वय वाढले तसे मी काय शिकलो?

Submitted by उपाशी बोका on 3 July, 2022 - 02:49

आत्ताच थोड्या वेळापूर्वी एका लेखात उल्लेख वाचला की जीवन क्षणभंगुर आहे अन आपल्याला मिळालेली देणगी आहे.

त्यावरून डोक्यात चक्र सुरू झाले की समजा मला मृत्यू समोर दिसत असेल तर मला आयुष्याबद्दल काय वाटेल? मी जसा जसा म्हातारा होत गेलो, तसा तसा मी काय शिकलो? त्यातूनच कुठलाही गंभीर विचार न करता, मनात जे येईल ते भरभर टंकत गेलो आणि अचानक आयुष्यात काय शिकलो, मला काय महत्त्वाचे वाटते, ते मला उमगत गेले. तुम्ही पण हा प्रयोग करायला हरकत नाही. एका बैठकीत तुमचे विचार झरझर लिहून काढा. तुमच्या मनात काय विचार आले ते वाचायला आवडेल.

1. आयुष्याच्या अखेरीस काहीच महत्त्वाचे वाटत नाही. आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच मरतो. त्रास पण आपल्याच शरीराला होतो. तब्बेतीची काळजी आपणच घेतली पाहिजे. In the end, nothing matters. You are born alone and you die alone. In pain, you suffer alone. Take care of your health.
2. आपण स्वतः:च आपल्या आनंदाला कारणीभूत असतो. You yourself are responsible for your own happiness. A fine wine with dinner is just as important as the dinner itself.
3. छोट्या गोष्टीतून आनंद शोधला पाहिजे. It is a lot easier to find happiness in small things in life e.g. smell of a rose, window seat in a train, enjoying an ice cream on a sunny day, sending a thank you note, nice music.
4. पैशापेक्षा वेळ मौल्यवान आहे कारण एकदा वेळ गेली की तो क्षण परत कधीच मिळत नाही. म्हणून वेळ जपून वापरा. Time is more valuable than money. Money can be earned again, but time spent is gone forever, so use your time wisely.
5. आभारी आहे, असे म्हणणे आणि आयुष्याचा वेग कमी करणे उपयुक्त आहे. Smiling and saying thank you more often helps. Slowing down also helps.
6. नेहमी शिकत रहा. Keep learning and be curious. Always.
7. यशस्वी होण्याचे मार्ग अनेक असतात. There can be more than one way to success. Success is how you define it.
8. Money can buy you happiness, but happiness cannot buy you money.
9. कुणीही तुमच्यावर केलेले उपकार आणि झालेला अपमान विसरू नका. Never forget if someone insults you or someone does any favor for you.
10. No one ever said on their deathbed, "I wish I spent more time in the office".

तळटीप: आधी इंग्रजीत लिहिले ते तसेच ठेवले आहे, मराठी नंतर जोडले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान धागा उबो! तुमच्या सगळ्या शिकवणींशी सहमत आहे.
मला उमगलेल्या काही गोष्टी
1. Clichés are true
2. Solve problems upstream
3. Think holistic. Don't think and work in silos

बाकी सगळे १०० टक्के पटले. पण झालेला अपमान विसरू नका म्हणजे? त्यातून धडा घ्या, आत्मपरिक्षण करा आणि विसरून, स्वतःला, त्या व्यक्तीला माफ करून पुढे जा हे योग्य असे मला वाटते.

छान लिहिले आहे Happy

Love your self first
सर्वात पहिले स्वत:वर प्रेम करायला शिका.
स्वत:ची तुलना कोणाशीही करू नका.
आपल्यातील वेगळेपण नेहमी जपा.
ते लोकांना आवडतेय की नाही याची पर्वा करू नका.
आपल्या गुणांचे कौतुक करताना आपल्यातील कमतरता न लाजता कबूल करायला विसरू नका.
पण त्याचवेळी ईतरांनी केलेल्या कौतुकाने हुरळून जाऊ नका. की त्यांनी केलेल्या टिकेने व्यथित होऊ नका. यातले पहिले जमले तरच तुम्हाला दुसरे जमू शकते.
लक्षात ठेव मित्रा. तूच आहेस तुझ्या आयुष्याचा सुपर्रस्टार Happy

अपमान विसरू नका म्हणजे बदला घ्या हाच एक अर्थ नसावा. तर जिथे अपमान झालाय तिथे पुन्हा जाऊ नका असेही असू शकते.

वय वाढले तरी काहीही शिकले नाही याचे वैषम्य बर्‍याचदा येते. तरीही त्याच त्या चुका करते परत परत.

वय वाढले तसं काय शिकले...
कभी किसिको मुकम्मल जहाँ नही मिलता
कही जमी तो कही आस्मां नही मिलता

हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असं नाही. कितीही deserve करत असेल तरी पण काही वेळा आपल्याला एखादी वस्तू, एखादा अधिकार, एखादी व्यक्ती नाहीच मिळतं.
पेला अर्धा भरलेला तर आहेच पण तो पूर्ण भरावा यासाठी प्रयत्न करणे आपल्या हाती आहे पण नाहीच भरला तर दुःख करत बसण्यात अर्थ नाही

Money can buy you happiness, but happiness cannot buy you money. << हे कस?
वय वाढले तसं काय शिकले? << नेहमी प्लॅन बी तयार ठेवा.

मला जे भावले ते
शिकायचे थांबवू नका
पत्नी नेहमीच नि:स्वार्थ भावाने वागते, तिच्याशी संवाद साधा
रोज स्वतःशी दहा पंधरा मिनिटे तरी एकांतात बोला
जे प्रिय आहेत त्यांना नेहमी कृतीतून तसे दाखवा
क्षमा हा मोठा गुण आहे
स्वतःतील छद जोपासा
रोज आपल्या शरीराकडे लक्ष द्या
निसर्गाकडून शिका
हताश कधीही होऊ नका
पैसा येतो अन जातो
संगीत, चित्रकला, लेखन, वाचन काहीतरी स्वांत् सुखाय करा

पत्नी नेहमीच नि:स्वार्थ भावाने वागते, तिच्याशी संवाद साधा
>>

+७८६
मुले मोठी होऊन बदलतात, विसरतात. पण जोडीदार नाही. त्यामुळे हे नाते टिकवून ठेवा. याची कदर ठेवा. जर आज किंमत कळत नसेल तर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर याची खरी किंमत कळेल.

छान धागा.

<< क्षमा हा मोठा गुण आहे>>
<< निसर्गाकडून शिका>>
-------- सहमत...

अनुगच्छतु प्रवाहं
अनु - मागून, पाठीमागून. उदा. अनुसरणे, अनुकरण, अनुवाद, अनुदिन

प्रवाहाला follow करा, प्रवाहाबरोबर राहा, मुख्य धारेत राहा.
हा शहाणपणा. हे प्रवाह पतित होणे नव्हे.

आपण जो पर्यंत जिवंत आहोत , तो पर्यंत स्वतः मध्ये बदल घडवून आणू शकतो, चुकांमधून शिकू/न शिकू शकतो/नवीन चूका करू शकतो.
माफ करा स्वतःला, दुसर्यांना.
पैसा,आरोग्य,प्रेम, नातेसंबंध, आवडते काम, छंद हे सगळंच

महत्वाचे. ते एकामेकांना replace करू शकत नाही.

मला वाटलेल
1) लोकांच्या दृष्टीने तुम्ही तेव्हाच दखलपात्र असता जोपर्यंत त्यांच्यासाठी तुमचे उपयुक्तता मूल्य वा उपद्र्व मुल्य अबाधित असते
2) यशस्वी होण्यापेक्षा समाधानी होणॆ मह्त्वाचे
3) झेपेल पटेल रुचेल मानवेल तेवढेच करावे. लोक काय म्हणतील याचा फार विचार करु नये.
4) मानवी नातेसंबंधात माझा उपयुक्तता गुणांक फारच कमी आहे त्यामुळे मरताना मला इहलोकात जागा नाही व मेल्यावर स्वर्गात जागा नाही.

#८ आणि #१० ची एकत्र सांगड कशी घालायची? खुश रहाण्यासाठी पैसा लागतो असं #८ सांगते. म्हणजे जास्त खुष रहाण्यासाठी जास्त पैसा हवा. मग जास्त पैसा मिळवायला जास्त वेळ कामाच्या ठिकाणी/ ऑफिसात घालवण क्रमप्राप्त आहे.
मग deathbed वर असताना, अरे मी ऑफिसमधे उगीचच जास्त वेळ घालवला', असं म्हणण्यात काय हशील?

१ . Act . Never React . म्हणजे कुठलिही कृती तुम्ही स्वतः ठरवून करावी . दुसऱ्याच्या कृतीवर प्रतिक्रिया म्हपून काहीही करू नये .
2 Better every day . थेंबे थेंबे तळे साचे . सातत्य राखावे.
3 . फालतू गोष्टीत वाद घालून वेळ आणि शक्तिचा अपव्यय करू नये . फालतू गोष्ट कोणती या साठी माझी चाळणी म्हणजे १ वर्षानंतर तुमाला जर फरक पडणार नसेल तर ती फालतू . तशी एखादी गोष्ट झाली नाही झाली तर काही फरक पडत नाही . ( याचा मुख्य फायदा बायकोशी वाद टाळण्यासाठी होतो . Happy )
४ . प्रत्येकात काहीतरी चांगला गुण असतोच . आपण त्यांना संधी घ्यायला हवी .
५ . मला तर आपण आधी
किती बिनडोक होतो याची जाणीव नेहमीच होते . नाण्याला एक नाही दोन नाही तर अनेक बाजू असतात हे आता कळते .
६ Root cause Analysis खूप शिकवते . त्यातही आपले काय चुकले हे प्रथम .
७ .खूप शिकलोय . त्यात दुसऱ्याला शिकवू नका हे आहेच . Happy

उपाशी बोका चांगला विषय काढलात

आत्मपरीक्षण करण्यासाठीसुद्धा हा धागा छान आहे.>>>>>>> अगदी बरोबर
प्रत्येक व्यक्तिची काही बलस्थाने असतात तर काही मर्यादा असतात. आपण त्याला ढोबळ मानाने व्यक्तिमत्वातील गुण दोष म्हणतो. आपल्या वाट्याला त्या व्यक्तिची जे गुणदोष आले त्यानुसार आपण त्या व्यक्तिवर काही लेबल लावतो. माझी स्वत:शी भेट नेहमीच होत असते. एकदा मला स्वत:ने स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करण्यास सांगितले. मला माझ्या दृष्टीकोनातून खालील बाबी आढळल्या.
चांगल्या बाबी
१) विचार व विश्लेषण करण्याची सवय, माहिती संकलन करण्याकडे कल, चिकित्सक व वैज्ञानिक दृष्टीकोनाकडे झुकाव.
२) साधी रहाणी अनाठायी किंवा प्रतिष्ठेसाठी खर्च न करण्याकडे कल.
३) इतरांचे म्हणणे ऐकून घेणे पण आपल्याला पटत नसेल तर न करण्याचा प्रयत्न.
४) स्पष्टपणे पण नम्रपणे आपले मत सांगण्याचा आग्रह.
५) इतरांच्या व्यक्तिस्वातंत्र्यात शक्यतो ढवळाढवळ न करणे.
६) नियोजनावर भर,शिस्तीवर, काटेकोरपणावर भर देण्याकडे कल.
7)विज्ञानातील नवनवीन संशोधन आपल्या समजूतींना धक्का देतच असते. त्यानुसार ते त्यांच्या मतांना चिकटून न रहाता त्यात बदल करण्यात कमीपणा मानत नाही..
वाईट बाबी
१) छिद्रान्वेषी, दोष व त्रुटीच प्रथम लक्षात येतात.
२) स्वत:ला इतरांपेक्षा जास्त शहाणा समजण्याकडे कल.
३) लवचिकतेची कमतरता,इतरांशी जुळवून घेताना त्रास होतो.
४) दैनंदिन बदलांना सामोरे जायची मानसिक तयारी नसणे
५) समविचारी नसलेल्या माणसांमधे मिळून मिसळून रहाण्याची क्षमता इतरांच्या तुलनेने कमी
६) स्पष्टवक्तेपणा मुळे प्रसंगी माणसांना कळत वा नकळत दुखावणे
7) प्रसंगी स्वत:ला व इतरांना माफ करता येणे त्यांना फारच अवघड जाते.
8) अपमान,दु:ख,अपयश यांचे मानसशास्त्रिय विश्लेषण/ कारणमीमांसा सतत करत राहणे
9) काही बाबतीत गरजेपेक्षा जास्त संवेदनशील असणे
टीप- इतरांना आढळलेले गुण दोष वेगळे असू शकतात याची जाणीव मला आहे. आपण ते मांडू शकता. मी माझ्या आकलनाच्या मर्यादेत ते मांडले आहे. एखाद्याला वाटलेला गुण दुसर्‍याच्या दृष्टीने दोष असू शकते ही व्यक्तिसापेक्षता गृहीत आहे

१. जगात आपणच काही सगळ्यात शहाणे नसतो. जगात अजूनही खूप शहाणे लोक आहेत.
२. नेहमी भांडण्यापेक्षा स्माइल करून पुढं गेलेलं चांगल.
३. माफ करून टाकावं, डूख धरून बसलं, तर आपणच नाग होण्याची शक्यता असते.
४. नात्यात हळूवार पुढे जावं, जपावं. घाई घाईत हे टोक ते ते टोक करू नये.
५. मोकळं व्हावं, व्यक्त व्हावं. जमलं तर निर्लज्जही व्हावं. हसणं शिकून घेतलं पाहिजे..m

मी हे शिकलो.
यशस्वी झाल्यावर आनंदी व्हाल हे चुकीचे आहे. आधी आहे त्यात आनंद शोधा , यश आपोआप येईल.

उपाशी बोका चांगला धागा काढलात

>>>>>>>>>यशस्वी झाल्यावर आनंदी व्हाल हे चुकीचे आहे. आधी आहे त्यात आनंद शोधा , यश आपोआप येईल.
सॉलिड!!!

Pages