Submitted by BLACKCAT on 20 July, 2022 - 23:54
ठेचिले अनंते - मिरच्यांच्या ठेच्याचे प्रकार
बेसिक ठेचा
मिरची लसूण मीठ थोडे परतून भरडणे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओल्या शेंगांचे दाणे, मिरची,
ओल्या शेंगांचे दाणे, मिरची, लसुन, जिरे ठेचायचे. मग तव्यावर तेलावर खरपुस परतायचे.
मिरची, लसूण, बचकभर कोथिंबीर,
मिरची, लसूण, बचकभर कोथिंबीर, मीठ. ठेचा हवं तेव्हढं
आताच दोन दिवसापुर्वी एक
आताच दोन दिवसापुर्वी एक वेगळाच ठेचा खाल्ला.
लसुण पात+ त्या खालचा कोवळा लसुण + मिरची + भाजलेले जिरे + मीठ बस्स एवढंच. पण बेफाट टेस्टी प्रकरण होतं.
हिरव्या मिरच्या उकडून
हिरव्या मिरच्या उकडून घ्यायच्या .हाताने कुस्करून त्यात मीठ , लिंबू रस घालायचे . नंतर मोहरी , जिरे , हिंग , हळद ची फोडणी द्यायची . भाकरी बरोबर छान लागते . बाबांचा खास संगमनेरी पदार्थ !!
हा आमच्या अहोंचा फेवरिट होता
हा आमच्या अहोंचा फेवरिट होता. य वेळा केला आहे २० वर्शांपूर्वी. गॅस वर मिरच्या भाजून घेणे. भाजलेले शेंगदाणॅ, ह्या मिरच्या, जिरे खलबत्त्यात कुटुन घेणे. थोडीशीच कोथिंबीर पण घाल णे. मग ह्यात एक चमचा सायीचे दही घालायचे.
गरम पोळी, बटाट्याची काचर्या भाजी बरोबर मस्त लागतो. ब्रेफा किंवा लंच.
माझा एक बोगस ठेचा: तूप एक
माझा एक बोगस ठेचा: तूप एक चमचा गरम करुन घेणे, त्यात लाल तिखट व कोथिंबीर जिरे घालायचे. गार झाल्यावर मीठ व लिंबूरस हवे असल्यास लिंबा ऐवजी दही.
बाकी ते लसूण मिरची को. मीठ अनेक वेळा केले जाते.
ठेच्यात दहि???
ठेच्यात दहि???
वर्हाडी ठेचा- भाजलेले शेंगदाणे, भाजलेल्या मिरच्या, कच्चा लसूण, कोथिंबीर, मीठ, जरासे तेल भरडून!
मला पण ठेच्यांचे प्रकार खूप
मला पण ठेच्यांचे प्रकार खूप आवडतात.पण कधीच केले नाहीत. या धाग्यावर चे करून पाहिन आता एकेक.
ठेच्यात दही , तूप घातले की
ठेच्यात दही , तूप घातले की तिखटपणा कमी होतो
दही ठेचा कांदा मिक्स केला की ते मिश्रण कोशिंबिरीइतके
जास्त प्रमाणात खाऊ शकतो
वारकरी मंडळी वाटेत थांबल्यावर
वारकरी मंडळी वाटेत थांबल्यावर झाडाखाली करतात. तोच ना?
माबोवार कुणी फिरकतं कि नाही
माबोवार कुणी फिरकतं कि नाही असे वाटत असताना एखादा रेसिपीचा धागा आला कि धडाधड प्रतिसाद येऊ लागतात.
भेंडी व मिरची थोडी फ्राय करून
भेंडी व मिरची थोडी फ्राय करून , ती वाटून भेंडीचा ठेचा करतात म्हणे
अंबाडीचा ठेचा gongura pickles म्हणून विकतात
शेजवान चटणी हाही एक ठेचाच आहे
शेंगदाण्याची चटणी मिक्सरमधे
शेंगदाण्याची चटणी मिक्सरमधे बारीक केलेली (लाल) आणि भाजलेले शेंगदाणे ठेचून त्यात मिर्च्या, तिखट, मीठ घालून बनवलेला खर्डा कसे बनवतात ते पण सांगा कुणीतरी. मी एकदा गावाकडून आलेल्या एका नातेवाईकाचा डबा खाल्ला होता. त्यात भाकरी आणि शेंगदाण्याचा खर्डा (चटणी ) होती. फार भारी टेस्ट होती. सोबत कांदा बुक्कीत फोडून खा म्हणाला. तेव्हढं जमलं नाही.
आमच्या ऑफिसच्या प्यूनने
आमच्या ऑफिसच्या प्यूनने सांगितलेली रेसिपी:
हिरव्या मिरच्या, लसूण तव्यावर ठेवायचे, जाड मीठ टाकायचे. वरती चमचाभर तेल टाकायचे. वरून एक भांडे उपडे मारायचे. चर्र आवाजात मिरच्या छान भाजल्या गेल्या की थंड करून मिक्सरला जाडेभरडे काढायचे. कोथिंबीर कालवायची .
दुसरा एक प्यून लाल मिरचीचा ठेचा आणतो, त्याच्या डब्यावर सगळे टपलेले असतात.
काही विशेष नाही, त्याची बायको लाल पिकलेल्या मिरच्या (न भाजताच), लसूण अन् नेहमी घालतो त्यापेक्षा थोड जास्तच मीठ ..असे मिक्सरला लावते. बाकी काही फाफट पसारा नाही. पण अप्रतिम लागतो. अर्थात झणझणित असतो. अन् तोंडात चव बराच वेळ रेंगाळत राहते.
आमची आई पूर्वी खुडमिरचीचा
आमची आई पूर्वी खुडमिरचीचा ठेचा करायची.
सुकी लाल मिरची, पाण्यात कुस्करायची. ताटलीलाच लसूण भराभर कापायचे. थोडेसे तेल, अन् मीठ..
हे सगळ बाजरीच्या शिळ्या भाकरीबरोबर खायचं.
वर लसणाची पात वाचून आठवले.
कच्ची कांदापात चिरून , खुडलेली मेथीची पाने , पालकाची पाने चिरून , धुवून.. लाल चटणी , मीठ, तेल घालून भाकरी बरोबर खातो आम्ही.
भेंडी व मिरची थोडी फ्राय करून
भेंडी व मिरची थोडी फ्राय करून , ती वाटून भेंडीचा ठेचा करतात म्हणे>>> असाच गावरान गवारीचा करतात
मिरच्या गॅसवर भाजून घेऊन मीठ
मिरच्या गॅसवर भाजून घेऊन मीठ घालून वाटीत कुटायच्या. वरुन थोडी कोथिंबीर आणि हिंग. आणि त्यात तिखटपणा कमी होईल इतपतच दही. तोंडीलावणं म्हणून कशाहीबरोबर चांगलं लागतं. मुडाखिबरोबर वगैरे बेस्ट लागतं.
एक आहे
एक आहे
https://www.maayboli.com/node/16449
वा! मस्त धागा! जुना धागा पण
वा! मस्त धागा! जुना धागा पण वाचायला पाहिजे!
वरील बहुतेक प्रकार केले आहेत, करतो. अजून एक करतात. लाल ओल्या मिरच्या बाजारात मिळतात त्या मुठभर, लसुण आवडी प्रमाणे आणि मीठ. मिरच्या भाजून, लसूण आणि खडे मीठ घालून बारीक करायचे आणि वरुन लिंबाचा रस घालून एकजीव करायचे. मस्त लागतो.
ठेचा करताना जाणवले की खडे मीठ एक वेगळी चव देते त्यामुळे शक्य असल्यास खडे मीठच वापरते.
<<ठेचा करताना जाणवले की खडे
<<ठेचा करताना जाणवले की खडे मीठ एक वेगळी चव देते त्यामुळे शक्य असल्यास खडे मीठच वापरते<<
Exactly.
आम्ही तर रोजच्या वापराला पण खडे मीठ वापरतो.
हो
हो
पूर्वीचे लोक खडे मिठच वापरायचे , भले त्याला पाणी सुटू दे.
आयोडीन नमकने खडा मीठ बंद पडले
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/57054
खूप दिवसांत केला न्हवता. हा
खूप दिवसांत केला न्हवता. हा धागा बघुन कामं सोडून आधी मिरची, लसून, जिरं, मीठ, कोथिंबीर आणि आज कच्चे दाणे घालून ठेचा केला. आता कधी एकदा जेवतोय असं झालंय. भाकरी करणं भाग झालंय आता.
छान कलेक्शन झालेय ठेच्यांचे.
छान कलेक्शन झालेय ठेच्यांचे. मला ही दही घालूनच ठेचा खाता येतो. चुलीवरच्या गरम गरम भाकरी, पळीवाढ पिठलं , कांदा, ठेचा आणि दही. जोडीला उतरलेले ढग, रिमझिम पाऊस आणि गारठा म्हणजे स्वर्गसुख. परवाच पन्हाळ्याला अनुभवून आलेय.
धाग्याचे शीर्षक आवडलं.
मी पण न रहावून ठेचा केला.
मी पण न रहावून ठेचा केला. हिरव्या मिरच्या भाजून, जिरं, थोडं ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ, दोन लसूण पाकळ्या सुरीच्या टोकावर टोचून एक थेंब तेल लावून थेट गॅसवर भाजून असं सगळं ठेचलं.
आता हापिसात डेस्क वर नेऊन ठेवता येईल असा ४-५ दिवस टिकाऊ ठेचा सुचवा. मला हा सुचलाय- लाल सुक्या मिरच्या भाजून (तिखट जास्त झेपत नाही), सुकं खोबरं तेलावर परतून , त्याच तेलावर आधी लसूण आणि मग जिरं हलकं परतून एकत्र ठेचून घेणे. टिकेल का पावसाळी हवेत?
तीळ. मिरच्या + लसूण + तीळ
तीळ. मिरच्या + लसूण + तीळ इलुश्या तेलावर परतून.
असतील तेव्हा दोडक्याच्या सालीही त्यात.
दोडक्याच्या सालींची शेंगदाणे,
दोडक्याच्या सालींची शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, तीळ आणि सुकं खोबरं वगैरे घालून परतून चटणी आहे केलेली परवाच. पण हापिसात सगळे एकत्र बसून जेवताना तो ठेच्याचा झणका सगळ्यांना हवासा वाटतो.
एकेक प्रकार सॉलिड.
एकेक प्रकार सॉलिड.
मिरच्या भाजून करतात त्या प्रकाराला आमच्याकडे तिखटी म्हणतात. झटपट तोंडीलावणे प्रकारात तिखटी येईल. मिरची भाजायची, मीठाबरोबर चुरडायची आणि दही घालायचं त्यात, इतकंच करतात आमच्याकडे. मी थोडी कोथिंबीर मिक्स करते.
बाकी मी बरेचदा आलं, लसूण, मिरची, कढीलिंब, कोथिंबीर ठेचा करून ठेवते. उपास तापास असतील तेव्हा हाच ठेचा लसूण वगळून करते. कोथिंबीर चालते आमच्याकडे उपासाला.
धाग्याचे शीर्षक कल्पक - फार
धाग्याचे शीर्षक कल्पक - फार आवडले !
रेसिपीज पण छान आहेत, आम्ही जहाल गटात
बरं...ऐकलेली माहिती सांगते.
बरं...ऐकलेली माहिती सांगते.
दह्यानं मिरचीचं तिखट वाढतं पण तेलानं ते कमी होतं म्हणून ठेच्यामधे तेल घालतात.
मला एक मिरचीचं टिकमिकलं म्हणून प्रकार माहीत आहे. फार भारी लागतं ते.
चार पाच पोपटी मिरच्या गॅसवर काळ्या होईतोवर भाजून त्या पोळपाटावर ठेवून वाटीनं खरंगटून मग त्या वाटीत काढून घ्यायच्या. कच्चा लसूण, चारपाच पाकळ्या, त्याच वाटीच्या कडेनी चिरून त्यात घालायचा. वरून अंगासरशी कवडीदार दही, साखर, मिठ आणि हिंग घालायचं, सारखं करायचं की झालं.
खूप टेस्टी प्रकरण असतं. हा ठेचा नाही. मिरच्या पण कमी तिखट. साखर पण आहे त्यामुळे ठेचा झेपत नाही अशांसाठी तोंडाला चव आणणारा पदार्ध आहे.
मिरच्या भाजून करतात त्या
मिरच्या भाजून करतात त्या प्रकाराला आमच्याकडे तिखटी म्हणतात .. >>यावरून आठवले, अजून एक करता येइल उडदाचा पापड भाजायचा मग चुरायचा, त्यात तिखट, मसाले, मीठ आवडेल तसे मिक्स करायचे आणि वरून कच्चे तेल.. मस्त लागते. याला काय म्हणतात ते मात्र माहित नाही
रच्याकने, असाच काही कोशिंबीरींचा धागा आहे का?
पापडाचा खुडा म्हणतात त्याला.
पापडाचा खुडा म्हणतात त्याला.
पापडचुरा मस्त लागतो
पापडचुरा मस्त लागतो
ठेचा पराठा नावाचा प्रकार
ठेचा पराठा नावाचा प्रकार नुकताच चाखला
मस्त होता
हल्लीच इन्स्टाग्रामवर ह्याची
ही कुठल्याही प्रकारची जाहिरात नाही हे स्पष्टीकरण इथे आधीच देतो आहे
हल्लीच इन्स्टाग्रामवर ह्याची जाहिरात बघितली, कोणी टेस्ट केलाय का ? बेकन बिट्स इन्फ्युज्ड ठेचा, हा बेकन ठेचा वरील प्रमाणे हिरवा अन लाल अश्या दोन्ही प्रकारात मिळतो (म्हणे)
ठेचा फॅन नाही मी... पण
ठेचा फॅन नाही मी... पण धाग्याचे नाव आवडले म्हणून मुद्दाम सांगायला आले.
रंजका : लाल मिरच्या (ब्याडगी
रंजका : लाल मिरच्या (ब्याडगी आणि देशी मिक्स) वाटुन त्यात चिंचेचा कोळ, गुळ घालुन करतात. आत्या अजुनही कधी कधी मिक्सर न वापरता खलबत्त्यात कुटुन करते. थोडा पातळसर असतो. २-३ महिने फ्रीजमध्ये टिकतो. फार सुरेख लागतो. ब्याडगी मिरच्या जास्त असतील तर एकदम तिखट नाही होत. सोसेल त्याप्रमाणे देशी मिरच्या अॅड करायच्या.
शिजवलेल्या कोरटी/तीळातल्टी/जवसातल्या मिरच्या : ठेचा नाही म्हणता येणार. मिरच्या उभ्या अर्ध्या चिरून तेलावर परतायच्या. त्यात कोरट्याची पावडर (जवस/तीळ पण चालते. पण कोर्ट्याची चव फार सुंदर लागते.),गुळ,चिंचेचा कोळ इत्यादी घालून वाफेवर शिजवायच्या.
सीमा,कोरटे म्हणजे कारळं का?
सीमा,कोरटे म्हणजे कारळं का?
यु ट्यूबवर कोरटे =कारळे
यु ट्यूबवर कोरटे =कारळे
https://youtu.be/wXBsdt_xu9A
मधू मागशी माझ्या सख्या परी
यात आहे,
देवपूजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशीतरी
ते हेच का?
नाही हो. कोरांटी फुलझाड आहे.
नाही हो. कोरांटी फुलझाड आहे. काही वास नसलेली/ चांगला वास नसलेली फुलं.
देवपुजेला काही दुसरं नसुन कोरांटीच आहे, जी फार कष्ट न करता वाढते... तर ती पण कशीतरी तग धरुन जगत्येय. असं काही असावं.
हो तोच अर्थ आहे
हो तोच अर्थ आहे
मला वाटत होते त्याच्याच बिया खातात की काय
ओह ओके. ते काय माहित नाही.
ओह ओके. ते काय माहित नाही.
" माझ्याकडे आता काहीच उरलं
" माझ्याकडे आता काहीच उरलं नाही : ' नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी. देवपूजेस्तव ही कोरांटी, बाळगी अंगणी कशीतरी "
कोरांटी खास निगेशिवाय वाढते, फुले देते. पण कवीने ती अंगणात कशीबशी बाळगली आहे. ज्या कोरांटीला जगविण्यासाठी काहीच कष्ट करावे लागत नाहीत ती, कवी कशी तरी जेमतेम वाढवतोय. म्हणजे तेवढेही श्रम त्याला झेपत नाहीत इतका तो अगतिक आणि हतबल झाला आहे.
शिवाय, हे एक रूपक आहे. सुंदर सुवासिक फुले देणारे वृक्ष आणि वेली त्याच्याकडे उरलेले नाहीत. चांगल्या कविता प्रसवणारे कवित्व उरले नाही. कशीबशी उरली आहे काटे कोरांटीच्या फुलांसारखी रुक्ष, अर्थहीन, भावहीन, ओबड धोबड कविता.
हो. कोरटे म्हणजे कारळे. सॉरी
हो. कोरटे म्हणजे कारळे. सॉरी कारळं लिहायच लक्षात आल नाही.
शेताच्या बांधावर एखादी ओळ पेरतात आमच्याकडे.
कोरांटी वेगळी.
कोरांटी वेगळी.
मधु मागशी माझ्या सख्या परी ,
मधु मागशी माझ्या सख्या परी
मधु घटची रिकामे पडते घरी
ही भा रा तांबे यांनी अखेरची कविता. त्याना टीबी झाला व अखेर त्यांनी कविता लेखन सोडून दिले होते.
त्यांच्या एका चाहत्याने त्यांना पत्र लिहून विचारले की हल्ली नवीन कविता वगैरे लिहीत नाही का ?
त्याला उत्तर म्हणून त्यांनी ही कविता लिहिली व त्यानंतर ते वारले म्हणे.
पण ही कविता 1933 ची , ते वारले 1942 साली. यात कितपत सत्य असेल ? किंवा कविता पूर्वीपासून असेलही आणि शेवटी पत्राला उत्तर म्हणून पुन्हा त्यांनी ती वापरली असेल.
http://www.misalpav.com/node/435
... नैवेद्याची एकच वाटी...
... नैवेद्याची एकच वाटी...
मिरची आणि ठेचा या धाग्यावर असले काही गोड वाचायला मिळेल असे वाटले नव्हते.
कोरांटी ची फुले हे प्रतीक फार सुंदर वापरले आहे, उलगडून दाखवल्याबद्दल आभार @ हिरा.
कोरांटी : पूर्ण नाव काटे
कोरांटी : पूर्ण नाव काटे-कोरांटी आहे.
लेखाचे नाव भारीच आहे
लेखाचे नाव भारीच आहे
अवांतरः मिसळ पाव ची एक लिंक दिलीच आहे आणि काटे कोरंटी चा विषय निघालाच आहे तर लगे हाथ मिपा वरची रामदास यांची काटे कोरंटी ची फुले पण वाचून घ्या,खूप छान लेख आहे,(फुलांबद्दल नाही)
काटेकोरांटीची फुलं.
काटेकोरांटीची फुलं.
Pages