कथाशंभरी२- समज गैरसमज

Submitted by अni on 6 September, 2022 - 08:16

..... आज नव्याने सेतु बांधावा का ह्या विचारात असतानाच मागून हाक आली.

स्वामी, जिथेतिथे कथाशंभरीमध्ये रघू म्हणजे कोणीतरी खुप वाईटच असणार असा समज देशात दृढ़ होऊ लागलाय.

ह्याला दुजोरा देणारा धीरगंभीर स्वर उमटला.

प्रभु, निस्सीम भक्तीने रघूरामाची सत्ता घरावर प्रेमळपणाने स्विकारणारे जनवासी ह्या वसुंधरेवर दुर्मिळ झालेले असताना नलनिलांची अद्भुत विद्या फक्त द्विपक्षीय चर्चामध्ये मांडवलीचे सेतु बांधण्यापुरताच शिल्लक राहिलीय का असेच दृश्य पाहण्यात येत आहे.

हे सर्व ऐकून समस्त फॅमिलीसहित अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि.... अनेक दशाननांकडून फक्त निवडणूकांपुरता मर्यादित ठेवलेल्या आपल्या अस्तित्वास भूलोकासाठी शेवटचा टाटा बायबाय करून पुन्हा वनवासास निघण्याची तयारी केली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users