ट्रॅफिक मध्ये चांगलीच वाढ झाली होती. आम्ही साधारण एका तासात चंदिगढ बायपास ला होतो मात्र त्या नंतर जरा सावधपने गाडी चालवत होतो कारण चंदिगढ मध्ये ट्रॅफिक नियम खुप कडक आहेतच आणि ट्रॅफिक मध्ये चांगलीच वाढ झाली होती. एका ठिकाणी पोलिसांनी विचारलं, पण फक्त काच आणि लायसेन्स पाहून सोडुन दिलं. चंदिगढ चं वातावरण खूप गरम होत आणि आम्हाला पण आता भुक लागली होती कारण सकाळ जरा जास्तच लवकर नाश्ता केला होता. आम्ही चंदिगढ मनाली हायवे ला लागलो नी काही वेळातच हवेली हे प्रसिद्ध असं हॉटेल समोर आलं पण आजबाजूला केएफसी, बर्गर किंग पाहून आता परत दहा बारा दिवस भेटणार नाही हे सर्व मग तिकडे गेलो. बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि तो पर्यंत बाहेर पाऊस चालू झाला होता आणि तो पण एकदम जोरात. कसं तरी गाडी पर्यंत गेलो नी निघालो सुंदर नगर कडे.
सुंदर नगर जवळपास १७० किमी बाकी होत आणि वेळ पण भरपूर होता पण जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसा पाऊस पण वाढत चालला होता इतका की, काही दिसत नव्हते बाहेर मग एक हॉटेल पाहून सरळ गाडी उभी केली नी पाऊस कमी होण्याची वाट पाहत बसलो. साधारण अर्धा पाऊण तासाने पाऊस कमी झाला नी आम्ही निघालो. थोड्याच वेळात उंच शिखर, झाडे हिमालया मध्ये गाडी आणायचं माझं स्वप्न पूर्ण झालं असं वाटलं पण मना पासून सांगतो की, हिमालयात गाडी चालवणे सोपं नाहिये. चंदिगढ नंतर थोड्याच वेळात चढ उतार सुरू झाले त्यामूळे वेग पण मंदावला होता आणि पाऊस कमी होता मात्र पूर्ण रस्ता हा केवळ घाट तर आहेच पण रुंदी पण कमी आणि चढ उतार पण जास्त. चंदिगढ वरून लेह, मनाली साठी महत्वाचा रस्ता आहे नी त्यामूळे मोठ्या संख्येने ट्रक आणि बस होत्याच. आम्ही सावकाश आजूबाजूचे सौंदर्य पाहत काळजी घेत पुढे जात होतो. रस्ता काही ठिकाणी खुप खराब आहे. पाऊस खूप वाढत चालला होता पण माझा विचार होता की सुंदर नगर पर्यंत जावूया मात्र समीर बोलला की असं पण आपण सहाशे किमी चाललो आहोत तर थांबून घेवु मग लगेच एक हॉटेल पाहून रूम घेतली आणि जेवणाच सांगून दिलं नी आराम करत बसलो. तासा दोन तासांनी येवून बघतो तर तिकडे खुप सारे लोकं दारू पिऊन मस्ती करत होते. आम्ही जेवणाच विचारलं तर म्हणे की, देतो पण त्याची अवस्था पाहून आम्ही नाही बोललो आणि जेवण करायला बिलासपूर गावात गेलो. जेवण झाल्यावर आलो तर अजूनच धिंगाणा वाढत चालला होता आणि समीर ची इच्छा नव्हती तिथे राहण्याची पण त्याला सांगितलं आपल्याला काही त्रास देत नाही तर जावू दे आम्ही आमच्या रूम मध्ये जावून मस्त उद्या काय काय करायचं मनाली मध्ये हे स्वप्न पाहत झोपायचा प्रयत्न करत होतो पण उदया तर खरं आम्हाला हिमालय खरा रंग दाखवणार होता नी आम्ही त्या पासून अनभिज्ञ मस्त झोपलो होतो...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिताय
M-parivahan म्हणून एक RTO app आहे ज्यामधे आपण आपले Licence व गाडीचे RC virtual ठेवू शकतो.
And it is valid, need not to show your physical documents as per the law.

मी वापरतोय गेली काही वर्षं कधी अडवणूक केली नाही physical licence or RC साठी
MH passing car mostly traveling to Maharashtra, Gujarat, Rajsthan

ते traffic पोलिस

हो सर, मी पण वापरतो पण त्या वेळी सुचलं नाही खरंतर. महाराष्ट्रात पण एक दोन वेळा पोलिसांनी मोबाइल मधील आरसी आणि लायसेन्स पाहून पण ओरिजनल हवं अशी मागणी केली आहेच पण दिलं नाही हे पण खर.

सर म्हणू नका Happy

मायबोलीवर सर म्हणजे........... वाटतें Happy