Submitted by केशवकूल on 5 September, 2022 - 07:00
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले. आणि...
बंद दरवाजा उघडून एक म्हातारा बाहेर आला.
“अरे नारायणा, केव्हा आलास? भाऊकाका आणि काकू किती आठवण काढत होते. गेले बिचारे. आज यायला सवड झाली काय?”
“मी रघू. आपली ओळख?” लोक मला नारायण का म्हणताहेत? मी रघु आहे.
“मला नाही ओळखलस? मी झिलू काका. चाकरमानी झालास आणि ओळख विसरलास?”
“झिलू काका? बंद घरात तुम्ही कसे रहाता?”
“माझे घर बंद नाहीये. नारायणा, तुझे घर बंद आहे.”
पुन्हा नारायण? हे घर माझे थोडच आहे. माझे घर तिकडे मुंबईला आहे.
नर्सबाईने नारायणला हलवून जागे केले.
“उठा नारायणराव, औषध घ्यायची वेळ झाली.”
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे,
छान आहे,
ओह! मस्त आहे!
ओह! मस्त आहे!