तर मंडळी, उशीरा का होईना पावसाचे आगमन झाले आहे, यथावकाश भिडे पूल पाण्या खाली जाईल, मुंबईची तुंबई होईल( च) एखादी छत्री कुठेतरी विसरेल, चहा - कांदा भज्यांचा प्रोग्राम होईल. सोबत उत्तम संगीत पाहिजे बरं त्याशिवाय पावसाळा साजरा होत नाही. तर सादर आहे
पाउस गाणी २०२२
सर्व गाणी युट्युब वर आहेत. पण प्राधान्याने ऐकायची आहेत कारण अस्सल भारतीय पावसात भिजला की अगदी रोमँटिक होउन जातो. अंग अंग
मोहरते, मैत्रीणी बरोबर बाहेर फिरायला गेल्यास मध्येच पाउस आला , गाडी बंद पडली अश्या सबबी चालून जातात व काही भिजलेले रोमांचक क्षण जीवन भराची ठेव होउन जातात. उकाड्यात घाम पुसताना दाबलेली स्वप्ने नव्या पावसात रुजुन फुलुन परत मनात डोलु लागतात अश्या वेळी ऐकायची गाणी. खरंतर कोणाच्यातरी हातात हात घेउन लांब ड्राइव्ह ला जाताना नाही च तर कोणाच्या तरी आठवणीत.
========================================================================================
कोणत्याही यादीच्या वर पिन्ड गाणे म्हणजे रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन भिगे आज इस मौसममें लगी कैसे ये अगन
क्युटी पाय मौशुमी, अमित आणि मुंबईचा बेभान पाउस व टाउन!! स्टफ ऑफ लव्ह. ह्या गाण्याला पर्यायच नाही. ह्याचे एक घरी बसुन गायलेले सभ्य किशोर कुमार व्हर्जन पण आहे ते घरच्या ज्येनांसाठी उगीचच लावुन गाडीच्या किल्ल्या घेउन बाहेर सटकावे.
https://www.youtube.com/watch?v=Mcdly1sb3lM
यादीची सुरुवात रामाच्या नावाने. घाबरू नका. गाण्यातच राम आहे व हेमामालिनी.
१) रामा रामा गजब होई गया रे हाल हमरा अजब हुई गवा रे:
ह्यात एक धरम व हेमा हे पाउस आला म्हणून कामाला निघालेले जोडपे. तिच्या मनात प्रेम आहे पण अजून व्यक्त झालेले नाही.
एका ठि काणी एक आदिवासी ड्रेसातली मुलगी पावसात बिनधास्त भिजत नाचत आहे अशी सिचुएशन आहे. लगेच हेमीच्या मनातले प्रेमाचे लाडू फुटतात व ती त्या ट्रायबल- हाफ सारी ड्रेस मध्ये नाचू लागते. व धरमच्या भोवती पिंगा घालत आपल्या भावना व्यक्त करते. धरम गोड हसत व दिसत उभा आहे फक्त. पण काय किलर दिसतो. अभय देओलचा काका शोभतो अगदी. हेमा अगदी छान नाचलेली आहे. ड्रेसवाल्याने तिची स्किन दिसू नये म्हणुन स्किन कलरचा ब्लाउजही दिलेला आहे पण भिजलेला ब्लाउ ज अधिकच मादक दिसतो.
लताजींनी हे अगदी रत्न नसले तरी चांदीच्या घुंगरु सारखे लखलकते गाणे दिलेले आहे.
आई रुत ये सुहानी बरसा पहले भी पानी.
https://www.youtube.com/watch?v=5KQEMArXm3E
२) अब के सावन में जी डरे:
जैसे को तैसा मिला चित्रपटातले हे गाणे आहे. जितू व रिना रॉय हे जोडपे. साधारण सीता और गीताची मेल व्हर्जन आहे. ह्यातही रीनाचा तो आदिवासी ड्रेस( हाफ सॅरी) च आहे. दोघे अगदी मनमुराद पावसात भिजलेले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=GASi_HbNOys
हे गाणी खरे तर आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर कार मध्ये ऐकायला परफेक्ट आहे. आरडीने संगीत अगदी कुटलेले आहे. व चाल एकदम लै भारी जोडलेली आहे. सुरुवात संतूरच्या तालावर पाउस सुरू होतो त्याने आहे. ऐसा मौसम पहले कभी आया नही हे लताच्या आवाजात ऐकले की भर उन्हाळ्यातही शिर शिरी येइल पाठीच्या कण्यातून. आपल्याला आतुन हलवून टाकणारी गाणी असतात प्रत्येकाची त्यातले माझे एक हे आहे.
ऐसा बादल अंबर पे सजना छाया नही.
हो ये सुहाना समा. प्रेमकी खोजमे मौजमें हो हो.
बादल प्रेमी बनके फिरे.....
आ तुझको आंखो मे छुपा दु इस रात में
कजरा गजरा बह जाई इस रातमें
मग ती म्हणते: होश से काम लो राम का नाम लो. जाने बैरन रुत क्या करे. ( क्या जमाना था लोग भगवान का न नाम बगैर डरके लेते थे)
अगदी सातवी- नववी कालखंडात जिमखान्या वरच्या डेक्कन चित्रपट गृहात सिनेमा बघितला तेव्हा रोमान्स काय ते कळायचे ही वय नव्हते पण
गाणे सुरू झाल्यावर अगदी मनातच घुसले व आजतागायत तिथे सरताज गीत बनून राज्य करते. दुसरे एक सोला बरस की बाली उमर को सलाम लेकिन वो किस्सा फिर कभी.
३) पानी रे पानी तेरा रंग कैसा:
https://www.youtube.com/results?search_query=paani+re+paani+tera+rang+kaisa
भारत कुमार मनोज कुमारच्या शोर ह्या १९७२ मधील चित्रपटातले हे गाणे आहे. उत्तम कोरस व चाल. त्याही पेक्षा कामगार व मुंबईत गरीब वस्तीत राहणा र्या लोकांचे हे गाणे आहे. पोटाची चिंता सतावत आहे. काम नाही हातात तरीही वरुन पाउस पडायला लागल्या वर त्यात मनमुराद भिजावे नाचावे वाटते. गाणे ऐकताना आपसुक ठेका धरला जाईल. तुमच्या लोकल मंडळात गृप डान्स करायला छान गाणे आहे.
अस्सल भारतीय बाजाचे. मोठ्या स्पीकरवर किंवा हेडफोन लावुन ऐकताना तालवाद्ये व कोरस एकदम पकडुन ठेवतात. जया भादुरी व भारत कुमार ह्यांच्यात एक केमिस्ट्री आहे ती ही गाण्यात नकळत व्यक्त होते. प्रत्येकासाठी पाउस वेगळा .. एक एक ओळ ऐकण्यासारखी आहे. सध्या जाल वादळात हा अस्सल भारत दिसेनासा झाला आहे. त्याची नव्याने ओळख करून घ्या.
४) मेघा रे मेघा रे.
https://www.youtube.com/results?search_query=megha+re+megha+re+full+song
हे ही मजबूत तीन साडेतीन कडव्यांचे गाणे आहे पण परफेक्ट. आजकाल अशी गाणी कंपोज होत नाहीत व लिहीली जात नाहीत.
इथे ही मौशुमी व जितु भाई. हा उगीचच आहे. कोण तरी बाप्या हवा म्हणून. मौसमी स्क्रीन वर आली की नजर हलत नाही तिच्यावरौन.
लताजी व सुरेश वाडकर ह्यांचे गाणे; त्यामुळे शास्रीय बाजाचे आहे. तालवाद्ये ही एकदम दणक्यात आहेत. गाणे दोन तृतियांश झाले की पाउस येतो व लाल साडी नेसलेली, प्रभातच्या चिन्हासारखी लांबलचक वेणी घातलेली मौशुमी एकदम जबरदस्त दिसते ती हिरो कडे पळत येते तो शॉट तर हाय तौबा. इतना भी सुंदर न दिखो रानी, पानी भी जल जाएगा. पूर्ण गाण्यात तिच्या हेअर्स्टाइल सारख्या बदलत आहेत. हे आपले अवांतर. सर्व गाण्यात भारतीय वाद्ये सुरेख चपखल वापरली आहेत सतार बासरी, संतूर. मेजवानीच आहे.
५) आज रपट जाये तो हमें ना उठैयो.
https://www.youtube.com/watch?v=FUOYEzYlmLU
आता येत आहेत अमित- स्मिता. साध्या साडीतही काय कमाल दिसते. व नाजुक कंबरेवर घातलेली ती चेन. हाय हाय. उपर से बारिश.
कोई करे तो क्या करे. थोडा दंगा मस्ती असलेले टिपिकल अमिताभ बच्चन गिरी साँग आहे. मुंबईतल्या पावसात एकदा तरी ही वेळ येतेच येते.
एंजॉय करायचे गाणे . भाषा व जनरल बाज अगदी बंबईया आहे.
६) भीगी भीगी रातों मे.
https://www.youtube.com/watch?v=5zB1rMNwOQk
आदिवासी ड्रेस घाल णारी नायिका आता घरातल्या रेशमी नाइट ड्रेस मध्ये आहे. दोघे बहुतेक घराच्या गच्चीत असुन मनमुराद रोमान्स चालू आहे. गाणे स्टार्ट टु फिनि श एकदम गुणगुणण्यासारखे आहे.
अंबर खेले होई उइ मां भीगे मेरी चोली म्हणणार्या नायिका कुठे हरवल्या बरं ..
ह्यातच एक बोनस आयटम घ्या गोरे रंग पे न इतना गुमान कर.
https://www.youtube.com/watch?v=QA2MOxhMXtU
राजोश खन्नाच आहे त्याच्या सर्व अदांसहित. व नायिका नटखट मुमताज. ही पावसात भिजल्यावर गडद निळ्या ड्रेसात इतकी म्हणून गोरी दिसते. तो चक्क तिला पॉट होल मधला चिखल लावतो तेव्हा तर जास्तच गुलाबी गोरी दिसते. व अगदी कमनीय बांधा. गाणे सामान्य आहे व राजेश च्या अदा जरा पीळ होतात पण मुमू साठी बघा. एक खट्याळ खोडकर गाणे. कोर्टिन्ग पीरीअ ड मध्ये बेस्ट. गोरा मित्र/ मैत्रीण/ तो/ती /ते/त्या /+असले तर परफेक्ट आइस ब्रेकर.
७) हाय हाय ये मजबूरी
https://www.youtube.com/watch?v=BxR7eBbLBfk
रोटी कपडा और मकान मधील एव्हर ग्रीन नटखट गाणे. झीनी बेबी ने अजरामर केले आहे. हे मी नटराज चित्रपट गृहात फुल स्क्रीन बघितले आहे.
स्टार पॉवर म्हणजे काय ते कळते. त्यातली खोडकर बासरीची सुरुवात. वैतागलेली प्रेमिका. रिम झिम पाउस व तेव्हा नवीनच आलेल्या सिंथेटिक साड्यातली एक. बागेतल्या हिरवळीवर पावसात बागडणारी बिन्धास्त यौवना. काजळाची आग लावी रेषा व हे कमी की काय म्हणून चमकी ती ही लाल खड्याची. झीनी वॉज समथिन्ग एल्स अगेन. आपल्या प्रियकरा समोर टँट्रम ठोकायची पण एक गंमत अस्ते नाही का. ती परत एकदा अनुभवा.
८) ये रात भीगी भीगी
https://www.youtube.com/watch?v=f1DZxkiMjRo
राज नर्गिस, चोरी चोरी चित्रपट. लता बाईंबरोबर मन्ना दा साहेब. ओल्ड क्लासिक. शब्द नाहीत.
९) कहांसे आये बदरा:
https://www.youtube.com/watch?v=4XfEmN4xN7c
नायिका गाणे शिकत आहे . घरी मास्तर आले आहेत पण हिच्यात व नायकात प्रेमाचे भांडण व किंचित दुरावा आहे.
एक वेगळा फ्लेवर येसु दास आणी हेमलता. नायिका दीप्ति नवल. अगदी निर्मळ सौ दर्य व किती सहज अभिनय.
आमच्या घरी गायन क्लास असल्याने हे अगदी परिच यातले रोजचे दृष्य होते. अगदी बरोबर घेतले आहे. शास्त्रीय बाजाचेच आहे.
हे रात्री च्या शांत प्रहरी पाउस पड त असताना ऐकावे. अगदी एकरुप होउन जातो पावसाशी आपण.
१०) एं डिंग विथ ऑल टाइम फेवरिट क्लासिक
प्यार हुवा इकरार हुवा.
https://www.youtube.com/watch?v=oXLzfldeDcM
राज नर्गिस एकच छत्री कोसळणारा पाउस व एकाच कपातुन प्यायलेला गरमा गरम चहा. वाफाळलेला.
लता व मन्नाडे गाण्याचे सोने केले आहे.
रेन कोट घातलेले बच्चाजी कपूर. फिरभी रहेगी निशानिया. अब वो भी मिटने लगी है.
गोड गुलाबी रोमान्स , मनाचे संयमाचे बंध तोडून टाकणारा भारतीय मान्सूनचा पाउस. बाहेर कोसळतो व मनात भावनांचे काहुर उठते.
===================================================================================================
तुम्ही स्पॉटी फाय वर असाल तर मी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे. नाव बरखा. हॅपी लिसनिन्ग
वाह! काय चिंब चिंब धुंवाधार
वाह! काय चिंब चिंब धुंवाधार मुसळधार धागा आहे....... आणि प्रतिसाद सुद्धा एक से एक!
>> दुसरे एक सोला बरस की बाली उमर को सलाम लेकिन वो किस्सा फिर कभी.
तार छेडलीत... हो फिर कभी यावर अख्खा वेगळा धागा होईल एक एक दृश्य म्हणजे! काय बोलू. विशेषतः ती तिची उडी मारून घेतलेली गिरकी हजार वेळा बघितली तरी मन भरणार नाही. कोणी कोरिओग्राफी केलीय? जरा जास्तच गोड झालंय.
>> मेघा रे मेघा रे
लताजींचे आलाप..... केवळ लताजींचे वेगवेगळ्या गाण्यांतले आलाप यावर सुद्धा अखंड वेगळा धागा काढायला हवा
>> भीगी भीगी रातों मे
कस्सलं गोड आहे हे ऐकलं होतं अनेकवार. पण बघितलं पहिल्यांदा. आधी वाटलं होता कृष्णधवल असेल.
पुढची मुसळधार सर येऊ द्या
पुढची मुसळधार सर येऊ द्या अजून पुढच्या भागाच्या रूपाने.
मी आपली जी मला आठवली ती पट्कन देत आहे इथे:
मराठी:
निशाणा तुला दिसला ना:
याची हि "नवी कोरी प्रिंट" आहे म्हणायला हरकत नाही. कारण मी कालच अपलोड केली आहे या गाण्याच्या इतर व्हिडीओ आवृत्त्या ज्या यूट्यूबवर आहेत त्या काही कारणांमुळे खराब आहेत.
https://www.youtube.com/watch?v=jHL7N-rW2kk
चिंब पावसानं रान:
पाउस म्हटलं कि मराठी हे गाणं हटकून आठवते. 'सर्जा' मधले.
पण याची चांगली व्हिडीओ आवृत्ती यूट्यूबवर मिळत नाही.
https://www.youtube.com/watch?v=0WRiiV4jpLA
अधीर मन झाले:
https://www.youtube.com/watch?v=JLf2YK4Z_oc
झुंजूर मुंजुर:
https://www.youtube.com/watch?v=Y-S98oOrCBs
हिंदी:
बादल यू गरजता है
https://www.youtube.com/watch?v=Rs1hxPfE1ww
जाने चमन शोला बदन:
https://www.youtube.com/watch?v=B2f0NzCohyY
मराठीतील एक आवडते पावसाचे
मस्त धागा. छान लिहिलेय. एकदम त्या वातावरणात गेले.
मराठीतील एक आवडते पावसाचे गाणे. याचे चित्रीकरण फारसे आवडत नाही पण पाऊस आला की हे गाणे आठ्वतेच.
https://www.youtube.com/watch?v=fWve-YSq1Jw
आला आला वारा. संगी पावसाच्या धारा
मस्तच! पावसाळी गाण्यांनी एकदम
मस्तच! पावसाळी गाण्यांनी एकदम मस्त मुड बनवला. थॅंक्यु अमा.
मला ऐकायला ( आणि गायलाही) आवडणारी गाणी म्हणजे झिर झिर झिर झिर बदरुआ बरसे हो कारे कारे, आणि अजून एक सुमन कल्याणपूर आणि कमल बारोट चं गरजत बरसत सावन आयो रे, लायो ना संग मे हमरे बिझडे बलमवा, सखी का करू हाय.
ह्या गाण्यांचं पिक्चरायझेशन माहिती नाही, पण ऐकायला आवडतात.
वर मीराने सुचवलेलं ऑटाफे आहे. , शांमांनी सुचवलेलं बरखा रानी पण आवडतं. (पावसाळ्यात मी आमचा ट्रेनचा ग्रुप मिस करते. आता सगळे जण वेगवेगळ्या वेळी जातात. पावसात आम्ही पावसाची गाणी म्हणायचो जाम धमाल यायची, सॉरी फॉर अवांतर)
मुंबई पुणे मुंबई मधलं कधी तू पण आवडतं,
अधीर मन झाले , नभ उतरू आलं ,
अबके ना सावन बरसे
बादल जो बरसे तो भीगे हम .....
बादल जो बरसे तो भीगे हम .....-गर्दीश
https://youtu.be/nhQuJuAyVlo
अजून एक आवडतं पाऊस गाणं ,
अजून एक आवडतं पाऊस गाणं ,
मुझे तुम याद करना और मुझको याद आना तुम ! (मशाल)
गाण्याच्या सुरवातीला नुकताच पाऊस पडून गेल्यासारखं हिरवं हिरवं वातावरण आहे आणि नंतर पाऊस येतोच
कभी जो बादल बरसे
कभी जो बादल बरसे
मैं देखूं तुझे आँखें भरके
तू लगे मुझे पहली बारिश की दुआ
तेरे पहलू में रह लू
मैं खुदको पागल कह लू
तू ग़म दे या खुशियाँ
सेह लून साथिया
कोई नही तेरे सिवा मेरा यहाँ
मंज़िलें हैं मेरी तो सब यहाँ
मिटा दे सभी आजा फ़ासले
मैं चाहूं मुझे मुझसे बाँट ले
ज़रा सा मुझमे तू झाँक ले
मैं हूँ क्या
मोहब्बत बरसा देना तू सावन आया
मोहब्बत बरसा देना तू सावन आया है
तेरे और मेरे मिलने का मौसम आया है
सबसे छुपा के तुझे सीने से लगाना है
प्यार में तेरे हद से गुज़र जाना है
इतना प्यार किसी पे पहली बार आया है
भूले बिसरे गीत मध्ये एक गाणं
भूले बिसरे गीत मध्ये एक गाणं परवा आणि आजही वाजलं.
रिमिझिमि बरसे पानी आज मोरे अंगना
चित्रपट - परदेसी संगीत - अनिल बिस्वास. गायिका त्यांची पत्नी मीना कपूर.
गाणं ऐकताना पावसात नाचत असतील असं वाटतं. चालही शाळेच्या गॅदरिंगमध्ये समूहनृत्यासाठी योग्य आहे.
पण सुरुवातीला भर पावसात बायका पनिया भरन, वस्त्रप्रक्षालन अशी कामं करताना दिसतात. मग पुढे घरात कामं. नऊवारीतली नर्गिस. गाण्याच्या सुरुवातीलाही ढोलकीची थाप.
हा चित्रपट इंडो रशियन आहे. अलिबाबा चालिस चोर यायच्या बराच आधी.
दुसरं गाणं - ओ घटा सावरी थोडी थोडी बावरी हो गयी हौ बरसात क्या. पण नायिका घरातच आहे. पहिल्या कडव्यात मेकपचे लेयर्स. दुसर्यात व्यायाम करतेय. तिसर्यात अंघोळ
दोन्ही पाऊस गाणी वाया घालवलीत.
जाईजुईचा गंध मातीला..https:/
जाईजुईचा गंध मातीला..
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://m.youtube.c...
ये नीर कहासे बरसे है
ये नीर कहासे बरसे है
ये बदरी कहासे आयी है
माझं फेवरेट गाणं
https://youtu.be/6CsxIsksYXE
ये रे ये रे पावसा तुला देतो
ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा पाउस आला मोठा
ये रे घना ये रे घना न्हाउ
ये रे घना ये रे घना न्हाउ घाल माझ्या मना
रिमझिम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात, प्रियाविण उदास वाटे रात
पाउस गाणी म्हंटल्यावर मला आवडलेली पावसाची गाणी लिहीली. मराठी भाषेत आहेत, चालतील ना इथे?
आला पाऊस मातीच्या वासात मोती
आला पाऊस मातीच्या वासात मोती गुंफीत... पुष्पा पागधरे
पावसाळा विशेषतः श्रावण सुरू झाला की पूर्वी हमखास रेडिओवर लागणारे गाणे
मस्त गाणी, माझ्या प्लेलिस्ट
माझ्या प्लेलिस्ट मधली काहि, जी अजुन इथे आलेली नाहित (बहुतेक) -
अब के सावन ऐसे बरसे
बरसो रे मेघा मेघा
भागे रे मन
काटे नहि कटते ये दिन ये रात - बच्चनसाहेबांच्या "आज रपट..." ला टफ फाइट देणारं गाणं, आणि सर्वात बेस्ट
ओ सजना बरखा बहार आयी
नंदुशेठनी सुरुवात केलीच आहे, आणि अश्चिनीमावशींची हरकत नसेल तर - मराठी गाणी :
आज कुणितरी यावे..
आला आला वारा..
झिमझिम झरती श्रावणधारा..
राया मला पावसात नेउ नका..
रिमझिम पाऊस पडे सारखा..
श्रावणात घन निळा बरसला..
वादळ वारं सुटलं गं...
आला पाऊस मातीच्या वासात मोती
आला पाऊस मातीच्या वासात मोती गुंफीत.. >>> हे गाणं परवा आठवत होतं, आठवेनाच, पूर्वी अगदी तोंडात असायचे. धन्यवाद अतुल.
आवडला धागा अमा
आवडला धागा अमा
सुंदर आहेत गाणी वरती नमूद झालेली
गारवा अल्बम (कितीही जुना झाला तरीही आवडतो )
ऋतू हिरवा by आशाजी
तुम मिले तो जादू छा गया, तुम मिले तो जिना आगया
तुम मिले तो मैने पाया है खुदा
Pages