केविन कार्टर--(वीक एंड लिखाण)

Submitted by निशिकांत on 9 July, 2022 - 09:47

आज जरा वेगळा विषय या स्तंभाखाली हताळावा असे मनात आले. दर वेळेस माझ्या कविता आणि  गझलेच्या अनुषंगाने मी कांही लिहित असतो. अनेक रचनांच्या मागे कवीची कांही तात्कालीन भूमिका असते ज्याचा मी या लिखाणातून परामर्श घेतो. हे लेखन जवळ जवळ दोन वर्षापासून चालू आहे. का माहीत नाही पण आज थोड्या वेगळ्या वाटेने जावयाची उर्मी आली आणि विषय निवडीसाठी विचारचक्र सुरू झाले.
आज मी एका आवलिया व्यक्तीमत्वाबद्दल लिहिणार आहे.  हा मनुष्य जोहन्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेचा होता ज्याचे नाव केविन कार्टर असे होते. त्याचा जन्म १३-०९-१९६० रोजी झाला. तो जरी गोर्‍या कुटुंबात जन्मला होता, या देशात या वेळेस काळ्या लोकावर खूप अन्याय होत असत. अमानुषपणे शोषण होत असे. केविन स्वतः गौरवर्णीय असूनही त्याला या अन्यायाची खूप चीड होती.त्याने छंद म्हणून फोटोग्राफीचा  छंद जोपासला होता आणि या व्यवसायात त्याने चांगलेच नाव कमावले होते. त्याने केलेली फोटोग्राफी पुढे खूप नावारुपाला आली. काढलेल्या फोटोंना खूप न्यूज व्हॅल्यू असल्याने या व्यवसायास फोटो जर्नॅलिजम असे म्हणतात.
तिकडे दरवर्षी एक प्रदर्शन भरवले  जात असे. यात मोठे मोठे कलाकार भाग घेत असत.  एके वर्षी केविनने काढलेले एक चित्र यात ठेवण्यात आले. ते चित्र हे अतिशय भेदक, मन हेलावून टाकणारे असे होते. त्याने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. हे चित्र शक्य झाल्यास शेवटी देण्याचा प्रयत्न करतोय. पण शक्य न झाल्यास म्हणून या चित्राबद्दल थोडी माहिती देत आहे. हे चित्र सुदान या कमालीच्या दुष्काळी मागास भागातील आहे. यात एक आफ्रिकन भुकेजलेली कुपोषित मुलगी एका विरान भागात खाली वाकून जमिनीवर डोके टेकून बसलेली आहे. अगदी थकलेली, मरगळलेली.  तिच्या पासून दहा पंधरा फुटावर मागे एक गिधाड बसलेले आहे. असे वाटते की ते गिधाड ती मुलगी मरण्याची वाट बघत आहे तिच्यावर झडप मारण्यासाठी.
या परिणामकारी आणि बोलक्या चित्रासाठी केविन कार्टरला त्या वर्षीचे प्रेस्टिजियस रशियन पुलित्झर बक्षीस मिळाले. हे बक्षीस देणारी संस्था ज्यांनी सामाजिक, औषधी, आणि वातावरणा बद्दल काम करणार्‍या कलावंतांना दिले जायचे. केविनचा या साठी जगात उदो उदो झाला. हे चित्र अमेरिकन पेपर न्यू यॉर्क टाईम्स मधे पण प्रकाशित झाले होते.
या विजयाच्या धामधुमीत एक अजब घटना घडली. केविनला एका अनोळखी माणसाचा फोन आला. त्याने फोनवर या फोटोंचा विषय निघाला. संभाषण संपताना त्या माणसाने केविनला प्रश्न विचारला  की त्या फोटोत किती गिधाडे
आहेत? केविन म्हणाला एक. समोरचा माणूस म्हणाला की चूक! दोन गिधाडे आहेत. केविनने गोंधळून प्रश्न विचारला कसे काय? तो म्हणाला एक चित्रातील मुलीच्या मागे असलेले गिधाड आणि दुसरे कॅमेर्‍या मागील तू! तू त्या असाह्य मुलीला मदत न करता सुंदर फोटो, बक्षीस यातच मग्न होतास. आणि त्याने फोन कट केला.
 केविन खूप खजील झाला आणि आपण गुन्हेगार असल्याचे भाव त्याला त्रास देऊ लागले. हा त्रास त्याला अनावर झाला आणि त्याने पश्चातदग्ध अवस्थेत २७ जुलै, १९९४ रोजी आत्महत्त्या केली अगदी तरुण वयात.
व्हाट्सअ‍ॅपवर ज्यांना हे चित्र दिसणार नाही त्यांनी माझ्या फेसबुक वॉलवर बघावे.

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी मी पण वरून वाचत होतो तो गिधाडांचा उल्लेख येण्याअगोदर, तेव्हा विचार आला मनात की त्याने त्या मुलीची मदत केली असेल की नाही?