माईक मार्कम

Submitted by अपरिचित on 11 September, 2022 - 12:37

आजपर्यंत कित्येक लोकांनी "कालप्रवास" करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं. काहींनी प्रत्यक्षात कालप्रवास केल्याचा दावा केला. पण संशोधनांती, त्यांच्या दाव्यात खरेपणा आढळून आला नाही.

नुकताच एक जुना व्हिडिओ बघण्यात आला. त्यानुसार "माईक मार्कम" नामक इसमाने प्रत्यक्षात कालप्रवास केला. त्याच्या ह्या दाव्याला वैज्ञानिकांनी अजूनतरी खोडून काढलेले नाही.

१९९५ मध्ये माईक "जेकब्स लॅडर" वर काम करत होता. त्यात दोन धातूस खाली एका इलेक्ट्रिक बॉक्सला जोडलं गेलेलं. त्या दोन धातूंच्या वरील टोकांत मात्र जास्त अंतर ठेवलं गेलं. जेव्हा त्या बॉक्समधुन वीजवाहन व्हायचं तेव्हा त्या दोन धातूंच्या आत एक छोटंसं वादळ सदृश्य वातावरण तयार व्हायचं. माईकने त्यात एक साधारण खिळा ठेवला तर त्याला जाणवलं की तो खिळा वीजवाहन सुरू करताच काही अंतरावर जाऊन पडत असे. प्रत्येक वेळी हाच अनुभव येत असे.

त्याने मग हा प्रयोग मोठ्या पातळीवर करायचं ठरवलं. निधी मिळवला. प्रयोग केला आणी खिळ्या ऐवजी स्वतःवरच केला. प्रयोग सुरू होताच तो तिथून गायब झाला तो नंतर कधीही कोणाला दिसलाच नाही.

साधारण काही महिन्यानंतर कोणीतरी एका रेडिओ जॉकीला फोन करून १९३० साली समुद्रकिनारी सापडलेल्या एका अज्ञात मृतदेहाबद्दल माहीती घ्यायला सांगितलं. माहीती काढली गेली तेव्हा कळालं की त्या मृतदेहाचा चेहरा अत्यंत विद्रूप झालेला. त्याच्याकडे एक आगळीवेगळी वस्तू सापडली गेली होती. ती वस्तू खरंतर मोबाईल होता. त्या मृतदेहाची उंची, वजन व एकंदरीत वर्णन हे तंतोतंत माईक मार्कम सोबत जुळत होतं.

काय वाटतं, हे प्रकरण सुद्धा जॉन टिटोर, रुडॉल्फ फेन्ट्झ प्रमाणे एका तल्लख बुद्धीच्या व्यक्तीने गंमत म्हणुन केलेली घटना आहे की वेगळं काही आहे?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users