चित्रकला स्पर्धा मोठा गटः अश्विनीमावशी पावसाळ्यातील दृश्य

Submitted by अश्विनीमामी on 2 September, 2022 - 08:59

पावसाळ्यातील एक दृश्यः ह्या विषया वरील चित्र काढले आहे. भेटायला ये आत्ताच असा प्रियकराचा संदेश आल्याने प्रेयसी लगबगीने तयार होउन निघाली आहे. छोटीशीच छत्री, पायाला आळता लावलेला तो अजून थोडा ओला आहे. केशरचना केली आहे पण वेणी सैल झाल्याने थोडे केस विखुरले आहेत व गजर्‍यातील थोडी फुले बाहेर पडली आहेत. जोरात वारा असल्याने तरंगत आहेत.

त्यात अचानक पाउस आला आहे रस्त्यात पाणी व छोटीशीच छत्री आहे त्यामुळे अर्धी भिजत आहे. पण जायची गडबडही आहे. त्यात हा मोर येउन मध्येच मोती मागत आहे त्याला ती जा आत्ता म्हणत आहे. निळे आभाळ ढगांनी भरून आले आहे व विजाही चमकत आहेत . रिमझिम पाउस ही सुरू झालाच आहे. कंपोझिशन कसे करावे ह्या साठी गुगल ची मदत घेतली आहे .

दोन दिवस ऑफिसात रफ पेपर वर प्राक्टिस केली
PIC01.jpg

काल घरी येउन ड्रॉइन्ग बुक मध्ये काढले व अर्धे रंगवले.
PIC02.jpg

आज पूर्ण केले. आत्ता पोस्ट केले. खरे तर बारिक निबाची पेने नाही आहेत. नाहीतर अजून छान रंगले असते.
PIC03.jpg

कधी तू रिम झिम पाण्याची बरसात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.
आधीची प्रस्तावना ही आवडली.

मस्त!

छान!

खूप क्युट आहे चित्र आणि कथा.
(स्वगत: एकंदर बाईंना प्रियकराच्या बिल्डिंग च्या गेटवर थांबून बराच मेकअप आणि हेअर टचअप करावा लागणारे.)

मस्त जमलं! आणि गोष्टही गोड. (रविना असो की स्मिता असो की कटरिना असो हिरविणींना अनवाणी पावसात धाडू नका म्हणोन अखिल भारतीय चळवळ सुरू करावी काय??)

अमा, छान!!
मलाही पेन्सिल स्केच जास्त भावले!