माझ्यातच मी गुंगले जराशी - स्वरचित रचना

Submitted by बिपिनसांगळे on 4 September, 2022 - 14:10

मायबोली गणेशोत्सव २०२२ - स्वरचित रचना
मायबोली आयडी - बिपीन सांगळे
--------------------------------------------------
माझ्यातच मी गुंगले जराशी
-------------------------------------------------

डोंगराच्या पायथ्याला
झुळझुळत्या नदीपाशी
मी नादातच माझ्या
हे मन बोलते मनाशी

निसर्ग किती बहरलेला
उसंत मिळेना वाऱ्याला
किती सुगंध आणितो
काय अर्थ या साऱ्याला
धडधड वेगळी उराशी

नदी पुढे वहात जाई
थांबत नाही सागरापाई
कधी भेटेल माझा सागर
तगमग जीवाची बाई
तारुण्य थांबलं दाराशी

आपलाच भवताल सारा
त्यात मन रमत नाही
आपलीच माणसे सारी
त्यांच्याशी जमत नाही
काय होतंय कळेना काही
माझ्यातच मी गुंगले जराशी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults