कथाशंभरी२ - विहीर - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 4 September, 2022 - 21:20

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि सुस्कारा सोडला. लागोपाठ दोन बिर्‍हाडं सोडून गेली होती गेल्या वर्षभरात. भाडं बंद झालंच, पण त्या घरात लहान मुलांना धोका आहे अशी वदंता पसरायला लागली होती पंचक्रोशीत. गावातली माणसं एकूण अडाणीच! परसातल्या विहिरीपाशी खेळताना मुलं तोल जाऊन पडली, यात घराचा काय दोष? तरी पहिल्या अपघातानंतर फळ्या टाकून विहीर बंद केली होती. नाहीतरी आटलीच होती.
आई म्हणते रुक्मिणीच्या शापाने. पाण्यात पडून गेली ना ती!
आईतरी भ्रमिष्टासारखंच बोलते! वांझेच्या शापाने कशाला विहीर आटत्ये! लागायचाच तर आईलाच लागेल की शाप - तिनेच तर सुनेला...!
रघू चमकला. मुलं खेळताना... आई तिथेच होती ना?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

O.k

रघूच्या आईने सुनेला, म्हणजे रुक्मिणीला विहिरीत ढकललं असावं. रुक्मिणीला मूल होत नसल्याने.
आता आई भ्रमिष्ट झाली आणि ती लहान मुलांना विहिरीत ढकलते.
असं मला वाटतंय.

ड्यांजर!
ही म्हणजे आई. हिनेच रुक्मिणीला...

अच्छा!
मला रुक्मिणी नाव आलं म्हणजे कृष्णाचा काही संदर्भ आहे का काय वाटलं.
डेंजर आहे कथा.

वावेने सांगितलेला अर्थ बरोबर आहे, आता कथेतदेखील माफक बदल केले आहेत - आता बहुधा कळायला सोपी व्हावी.

सर्व प्रतिसाददात्यांचे आभार. Happy

तुम्ही आता कथा लिहिताना काही शब्दांवर लहान अक्षरात १, २ वगैरे आकडे घालून खाली टीप म्हणून त्या १, २ चे अर्थ स्पष्ट करून सांगा.
नाहीतर सरळ मधून मधून उर्दू, पंजाबी, इंग्रजी वगैरे शब्द घाला म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना कथेचा अर्थ कळेल.

सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.
तसंच हा उपक्रम आयोजित करून व्यक्त होण्याला संधी आणि दिशा दिल्याबद्दल संयोजकांचेही आभार.
Happy