स्वप्नपूर्ती ...पुस्तक प्रकाशन ...मोहर

Submitted by मनीमोहोर on 10 August, 2022 - 11:43

जगातल्या अगदी प्रत्येक माणसाचे आपल्या मूळ गावावर अतोनात प्रेम असते. पण कोकणातल्या निसर्ग सौंदर्यामुळे, तिथल्या अनोख्या सणवार आणि उत्सवांमुळे, कोंड्याचा मांडा करण्याची जादू असलेल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीमुळे असेल पण फारशी आर्थिक सुबत्ता नसून ही कोकणातल्या माणसाचे आपल्या गावावर जरा काकणभर अधिकच प्रेम असत असं मला वाटत. कोकणातला माणूस पोटापाण्याच्या उद्योगासाठी जगाच्या पाठीवर कुठेही ही असला तरी मनाने तो कायम कोकणातच असतो. म्हणूनच गाव सोडून तीस चाळीस वर्षे दुसरीकडे राहिलेल्या माणसाला जरी गाव कोणत तुमचं असा प्रश्न केला तर क्षणाचा ही विलंब न लावता तो कोकणातल्या कोणत्यातरी खेडेगावाच नाव अगदी अभिमानाने सांगतो.

कोकणातल्या आमच्या खेड्यावर , तिथल्या आमच्या घरावर आम्हा सगळ्यांच ही असंच खूप प्रेम . त्या प्रेमाची तुलना फक्त आईच्या अपत्य प्रेमाशी होऊ शकेल इतकं. आईला जसं आपल्या बाळाचं कौतुक सगळ्यानी करावं असं वाटतं अगदी तशीच भावना आहे आमची गावाबद्दल आणि तिथल्या घराबद्दल.

काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत ‘ घर कौलारू ‘ नावाचं गावाकडच्या घराचं वर्णन करणारं एक सदर दर शनिवारी प्रसिद्ध होत असे. आपण पण आपल्या घरावर त्यात लिहावं अस मला फार वाटे. पण हे जमायचं कसं ? पेपरमध्ये लिहायचं तर त्याना लिखाण आवडायला हवं, मग ते प्रसिद्ध करणार. तसेच दहा पंधरा वर्षापूर्वी सगळं हातानीच लिहावं लागत असे . ते ही कठीण वाटत होतं. ह्या सगळ्या मुळे आमच्या घरावर काही लिहायची आणि ते लोकांपर्यंत पोचवण्याची माझी अंतरीची उर्मी मात्र मनातल्या मनातच राहत होती. प्रत्यक्षात येत नव्हती.

पण मायबोलीने ही माझी इच्छा पूर्ण केली. मायबोलीवर आमच्या कोकणातल्या घर, परिसर, झाडं, फळं फुलं, खाद्य संस्कृती माणसं, सणवार ह्यावर मी अनेक लेख मायबोलीवर लिहिले आहेत. आज त्या लेखांच (अनघा प्रकाशन , ठाणे ) पुस्तक प्रसिद्ध करत आहे ह्याचा मला खूप आनन्द होत आहे. आता हे सगळे लेख पुस्तक रुपात सलग आणि एकत्र राहतील. ह्याच सगळं श्रेय मी मायबोलीला देतेय. मायबोली नसती तर हे घडण अशक्य होतं. ह्यासाठी मायबोली प्रशासन आणि मायबोली वाचक दोघांना ही खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रोत्साहनामुळेच मी हे माझं स्वप्न साकार करू शकले.

IMG-20220809-WA0007.jpg

मी बघतेय तेव्हा पासून तिकडच्या जीवन शैलीत ही खूप बदल झाले आहेत आणि ते होणारच. आमचा नॉस्टॅल्जीया म्हणून तिकडे आमच्या मुलींनी चूल फुंकावी आणि पाणी शेंदावे असे मला अजिबात वाटत नाही. पण माझ्या लिखाणात अनेक जुने संदर्भ आले आहेत ज्याचा पूर्वी कोकणातली जीवनशैली कशी होती हे समजण्यासाठी उपयोग होईल अशी मी आशा करते. असो.

पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद ...कोकणावर आपलं सगळ्यांच असच प्रेम राहु दे .

पुस्तक मिळण्या बाबत प्रकाशकांचा मेसेज.

1)मॅजेस्टिक बुक डेपो,ठाणे (प .)
2)मॅजेस्टिक बुक एजन्सी, शिवाजी मंदिर,दादर (प.)
3)आयडीयल पुस्तक त्रिवेणी, दादर (प.)
4)मॅजेस्टिक बुक डेपो, गिरगांव.
5)मॅजेस्टिक बुक एजन्सी, विलेपार्ले (पूर्व).
6)मॅजेस्टिक बुक,डोंबिवली (पु).
7)मुद्रा बुक डेपो,विरार (प)
8)रसिक साहित्य प्रा. लि., पुणे.
9)पाटील इंटरप्रायजेस,पुणे.
10)मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे.
11)पुस्तक पेठ,पुणे.
12)मेहता पब्लिशिंग हाऊस, कोल्हापूर.
13)श्रीज्योती स्टोअर,नाशिक.
14)ज्योती स्टोअर,नाशिक.
15)पुस्तक पेठ,नाशिक.
या ठिकाणी उपलब्ध आहे.तसेच औरंगाबाद, कणकवली, नांदेड, परभणी, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, नागपूर, कोल्हापूर, नागपूर येथे देखील वरील पुस्तक उपलब्ध आहे.
तसेच खालील वेबसाईटवर देखील हे पुस्तक उपलब्ध होईल.
1.www.marathisrushti.com
2.www.anaghaprakashan.com
3.www.bookganga@myvishwa.com
4.www.sangank.in तसेच ऍमेझॉन व फ्लिपकार्ट वर देखील पुस्तक उपलब्ध आहे.
वरील ठिकाणी पुस्तक न मिळाल्यास श्री.अमोल नाले संपर्क क्र.९७६९६०३२३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Gpay नंबर ७६७८०५६५०६
या नंबरवर पेमेंट केल्यास पुस्तक स्पीड पोस्टने पाठवले जाईल.सदर पुस्तक आमच्या प्रकाशनाकडून मागवले गेले तर त्यावर १०%सूट व फ्री पोस्टेज दिले जाईल.तसेच जास्त प्रतिची मागणी (१०पेक्षा जास्त प्रती) असेल तर पोस्टेजचा खर्च आकारण्यात येणार नाही.

ही अमेझॉन ची लिंक आहे.
https://amzn.eu/d/bO5IG1j

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुंदर.
माबोपल्याड, आपली ओळख तशी नाही तरी कधीकधी तुमच्या फेसबुक पानावर मी रेंगाळते बरं का Happy फुले, पदार्थ, वेणी-गजरे इतकं निगुतीने केलेलं असतं ना. एकदम प्रसन्न वाटते. पुस्तक प्रकाशनानिमित्त आपले अभिनंदन.

मनापासून अभिनंदन.
कोंकण हा विषय इतका मोठा आहे की त्याने पेंडसे, दांडेकर, दळवी, पुलं, अशा अनेकांच्या प्रतिभेला खाद्य पुरवले आहे आणि अनेकांच्या कल्पनाशक्तीला तो पुरून उरला आहे .
आपणही अधिक लिहीत राहावे.

किती छान! हार्दिक अभिनंदन! तुमचे कोकणावरचे लेख संग्राह्यच आहेत त्यामुळे पुस्तक केलंत ते छानच झालं! अनुक्रमणिकेचा फोटो टाकता येईल का? म्हणजे चालेल का?
मुखपृष्ठ सुंदर आहे.

मनीमोहर, तुझे सर्वच लेख फार आवडते आहेत. आता ते पुस्तकरूपात एकत्र आले आहेत यासाठी तुझं अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा.

अरे वाह मस्त.. अभिनंदन आणि शुभेच्छा ममोताई. तसे तुमचे लेख सर्वांनाच आवडतात पण कोकणातल्यांना नेहमीच नॉस्टेल्जिक करून जातात Happy

अभिनंदन हेमाताई. मुखपृष्ठ खूप सुंदर झालंय. यंदाच्या भारत वारीत घेण्याच्या पुस्तकांच्या यादीत अजून एक पुस्तक ऍड झाले.

अभिनंदन!!!

तुमचे लेख आवडतातच. तुमचं कोकण प्रेम अगदी जाणवतं.

पुस्तकाबद्दल मनापासून अभिनंदन!
वाटच पाहात होतो ह्याची.

पुस्तक कसे मिळवता / विकत घेता येईल ह्याचीही माहिती द्याल तर बरे होईल.

खूप दिवसांनी आलो माबोवर त्याचे चीज झाले.

अभिनंदन हेमाताई !! मुखपृष्ठ बघूनच तुमचा आठवणींचा मोहर किती छान असेल ते जाणवतेय . पुस्तक घ्यायचे असेल तर कसे घेता येईल ?

अभिनंदन हेमाताई !!
तुमच्या प्रतिभेचा मोहर असाच दिवसेंदिवस बहरूदे . पुस्तकाचे नाव आवडले.

Pages