कथाशंभरी २- अंधश्रद्धा - अनन्त्_यात्री

Submitted by अनन्त्_यात्री on 5 September, 2022 - 07:30

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले
आणि
स्वतःशी हसत घरात परतला.
भुताट्कीच्या घरात रात्रभर राहतो म्हणून काल संध्याकाळी तिथे रहायला आलेला अंधश्रद्धा हटाव समितीचा तरूण कार्यकर्ता त्याला आठवला.
माझ्या घरातून त्या घरातल्या पलंगाखालच्या लादीत उघडणारे भुयार खोदले असेल हे त्याच्या कल्पनेपलीकडचे होते.
रात्री बाराच्या ठोक्याला आपण पलंगाखालून पहारीने ठोकत हसायला लागलो तेव्हा दमच तोडला घाबरटाने.
वाईट तर झालंच बिचार्‍याचं पण रघू मान्त्रिकाशी पंगा घ्यावाच का म्हणतो मी?
जाऊंदे..झालंं ते झालं.
बरीच कामं पडलीयेत
मुख्य म्हणजे भुयाराच्या दाराला काल घाईघाईत कुलूप लावलंय ना नीट?
अरे.. पण भुयारचं दार?
काल लावलेलं कुलूप?
अरे कोण तुम्ही?
नका..
नका मारू पहार डोक्यात
प..हा..र...
डो..
क्या...
.......

Group content visibility: 
Public - accessible to all site users