Submitted by हरचंद पालव on 10 July, 2022 - 00:54
चला पंढरीला जाऊ
पांडुरंग डोळां पाहू,
विठूराय डोळां पाहू ||
गाऊ चंद्रभागातीरी
टाळ-मृदुंग गजरी ||
संत-सज्जनांचा मेळा
थोर आनंद सोहळा ||
पहा पहा आला क्षण
देत विठूराय दर्शन ||
तोचि पुण्यपर्वकाळ
घोष विठूनामावळ ||
शीण जन्मांतरिचा जाई
भक्त-भाव एकचि होई ||
काहि नुरे मी-तू-पण
होय विठूमय मन ||
विठूनामाचाचि ध्यास
विठू भारे अवघा श्वास ||
बाह्य देह पंढरपुर,
पांडुरंग अभ्यंतर ||
म्हणे हर्पा, करितो वारी -
कल्पनेने घेत भरारी ||
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर व समयोचित !
सुंदर व समयोचित !
ही भक्ती भावाची भरारी
ही भक्तीभावाची भरारी
कल्पांता लिलया पार करी...
रामकृष्ण हरी....
खूप सुरेख..
छान कविता.
छान कविता.
हबाच्या अशा कवितांची आठवण झाली.
धन्यवाद, डॉ कुमार, दत्तात्रय
धन्यवाद, डॉ कुमार, दत्तात्रय साळुंके आणि शांप्रा.
शांप्रा, हबा म्हणजे कोण?