Submitted by मी अश्विनी on 7 September, 2022 - 17:32
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि ..... फाटकाजवळ डेवलपरचा जेसीबी पाहून भितीने त्याची आतडी पिळवटली.
टेंपोवाल्याबरोबर वंगाळ करतांना पकडली म्हणून दोनच महिन्यांपूर्वी त्याने लक्ष्मी आणि तिच्या याराचा गळा चिरून प्रेतं शेजारच्या घराच्या परसातल्या खड्ड्यांत पुरली होती.
मग 'छिनाल, टेंपोवाल्याबरोबर पळून गेली' अशी बोंब मारत ठाण्यात रिपोर्ट सुद्धा लिहिला.
रघू रोजंदारीवर जात असलेल्या बांधकामाचा मालक, रघू कॉलमचे खड्डे खोदतांना 'तुह्या बायकोनं टेंपोवाल्याशी टाका कामून भिडवला आसन रे' विचारीत फिदीफिदी हसे. रघूला त्याला कॉलमच्या खड्ड्यात गाडून टाकावासा वाटे.
शेजारच्या परसातले खड्डे आणि मालकाचे हसणे आठवताच रघूच्या डोक्यात तिडिक गेली. अंधारून येताच तो कुदळ फावडं घेऊन शेजारच्या घराकडे निघाला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दृश्यम् ची आठवण झाली. रघूपण
दृश्यम् ची आठवण झाली. रघूपण प्रेतं दुसरीकडे हलवणार का?
जमली आहे!
जमली आहे!
छान
छान
छान.
छान.
जमलीये.
जमलीये.
मालकाला पण मारून पुरणार का