बालगोपाळांनो, बालपणी मनोरंजनाच्या विश्वात आपण सर्वात जास्त समृद्ध झालो ते म्हणजे कार्टून फिल्म्सनी .जुन्या काळापासून चालू असलेली टॉम आणि जेरी ची खट्याळ जोडी , मिकी माउस , डोनाल्ड डक असे गमतीशीर कॅरॅक्टर , सुपरमॅन, स्पायडरमॅन असे सुपर हिरो ते आज कालचे पेपा पिग , डोरेमॉन , मोटू पतलू, छोटा भीम असे मजेशीर कार्टून फिल्म्सनी आपल्याला निखळ आनंद दिलाय. मोठे झालात तरीही तुम्ही त्यांना विसरणार नाहीत. यातील एखाद्या कॅरॅक्टरने तुमच्या मनावर नक्कीच छाप टाकली असेल. तर घ्या, पेन्सिल आणि रंग आणि उतरावा तुमच्या मनातील कार्टून कॅरॅक्टर कागदावर.
नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) प्रवेशिकेला "कार्टून कॅरॅक्टर." - मायबोली आयडी - छोट्या दोस्तांचे नाव. अशा प्रकारे शीर्षक द्यावे.
३) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
४) वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
५) चित्र स्वतः काढून रंगवलेले असावे. रंग कोणतेही वापरा.
६) चित्रं गणेश चतुर्थीपासून, ३१ ऑगस्ट २०२२ (भारतीय प्रमाण वेळ) ते ९ सप्टेंबर २०२२ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
७) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२२" अशी शब्दखूण द्यावी
छोट्या दोस्त मंडळींनो, लवकरात लवकर पाठवा तुम्ही काढलेली छान छान चित्र ?
!!! गणपती बाप्पा मोरया !!!