पाककृती स्पर्धा क्र २- फलाफल बॉम्ब-साक्षी

Submitted by साक्षी on 9 September, 2022 - 11:52
फलाफल बॉम्ब, प्रोटीन रिच
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नावावरून भारी वाटतेय पण फार जगावेगळी कृती नाहिये. नेहमीच्या फलाफलला थोडा ट्विस्ट दिलाय इतकंच!

छोले १ कप
कांदा १ बारीक चिरून
लसूण ३-४ पाकळ्या
जिरे पूड १.५ चमचा
धणे पूड १.५ चमचा
मिरपूड १/२ चमचा
लाल तिखट १ चमचा
कोथिंबीर
लिंबाचा रस
मीठ

आवडीचं डीप/ मेयोनेज / आवडीची चटणी - हे जे असेल ते जरा घट्टसर असावं
sahitya.jpgह्ना

क्रमवार पाककृती: 

१) छोले आठ तास भिजत घाला
२) छोले, लसूण पाकळ्या, जिरे पूड, धणे पूड, लाल तिखट मिक्सर वर जरा ओबडधोबड वाटुन घ्या.
३) ह्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरपूड, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घालून नीट एकत्र करून घ्या.
mixing_0.jpg
चव adjust करून १/२ तास फ्रीज मधे ठेवा.

४) अर्ध्या तासाने ह्याचा छोटा गोळा घेऊन त्याची खोल वाटी बनवा. त्यात थोडंसं डीप घालून गोळा बंद करा. गोळे व्यवस्थित बंद करून घ्या. मिश्रण थोडं सैल असतं, त्यामुळे हे हलक्या हाताने करावं लागेल.
असे सर्व गोळे बनवून घ्या.

५) व्यवस्थित तापलेल्या तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.
falafalMaking.jpg

६) गरम गरम सर्व्ह करा.
Ready.jpg

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात साधारण मध्यम आकाराचे १४-१५ फलाफल होतील
अधिक टिपा: 

१) पिटा ब्रेड, फलाफल बॉम्ब, सलाड असं एक मिल होऊ शकेल.
२) हे फलाफल बॉम्ब झटपट खायच्या डब्यात द्यायला चांगला प्रोटीन रिच पर्याय होइल.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोपं आणि चटकदार वाटतय.
(फक्त ताहिनीचा धसका घेतलाय. तिळाच्या पेस्टची चटणी. ती नाहीये यात. )

मस्त!