संध्याकाळी साडे सहा वाजले होते बफेलो एअरपोर्टवर आमचं विमान लँडिंग करत होतं. काही शेकडो फुट उंचीवरून छोटी छोटी टुमदार घरं, हिरवीगार माळरानं सोनेरी सूर्यप्रकाशात छान न्हाहून निघालेली. इतकं सुंदर दृश्य माझी नायगारा फॉल्स पाहण्याची उत्सुकता अजूनच वाढवत होत. एरपोर्टवरून फॉल्स पर्यंतचा रस्ता अगदी नेत्रसुखद. हिरवीगार पोपटी माळरानं, अगदी तुरळक वहान. टॅक्सिवाला सरदारजी जाता जाता इतरही बरीच माहिती देत होता. अर्ध्या एक तासानंतर टॅक्सी थांबली. खळखळ पाण्याचा आवाज , दमट-उबदार हवा, आणि विशिष्ट पाण्याचा वास (माहित्ये माहित्ये scientifically पाण्याला वास नसतो पण मग algae चा असावा ) खरं सांगू अजिबात प्रसन्न नाही वाटलं. पण अमेरिकेत अत्यंत दुर्मिळ असणारी माणसांची वर्दळ मात्र इथे होती. सगळे एका दिशेने चालत होते. आम्ही पण सामानासकट त्यांच्या मागे गेलो. खळखळ वाहणारं पाणी, थोडा रुंदसा झरा दिसला. आम्ही त्याला follow करत निघालो. दोन चार मिनिटात बघतो तर काय समोर falls . नजरेला आठ-दहा माजली बिल्डिंग एवढा मोठा दिसत होता. खूप गर्दी गोळा झालेली, फोटो शुटिंग चाललेलं. "oohh ! हा नायगारा Falls !" मन थोडा खट्टू झालं. इतकं सगळं प्लांनिंग आणि खर्च करून आपण हे बघायला आलो. एवढ्या लोकांकडून एवढं कौतुक ऐकलं ते ह्याचं ?? मग एक पुसटशी आठवण आली, शाळेत मुलं खेळात होती तर मी एका अमेरिकन बाईशी गप्पा मारत होते विषय होते सुट्टीच प्लांनिंग etc . ती अमेरिकन लोकल म्हणजे "गोरी "( दचकू नका, इकडे सर्रास हा शब्द वापरतात (Desi लोकं (म्हणजे आपले Indians ) ) होती. "नायगारा फॉल्स" बघायला जाणार म्हंटल्यावर तिने खांदे उडवले "haven't heard about it " मी इन्सिस्ट केल खूप फेमस आहे, सगळे बघायला जातात तर तीने मला falls आणि river बघायची असेल तर कोलोरॅडोला जा असा सांगितलं. मी आपलं "ह्यांचं सगळं वेगळं असतं !" म्हणून सोडून दिलं. मन आता चुटपुटू लागलं ती बहुतेक खरं बोलत होती. उगाच आपल्याच सगळ्या इंडियन लोकांनी डोक्यावर नाही ना बसवलं ह्या नायगाराला ?
हॉटेल चेक इन करताना त्यांनी सांगितलं fireworks रात्री दहा ते अकरा मध्ये असेल. मंडळी दमली होती. पण मी मात्र हॉटेल अगदी समोरच असल्यामुळे कॅमेरा घेऊन निघाले. आता मगाचा साधासा उदास दिसणारा धबधबा वेगवेगळ्या रांगांमध्ये न्हाऊन निघाला होता. मिनिटामिनिटाने रंग बदलत होते . त्यातच fireworks सुरूझाले. हवेतला गारवा, विलोभनीय रंगात न्हाऊन निघालेला नायगारा, फटाक्यांची रोषणाई, आता मात्र त्या जादूने मनाचा ताबा घेतला. अधाशासारखी मी फोटो काढत होते, तो अनुभव कॅमेरात, मनात, डोळ्यात साठवत होते. नायगाराचे झगमगते रूप डोळे दिपवणारे होते.
सकाळी साधारण सात वाजता Maid Of Mist ची टिकेट्स काढायला नवरा गेला, मी आणि माझा मुलगा हॉटेलातून बाहेर पडलो रस्ता क्रॉस करून आम्ही फॉल जवळ आलो आणि समोर बघतो तर साक्षात इंद्रधनुष्य. काय करू आणि काय नाही असा होऊन गेल. दूरवर आकाशात पुसटस दिसणारं इंद्रधनुष्य बघून क्षणभर थांबून, हातातली काम थबकून त्याला न्याहाळत बसणारे आम्ही ! काही फुटांवर इतका सुस्पष्ट इंद्रधनुष्य दिसल्यावर अगदी अस्मान ठेंगणे झाले. आता मात्र नायगारा अंगात चढायला लागला. नायगारा falls हा तीन फॉल्स चा समूह आहे. अमेरिकन फॉल्स, हॉर्स शु फॉल्स आणि Bridal veil फॉल्स. तीन साडेतीन हजार फूट रुंद असा हा महाकाय धबधबा अमेरिका आणि कॅनडा बॉर्डरची शान वाढवतो. त्याचे पाणी अत्यंत प्रवाही असल्यामुळे पन्नासेक मीटर (१६० फूट ) उंचीचा धबधबा कित्येक मीटर उंचीपर्यंत पाण्याच्या तुषारांचा पडदा तयार करतो (मिस्ट). Maid Of Mist ची टूर म्हणजे तर विलक्षण अनुभव. बोटमध्ये बसून मिस्टच्या जवळ जायचं, ते तुषार अंगावर घ्यायचे, नायगाऱ्यात चिंब भिजून निघायचं !
तरंगतच काठावर आलो. अजूनही तुषार अंगावर पडतायतच , डोळे उघडून पहिला तर छोटी छोटी इंद्रधनुष्य सगळीकडेच दिसायला लागली. हा स्वर्ग तर नाही ! नवरा म्हणे मलाही तसाच दिसतंय ! पार वेडावून टाकल. सायन्स, लॉजिक गेल पार नायगाऱ्यात वाहून आणि आम्ही त्या स्वर्गमयी वातावरणात आकंठ बुडालो. लहानाहून लहान, तरुणांहून तरुण अक्षरशः बागडत होतो. मग Cave ऑफ Winds , trails वगैरे बघितलं. रात्रीच Lighting आणि fireworks परत त्याच नवलाईने अनुभवले. अमेरिकन साइडला नायगारा आणि Rainbow ब्रिज च्या पलीकडे कॅनडाची टोरोन्टो सिटी. अमेरिकन साईडवरून फॉल्स अनुभवायला मिळतो तर कॅनडाच्या साईडने त्याचे चांगले दर्शन होते, आणि हो इंद्रधनुष्यही अगदी २७० ते ३६० डीग्री पर्यंत दिसते.
Visa सारख्या किरकोळ (?) कारणांनी आम्हाला आता जरी त्या अनुभवाला वंचित केले असले तरी नायगारा सोडले ते पुढची फेरी कॅनडाचा Visa घेऊन समोरच्या हॉटेल मधून रात्रीचं fireworks बघायचं ह्या निश्चयाने !
नायगारा फॉल्स !
Submitted by छन्दिफन्दि on 30 August, 2022 - 18:56
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलय.
छान लिहिलय.
उत्तम लिहिलंय.
उत्तम लिहिलंय.
नायगारा फॉल्स जवळ (साधारण ३-३.५ मैलावर) डेव्हील्स होल नावाची एक जागा आहे.
ती आम्हाला (मी आणि माझी अर्धांगिनी) जास्त सुंदर वाटली. पुढच्यावेळी संधी मिळाली तर तिकडे जाण्यासाठी खास वेळ ठेवा.
आणि अमेरिकन मुलगी म्हणाली ते १००% खरं आहे.
बाकी अमेरिका सुंदर आहेच पण कोलोरॅडो अप्रतिमेतेचा कळस आहे.
प्रत्येक प्रकारचं सौंदर्य कोलोरॅडोमध्ये भरभरून आहे. नद्या, डोंगर, बर्फ, उन्हाळा, वाळवंट, तळी / जलाशय, प्राणिजीवन या सगळ्याचा अप्रतिम असा संगम कोलोरॅडो मध्ये आढळतो.
अमेरिकन आदिवासींनी डोंगरात बांधलेली घर, (मोनेटाऊ ड्वेलिंग्स), गार्डन ऑफ गॉड्स सारखी नैसर्गिकरित्या बनलेली आश्चर्यकारक रचना,
कोलोरॅडो नदीने वर्षानुवर्षे खरवडून काढलेल्या दऱ्या ( ग्रँड कानयन, या कोलोरॅडोत नाहीत, पण जवळच आहेत). रॉकी माउंटन नॅशनल पार्क,
बोल्डर, फोर्ट कॉलिन्स सारखी निसर्ग सौंदर्यानं नटलेली शहर, हँगिंग लेक, मरून लेक च स्वर्गीय सौंदर्य जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे.
या शिवाय साधारण १० -१२ तासांच्या अंतरावर असलेलं यलो स्टोन नॅशनल पार्क, त्यातले ज्वालामुखी, धबधबे आणि प्राणिजीवन, २ आठवड्याची सहल कमीत कमी लागेल. अवश्य जा.
"नायगारा फॉल्स" बघायला जाणार
"नायगारा फॉल्स" बघायला जाणार म्हंटल्यावर तिने खांदे उडवले "haven't heard about it " मी इन्सिस्ट केल खूप फेमस आहे,>>>
नायग्रा फॉल्स किंवा नायाग्रा फॉल्स. नायगारा म्हटल्यावर कळाल नसेल कदाचीत.
कोलोरॅडो अप्रतिमेतेचा कळस आहे
कोलोरॅडो अप्रतिमेतेचा कळस आहे.
येल्लोस्टोन - एम आय इन्व्हिसिबल टू यु?
नायग्रा फॉल्स किंवा नायाग्रा फॉल्स. नायगारा म्हटल्यावर कळाल नसेल कदाचीत.
>>> + 1
काही देशी लोक शिकागो ला चिकागो पण म्हणतात आणि कळत नाही इकडे लोकांना...
"oohh ! हा नायगारा Falls !"
"oohh ! हा नायगारा Falls !" मन थोडा खट्टू झालं. >> सेम. मला पण विशेष काहि वाटला नाही. किरकोळ उंचीचा असल्यामूळे कदाचीत.
"oohh ! हा नायगारा Falls !"
"oohh ! हा नायगारा Falls !" मन थोडा खट्टू झालं. >> सेम. मला पण विशेष काहि वाटला नाही. किरकोळ उंचीचा असल्यामूळे कदाचीत.<<<<<
असं मला सुरुवातीला वाटलं पण नंतर मी त्याच्या प्रेमातच पडले