हस्तलेखन स्पर्धा-मोठा गट:ब:मायबोली आयडी-सस्मित

Submitted by सस्मित on 2 September, 2022 - 08:30

जमलंय का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे अक्षर.

हे गाणं मी पहिल्यांदा एकलं ते मोठ्या बहिणीच्या शाळेत कुणीतरी वाद्य सोबतीसह एका चीत्रपट गीताचे चाल लावून म्हटलेले, तेव्हा मी अजून शाळेत जात नव्हतो.
मग शाळेत जाऊ लागल्यावर समूहगीत म्हणुन हे गाणं आम्हाला शिकवलं त्याच्या रेडीओवर ऐकतो त्या चालीवर.
मग नंतर एकदा ते चित्रपट गीत ऐकलं :. ए दिल मुझे बता दे..

सुरेख अक्षर! पण त्यावर रेघा हव्या होत्या.
:. ए दिल मुझे बता दे.. … ही चाल तर ‘गे मायभू तुझे मी’ ची सुद्धा आहे.

अरे! आला की फोटो आणि धागा.
अगदी हेच लिहायला आलो होतो Proud

बाकी अक्षर भारी आहे.. टपोरे वळणदार कॅटेगरीतील !

वळणदार आहे अक्षर. Happy
सीतेची सीत्ता झाल्यामुळे प्रादेशिक फ्लेवर आलेला आहे या ठिकाणी. Light 1

ऋ, असंच खरडलंय. फोटो देता येतोय का ते बघण्यासाठी खटाटोप. संयोजकांनी सांगितलं हो. Lol
स्वाती, हो ना Lol
आणि सुर्य सूर्य पण Lol

धन्यवाद लोक्,.
मानव, ऐ दिल मुझे बतादे कळलं नाही. सेम चाल का?
सेम नाही वाटत

अक्षर खरंच सुंदर आहे. वळणदार, डौलदार. काना मात्रेचे, वेलांटी, उकाराचे प्रमाणही अगदी परफेक्ट. दोन अक्षरांमधली जागा सगळीकडे समान. फक्त शिरोरेखा हव्या होत्या आणि शुद्धलेखन, थोडी खाडाखोड वगैरे...

छान! वळणदार अक्षर..

बाय द वे, हस्ताक्षरांवरून तुमचे Personality traits determine करायचं झालं तर ग्राफोलॉजिस्टना फारसे कष्ट पडणार नाही..इतकं तुमचं अक्षर reviling आहे..

अजय, तुम्हाला आहे का ती कला अवगत?
हिरा, बार्सि आणि सगळएच, धन्यवाद.
अक्षरं खरंच भिरभिरी दिसत होती. आता लाईनीवर खरतर लाईनीखाली आणलीत.

शिरोरेघांमुळे कमालीचा फरक पडलाय. आता खूपच सुंदर दिसतंय.
एकच शंका शिर की शीर ? माझ्यामते " शिर " हवं

सुंदर अक्षर!

मानव, हेही चित्रपटगीतच आहे की ! तरी याला दुसर्‍या गीताची चाल लावून गायचे?

गाण्याच्याच ठेक्यावर लेझिम आणि ट्रंपेट (?) वाजवणार्‍या मुलानेही गाण्याबरहुकूम वाजवले आहे.
मास्टर अलंकारने राजेश खन्नाची मान हलवायची ढब कशी उचलली आणि सी रामचंद्रंनी गाण्यात नेहरू कसे आणले ही दोन कोडी आहेत.
मला आठवतंय - गाणं संपल्यावर नेहरूंनी मुलाचं कौतुक केलेलंही दाखवलंय.

<<मानव, हेही चित्रपटगीतच आहे की >>. ओह हे सुध्दा चित्रपटालं आहे हे नव्हते माहीत!
मी पहिल्यांदा एकलं ते ए‌ दिल मुझे बता दे या चालीवर.

छान आहे अक्षर ...

ते फोटो टाकता येत नाही हे वाचून उगीच उत्सुकता लागली होती तुमचं अक्षर पाहायची Lol

Pages