कथाशंभरी२ - प्रस्थान - मामी

Submitted by मामी on 5 September, 2022 - 06:59

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि लगबगीने तो चावी घेऊन त्या घरात गेला.

गेल्यागेल्या त्याने दार आतून व्यवस्थित लावून घेतले आणि तो थेट शेवटच्या खोलीत गेला. खोलीला एक भलीमोठी काचेची खिडकी होती.

रघूने अंगावरचे कपड्यांचे थर ओरबाडून काढून टाकले, घड्याळात बघून काहीएक आकडेमोड केली आणि समोरच्या फडताळाचे दार उघडून त्यातील चोरकप्प्यातील एक कळ दाबली.

आवाज न करता घर वर उचलले गेले आणि अंतराळात झेपावले. पृथ्वीवरचे काम संपवून आज रघू तब्बल ५०० पृथ्वीवर्षांनी त्याच्या मातृग्रहाकडे परत जात होता.

...... उडणारं घर आणि त्यांना टाटा करणारा तो हिरवा प्राणी पाहून शेजारच्या अंगणातल्या ज्योत्स्नाबाई चक्कर येऊन पडल्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages