Submitted by संयोजक on 31 August, 2022 - 15:30
नमस्कार मायबोलीकर,
ज्या आतुरतेने तुम्ही बाप्पाची प्रतीक्षा करत होतात ती आता संपली आहे. टाळ, मृदूंगाच्या नादात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचे आगमन झाले आहे. मागील कित्येक दिवस तुम्ही बाप्पाच्या आगमनाच्या , सजावटीच्या कामात मग्न झाले असाल. त्यामुळे जर तुम्हाला काही थकवा आला असेल तर तो बाप्पाचे लोभसवाणे रूप पाहून कधीच निघून गेला असेल. मन एकदम प्रसन्न होऊन अंगात नवचैतन्य आल्यासारखे वाटले असेल.
तर अशा तुमच्या घराच्या बाप्पाचे दर्शन इतर मायबोलीकरांनासुद्धा होण्यासाठी आणि त्यांचे सुद्धा डोळे दिपून जावेत म्हणून तुम्ही काढलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे ,सजावटीचे, देखाव्याचे फोटो इथे पाठवा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
जरा उशिरच झालाय फोटो टाकायला पण यावर्शिच्या भावाकडच्या गौरी !


दरवर्शी अशिच कुठलितरी थिम घेवुन आरास असते, ५०-६० लोक जेवायला आणि १५०-२०० लोक दर्शनाला असतात.घरच्या गौरी समजुन मित्रमन्डळी मदतिलाही असतात पन मुख्य कारागिरि भावाचीच असते.
प्राजक्ता, गौरी सुरेख आणि
प्राजक्ता, गौरी सुरेख आणि सजावटही /\
सर्वच बाप्पा सुरेख आहेत.
Test
Test
मी पण नागपूरचाच आहे. कृपा
मी पण नागपूरचाच आहे. कृपा करून डाहाका आणि गोंधळात गल्लत करू नका. माझ्या कडे डाहाका आणि गोंधळ दोन्ही आहे. डाहाका म्हणजे तुमच्या घरी शुभ कार्य असेल तर कुळाचाराच्या दिवशी पूर्वजांना शुभ कार्यात येण्यासाठी आवाहन केले जाते. सहसा तीन पिढ्यांचे नाव घेतात. डाहाका वाद्य पायाच्या बोटांमध्ये फसवून वाजवतात. न्हावी समाजाचे लोकं हे काम करतात पण आजकाल कोणीही करायला लागलेत. गोंधळ म्हणजे कुळाचाराच्या दिवशी तुमचं जे कुळदैवत असेल खंडोबा अथवा देवीचा गोंधळ गोंधळी लोकं करतात. यात देवतेची स्तुती करून तिला आमंत्रण देतात. नागपुरात दसरा रोडवर गोंधळीपुरा आहे, जिथे गोंधळी राहतात.
प्रकाश टवके, नागपूर
Pages